Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

उपोषणाच्या 7व्या दिवशी जरांगेंची प्रकृती प्रचंड खालावली; संभाजीराजेंनी भेट घेत सरकारवर केला हल्लाबोल

Manoj Jarange Patil : मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आज सातवा दिवस आहे. आंतरवाली सराटीत सद्या मोठ्या प्रमाणात राज्यभरातील लोक येथून जरांगेंची भेट घेत आहेत. चौथ्या दिवसापासून जरांगेंची प्रकृती खालावत चालली असून आज सातव्या दिवशी तर त्यांना आता जागेवर उठणं देखील अशक्य झालेले आहे. दरम्यान, आज संभाजीराजे छत्रपती यांनी जरांगे यांची भेट घेत उपोषण सोडण्याची मागणी केली. पण जरांगे यांनी त्यांना नकार दिला. यावेळी संभाजीराजेंनी शिंदे फडणवीस सरकारवर जोरदार निशाणा साधला.

आज मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणकर्ते मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आज सातवा दिवस आहे. दरम्यान मनोज जरांगे यांची प्रकृती खालावली असून सहकाऱ्यांचा आधार घेत असून उपोषणाच्या सातव्या दिवशीही त्यांनी उपचार घेण्यास नकार दिला आहे. आज मराठा आरक्षणासंदर्भात मंत्रिमंडळाच्या उपसमितीची महत्त्वाची बैठक होणार असून निवडणूकांच्या तोंडावर मराठा आरक्षणप्रकरणी सरकार काय तोडगा निघतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Manoj Jarange Patil

जरांगेंची तब्येतीची केली विचारपूस

राज्यात मराठा ओबीसी आरक्षणावरून मनोज जरांगेंवर ओबीसी नेत्यांकडून आरोप प्रत्यारोप होत असताना संभाजीराजे छत्रपती जालन्यात अंतरवली सराटी येथे दाखल झाले होते. यावेळी डॉक्टरांकडे मनोज जरांगे यांच्या तब्येतीची विचारपूस केली. त्यानंतर उपोषण मंडपात संभाजीराजे यांनी जरांगेंसह समाजबांधवांशी संवाद साधला.

काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती?

संभाजीराजे छत्रपती म्हणाले, मराठा आरक्षणाच्या आंदोलनाबाबत सरकारने अजून निर्णय घेतलेला नाही. तुम्ही सत्तेत बसला आहात. विरोधी पक्षातील नेत्यांनीही सरकार कसं आरक्षण देणार आहे यावर भाष्य करायला हवं. हे आरक्षण कसं टिकणार आहे यावर बोलायला पाहिजे. विरोधक देखील बघ्याची भूमिका घेऊ लागले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी सगळ्यांना न्याय दिला, अठरापगड जातींसह बारा बलूतेदारांना न्याय दिला. त्यामुळं जे शाहू फुले आंबेडकरांचं नाव घेतात त्या सरकारनं सगळ्यांना न्याय देण्याची भूमिका ठेवली पाहिजे, असेही ते म्हणाले.

..तर याला सरकार जबाबदार असेल

मनोज जरांगे पाटलांनी तब्येत सांभाळायला पाहिजे. मी त्यांच्याशी व्यक्तिगत बोललोय. मनोज जरांगे पाटलांच्या सोबत मी आधीसुद्धा होतो. आताही आहे. आणि पुढेसुद्ध असणार. असं संभाजीराजे छत्रपती म्हणाले. माझी सरकारला विनंती आहे. इकडे या. काय परिस्थिती आहे ते बघा. तुमच्याकडे हेलिकॉप्टर आहेत. या इकडे बघा काय परिस्थिती आहे. सगळ्या यंत्रणा आहेत तुमच्याकडे. इथं जर काही झालं तर सरकार जबाबदार असणार. विरोधकही तेवढेच जबाबदार असतील.


आरक्षणासाठी युवकाची आत्महत्या

मराठा आंदोलक मनोज जरांगे हे मागील एक वर्षापासून आंदोलन करत आहे मात्र सरकार दखल घेत नाही म्हणून मी आत्महत्या करत असल्याचे सांगत जालना जाल्ह्यात एका व्यक्तीने आत्महत्या केली आहे. जालन्यातील बदनापूर तालुक्यातील वरुडी येथील दादाराव काकडे या 40 वर्षीय व्यक्तीने विषारी औषध पिऊन राहत्या घरी आत्महत्या केलीय. दरम्यान मयत काकडे यांच्या खिशात चिट्ठी सापडल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

बीड, परभणी, जालना जिल्ह्यापाठोपाठ जरांगे यांच्या उपोषणाच्या समर्थनार्थ अहमदनगर जिल्ह्यात देखील विविध ठिकाणी बंदची हाक देण्यात आलेली आहे. मराठा आरक्षण देऊन सरकारने जरांगे यांच्या मागण्याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी मराठा समाजाकडून केली जात आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+