माझ्या मागे फडणवीसांनी टोळ्या लावल्या, त्याच भाजपचा सुफडा साफ करणार- मनोज जरांगेंचं मोठं वक्तव्य
माझ्यामागे फडणवीस यांनी टोळ्या लावल्या आहे, मात्र त्याच टोळ्या फडणवीसांच्या पक्षाचा सुफडा साफ करतील, अशी जोरदार टिकावजा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.
गेल्या काही महिन्यांपासून मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मराठा आंदोलन मनोज जरांगे पाटील लढा देत आहेत. संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये त्यांचा दौरा सुरू असून आज सात ऑगस्टपासून सोलापूर दौरा होत आहे. त्यापूर्वी तुळजापूर येथे पत्रकार परिषद घेऊन मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.

भाजपमधील मराठ्यांमध्ये खदखद
आता सुट्टी नाही, मराठा समाजाला आम्ही आरक्षण घेऊनच राहणार आहे. 50 टक्क्यांच्या आतच ओबीसीतूनच आरक्षण घेणार आहे. 50 टक्क्यांच्या वर बोलायचं नाही, असे मत मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केले. तुळजापुरात पत्रकार परिषदेत ते बोलत होते. भाजपनं माझ्या मागं टोळ्या लावल्या आहेत. पण या टोळ्या देवेंद्र फडणवीसांच्या पक्षाचा सुफडा साफ करतील असे ही मनोज जरांगे पाटील म्हणाले. भाजपमधील मराठा खवळला आहे. त्यांच्यामध्ये मोठी खदखद आहे, असेही मनोज जरांगे पाटील म्हणाले.
तुमच्याकडे सत्ता,तुम्हीच आरक्षण द्या
आम्ही सरकारला वेळोवेळी सांगत आहे की, आम्हाला राजकारणाकडे जायचं नाही. तुम्ही आम्हाला समजून घ्या असे जरांगे पाटील म्हणाले. राज्यात जेवढे राजकीय पक्ष आहेत, त्यांनी सांगायला पाहिजे की मराठ्यांचे ओबीसीतील आरक्षण द्यायला पाहिजे असे जरांगे पाटील म्हणाले. तुमच्याकडे सत्ता आहे, बहुमत आहे, तुम्ही आरक्षण द्या असे जरांगे म्हणाले.
नारायण राणेंबद्दल काय म्हणाले?
सगळा मराठा ओबीसी आहे. कुणबीमध्ये ज्यांना यायचे ते येतील ज्यांना नको ते राहतील असे जरांगे पाटील म्हणाले. मी मराठवाडा, खानदेश, विदर्भ असा भेद होऊ देणार नाही असे जरांगे पाटील म्हणाले. सगळे दाखल झालेले गुन्हे मागे घ्या असे जरांगे पाटील म्हणाले. मी नारायण राणे यांना मराठवाड्यात येऊ नये असं मी म्हणलोच नाही. ते जाणून बुजून अंगावर घेत असल्याचे मनोज जरांगे पाटील म्हणाले. दरम्यान, मराठ्यांचं वाटोळ करायला सरकार आलं आहे, हे मराठ्यांनी समजून घ्यावं असे जरांगे पाटील म्हणाले.
29 ऑगस्टपर्यंत आरक्षण दिलं नाहीतर....
गोरगरिबांचे दिवस आणायचे आहेत. नेत्यांनी समाजाची भावना समजून घ्यावी असेही जरांगे पाटील म्हणाले. 29 ऑगस्टपर्यंत आरक्षण दिलं नाहीतर सगळ्यांचा विषय संपला आणि आरक्षण दिलं तर आम्ही राजकारणात जाणार नसल्याचे जरांगे पाटील म्हणाले.
मी कोणाचाच नाही. कोणीच निवडून येणार नाही असे जरांगे पाटील म्हणाले. समाज मोठा होण्यासाठी मी आंदोलन करत आहे. मराठ्यांचे सगळे आमदार देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जावे आणि त्यांना सांगा आम्हाला राजकारणात जायचे नाही पण आम्हाला आरक्षण द्या असे मनोज जरांगे पाटील म्हणाले. आरक्षण आम्ही ओबीसीमधूनच घेणार असल्याचे जरांगे पाटील म्हणाले.
एसीत बसणाऱ्यांना आरक्षण काय कळणार?
मराठा समाजाला आरक्षणाची गरज नाही असे वक्तव्य राज ठाकरे यांनी केले होते. त्यावर उत्तर देताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, राज ठाकरे हे स्टंटबाजी करत असून राज ठाकरे यांची पळवाट शोधली आहे. एसी मध्ये बसणाऱ्याला आरक्षण काय कळणार, असे जरांगे म्हणाले.












Click it and Unblock the Notifications