मराठा संयमी आहे, नाहीतर तुमचा राजकीय एन्काउंटर झालाच म्हणून समजा- जरांगे पाटलांचा अमित शहांना इशारा
Manoj Jarange Patil attack on Amit Shaha : अमित शाह यांची ही आंदोलन हाताळण्याची पद्धत खूप घातक आहे. तुम्ही तुमच्याच लोकांचाच घात केला. तुम्ही पक्षात वर येण्यासाठी कोणत्या थराला गेलात, हे सांगायची गरज नाही. अमित शहा यांनी बरेच राजकीय एन्काउंटर केलेत. पण मराठा आरक्षण आंदोलन चुकीच्या पद्धतीने हाताळलं तर तुमचंच राजकीय एन्काउंटर होईल, अशा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला. ते रविवारी छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.

..तर तुम्हाला सत्तेवरुन कोणीही हटवणार नाही
अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आंदोलन गोडीगुलाबीने हाताळले तर तुम्हाला सत्तेवरुन कोणीही हटवू शकत नाही. पण तुम्ही मराठा आंदोलन व्यवस्थित हाताळले नाही तर तुमच्यावर चिलमीची चहा पिण्याची वेळ येईल. अमित शाह यांनी मराठा समाजाला बाजूला ठेवले असते तर ती त्यांची घोडचूक ठरेल. त्यानंतर कोणतीही यंत्रणा आणली तर तुम्ही संविधानाच्या कोणत्याच पदावर बसू शकत नाही, असा निर्वाणीचा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला.
मराठा समाजाबाबत दुजाभाव करु नका
मनोज जरांगे पाटील यांनी अमित शाह यांच्यासह भाजपवर जोरदार आगपाखड केली. अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाबाबत दुजाभाव करु नये. तुम्ही खड्ड्यात पडा की उताणे पडा आम्हाला काहीही देणेघेणे नाही. इतर लोकांनी कष्ट करायचे आणि लोणी खायची ही अमित शाह यांची घाण सवय आहे. अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, प्रमोद महाजन, मुरली मनोहर जोशी यांनी स्वत:चा देह झिजवला. तुमचे हे कुटुंब होते. त्यांना तुम्ही ज्याप्रकारे हाताळले तसे हे आंदोलन तुम्ही हाताळू नका. आम्ही हे सहन करणार नाही. ज्यांनी पक्षासाठी आयुष्य झिजवले त्याच नेत्यांना तुम्ही बाजूला केले. अमित शाह तुमची ही पद्धत इकडे चालणार नाही, अन्यथा तुम्हाला पश्चाताप झाल्याशिवाय काहीच हाती लागणार नाही, असा इशारा देखील जरांगे यांनी भाजप शीर्षनेत्यांना दिला.
संरसंघचालक खुटाड, नाही तर तुम्ही कुणालाच सोडलं नसतं
मनोज जरांगे पाटील यांनी अयोध्येतील राममंदिराच्या मुद्द्यावरुन अमित शाह आणि भाजपला लक्ष्य केले. सरसंघचालक मोहन भागवत खुटाड निघाले तर नाही तर तुम्ही कोणालाच सोडले नसते. कळस बसवण्यापूर्वी मूर्ती बसवणारे मराठा आंदोलन हाताळणार का?, असा टोला जरांगे पाटील यांनी लगावला. तु्म्ही ज्या यंत्रणा आणि एजन्सीचा वापर करता, ते देखील एक दिवस तुम्हाला कंटाळतील. तुमच्याकडे दादा आणि गुंड आहेत, असे तुम्हाला वाटते का? तुमच्याकडे गुंड असतील तर आमच्याकडेही मराठा गुंड आहेत.
न्यायपालिकाही तुमच्यावर खुश नाही. रामदेव बाबा पाय वाकडे करुन शिकवत होता, त्यांची उत्पादनेही तुम्ही बंद केली. गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन आणि बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे भाजप वाढली. अमित शाह यांना कत्तली करायच्या आहेत का? दादागिरीने खुर्चीवर बसायचे आहे का? तुम्ही भाजपमध्ये काड्या लावल्या, नागपूरमध्ये तुम्ही काय केलंय, हे सगळ्यांना माहिती आहे. जनतेने तुमचे राजकीय एन्काउंटर केल्यास तुम्ही दिसणार नाही, असे मनोज जरांगे यांनी म्हटले.












Click it and Unblock the Notifications