Manoj Jarange : मनोज जरांगेंचं ठरलं! पुन्हा उपोषण करणार, मुंबईत चक्काजाम, तारीखही ठरली
Manoj Jarange to resume hunger strike for Maratha reservation : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील मुंबईत उपोषण सुरु करणार आहेत. यासंदर्भात त्यांनी घोषणा केली असून येत्या 29 ऑगस्ट रोजी मनोज जरांगे उपोषणाला बसणार आहेत. आंतरवली सराटीत यासंदर्भात पत्रकार परिषदेत आज 30 एप्रिल रोजी ते बोलत होते.

गेल्या अनेक काळापासून सुरु असलेल्या मराठा आरक्षणासंदर्भात ठोस मागण्या मान्य झालेल्या नाहीत, त्यामुळे आता आंदोनात्मक पावित्रा घेण्यासाठी मनोज जरांगे आणि त्यांचे समर्थक न्याय मागण्यांसाठी रस्त्यावर उतरत आहेत.
अशातच मनोज जरांगे यांनी 29 ऑगस्ट रोजी उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता पुन्हा राज्यात मराठा आरक्षणासाठी आंदोलनाचा सागर दिसेल, महाराष्ट्रात मराठा समाजाला आरक्षण हवंय तेही सर्वोच्च न्यायालयात टिकणारे आरक्षण हवे आहे त्यासाठी आता हे आंदोलन केले जाणार आहे.
आंतरवाली सराटी येथे मनोज जरांगेंनी पत्रकार परिषद घेत राज्य सरकारवर टीका केली. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीतून मनोज जरांगे यांनी माघार घेतली होती, तेव्हापासून जरांगे शांत होते पण आता पुन्हा एकदा त्यांनी उपोषणास्त्र बाहेर काढले आहे.
काय म्हणाले मनोज जरांगे?
मनोज जरांगे यांनी पत्रकार परिषदेत म्हटले की, आमच्या लेकराबाळांचं अर्थात मराठा समाजातील मुलांचे जर नुकसान होत असेल तर आम्ही शांत बसणार नाहीत, मराठा आणि कुणबी हे एकच आहेत, त्याचे पुरावे आम्ही दिले आहेत, ग्रामपंचायत असो की, देवस्थान अथवा तत्सम पुरावे आढळून आलेले आहेत. त्यामुळे मराठा आणि कुणबी एकच असल्याचा सरकारने कायदा करावा आणि मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागण्या पुर्ण कराव्या.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांव टीका
मनोज जरांगेंनी आपल्या पत्रकार परिषदेद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना गर्वात वागू नका असे म्हटले आहे. तसेच नोंदी सापडलेले प्रमाणपत्र तातडीने द्यावे, 58 लाख जात पडताळणी प्रमाणपत्र तात्काळ द्यावे हा आमचा हक्क असून तो रोखू नका असेही त्यांनी फडणवीस यांना उद्देशून म्हटले आहे.
'या' मुद्द्यांवर मनोज जरांगेंनी सरकारचे कान टोचले!
- मनोज जरांगे म्हणाले, तुम्हाला सत्ता मराठ्यांनी दिली आहे, नेत्यांचे ऐकून जातीवाद शिक्षणात आणू नका.
- सरकारने सग्या सोयऱ्यांची अमंलबजावणी तत्काळ करावी, समाजाचा आरक्षणाचा हक्क नाकारु नये.
- आता कुठलीही माघार आपण घेणार नाही, सरकारकडे आता कोणतेही कारण नाही.
- 58 लाख नोंदी सापडल्या आहेत, हे पुरावे भक्कम आहे त्यामुळे आता सरकारला वेळ देण्याची गरज नाही जो द्यायचा तो आधीच दिला आहे.












Click it and Unblock the Notifications