उपोषण सोडलं, मनोज जरांगेंची प्रकृती खालावली! रुग्णालयात दाखल, जीआर येताच भूमिका घेणार OBC महासंघ
Manoj Jaranges condition worsens : मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी आरक्षणातील आपल्या मागण्या पुर्ण झाल्याच्या घोषणा करत उपोषण सोडले असे जाहीर केले आहे. हा आपला विजय आहे, असे त्यांनी सांगताच आंदोलकांसह मराठा समाजाने महाराष्ट्रात एकच जल्लोष केला आहे पण दुसरीकडे मनोज जरांगे यांची उपोषणानंतर प्रकृती खालावली आहे. त्यामुळे त्यांना छत्रपती संभाजीनगरच्या एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मनोज जरांगे यांच्यावर सध्या छत्रपती संभाजीनगर येथे रुग्णालयात उपचार सुरु आहे. मुंबईहून मनोज जरांगे हे छत्रपती संभाजीनगरमध्ये दाखल झाले. त्यांच्या आगमनावेळी मराठा समाजाकडून त्यांचे स्वागत करण्यात आले. मोठा समुदाय यावेळी जमला फटाकेही फोडण्यात आले. यानंतर त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
बरे होण्यासाठी दोन आठवडे लागणार
नवराष्ट्रने डाॅक्टर चावरे यांच्या हवाल्यानुसार, वृ्त्त दिले आहे. या वृत्तात उपोषणामुळे प्रचंड थकवा मनोज जरांगे पाटील यांना जाणवत असून त्यांची प्रकृती बिघडल्याचे सांगण्यात आले आहे. त्यांच्या तपासण्या सुरु असून सुधारणा होण्यासाठी किमान दोन आठवडे लागू शकतात, असे डाॅक्टरांनी सांगितले आहे.
ओबीसी महासंघ आक्रमक...
दरम्यान, मनोज जरांगे यांच्या मागण्या मान्य केल्यानंतर ओबीसी महासंघ आक्रमक झाला आहे. मागण्या जरी मान्य झाल्या तरी सरकार कोणत्या प्रवर्गातून आरक्षण देणार ही माहिती पुढे आलेली नाही, ती माहिती पुढे येताच ओबीसी महासंघ आपली भूमिका घेणार आहे, तत्पूर्वी जीआरची होळी करुन निषेध नोंदवावा असे आवाहन ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केले आहे. ही होळी जिल्हाधिकारी कार्यालय, तहसील, कचेरी येथे करावी असेही हाके यांनी म्हटल्याचे झी न्यूजच्या वृत्तात म्हटले आहे.
मनोज जरांगेंच्या कोणत्या प्रमुख मागण्या मान्य झाल्या?
1) हैद्राबाद गॅजेट लागू करण्याची मान्यता उपसमितीने दिली आहे. तात्काळ लागू करणार. जीआर काढणार
2) औंध आणि सातारामध्ये काही त्रुटी आहेत. १५ दिवसात कायदेशीर त्रुटींचा अभ्यास करून अंमलबाजवणी केली जाईल. जीआर काढणार
3) मराठा आंदोलकांवरील सप्टेंबर अखेरपर्यंत सर्व गुन्हे मागे घेणार, शासन निर्णय जारी करणार. त्याचबरोबर, मराठा आरक्षण आंदोलनमध्ये बळी गेलेल्या कुटुंबियांना 15 कोटी रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य परिवहन मंडळात नोकरी मिळेल. जर शिक्षण मुलाचा जास्त आले तर सरकारी नोकरीं द्यावी, या मागणीवर विचार केला जाईल.
4) कायद्यात बसणाऱ्या आरक्षणाचा मराठा आरक्षणावर सरकारच्या समितीने अंतिम मसुदा तयार केला.












Click it and Unblock the Notifications