मनोज जरांगेंचा इलेक्शन प्लॅन ठरला! विधानसभेला उमेदवार उभे करणार, जिथे निवडून येणार नाही तिथे पाडणार
Manoj Jarange declared plan for Maharashtra Assembly Election 2024 : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत मराठा आरक्षणकर्ते मनोज जरांगेंचा इलेक्शन प्लॅन ठरला आहे. विधानसा निवडणुकीसाठी ते उमेदवार उभे करणार आहेत. फार्म भरुन तयारीला लागा असे म्हणत "जिथे आपले उमेदवार निवडून येणार नाही, तिथे उमेदवार पाडा!" असे म्हणत त्यांनी सत्ताधाऱ्यांचेच नव्हे तर विरोधकांचेही उमेदवार पाडणार असल्याचा सूचक इशारा दिला आहे.
यासंदर्भात आज अंतरवाली सराटी येथे त्यांनी घोषणा केली. त्यामुळे हा सत्ताधारी महायुतीला मोठा धक्का मानला जात आहे. आपल्याला संपवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना संपवणार असा इशारा त्यांनी यावेळी दिला. हा इशारा भाजप आणि देवेंद्र फडणवीसांसाठी महत्वाचा असल्याचे बोलले जात आहे.
मनोज जरांगे यांनी अंतरवाली सराटी (जि. जालना) येथे मराठा समाजबांधवांची बैठक घेतल्यानंतर माध्यमांना संबोधित करत असून आपला मनसुबा जाहीर करत आहेत, मनोज जरांगे यांच्या निर्णयांमुळे त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीत मोठी रंगत येणार आहे.

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची आचारसंहीता लागल्यानंतर मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांनी पत्रकार परिषद घेत महायुती सरकारवर हल्लाबोल केला होता. त्यानंतर त्यांनी सरकारचे उमेदवार पाडण्यासंदर्भात निर्णय घेण्याची घोषणा केली होती. त्यानुसार त्यांनी आज आपला निर्णय घेतला आहे.
मनोज जरांगे पाडण्यावर, उभा करण्यावर काय म्हणाले?
- माझी राजकारणाकडे जाण्याची इच्छा नाही, हे माझे मत आहे.
- जर समजा उभा करायचे ठरले तर माझे काही प्रश्न आहे. ते हे माझ्या समाजाचा लढा हा या नादात बंद पडू नये ही जबाबदारी तुमची (समाजाची).
- महाविकास आघाडी आणि महायुती दोन्हीही आरक्षण देतो असे म्हणत नाही. दोन्ही लोक आपली वाट पाहत आहेत, त्यांच्या उमेदवारांच्या याद्या दिल्लीत पडून आहे.
- आपण उमेदवार उभा केले तर माझ्या आंदोलनाचे, समाजाचे काय?
- आंदोलन माझ्यासाठी महत्व आहे. तीस ते चाळीस दिवस फक्त राजकारणात आहे त्यानंतर मी सर्व समाजाचा.
- जिथे निवडून येतील तिथे आपले उमेदवार उभा करणार. एससी, एसटीच्या जागांवर आपण उमेदवार देऊ नये.
- आपल्या विचारांचा उमेदवार निवडून आणा
- जिथे आपले उमेदवार निवडून येणार नाही तिथे मागच्यासारखी पाडापाडी करायची.
- निवडणूक फार्म भरुन ठेवा, मागे घ्या म्हटले तेव्हा घ्या.
राजकारण्यांनी वेठीस धरले
मनोज जरांगे म्हणाले, आपला प्रामाणिक लढा आहे. प्रामाणिकपणे मी सांगतो की, आपला लढा फक्त आरक्षणासाठी आहे. हा संघर्ष राजकारणासाठी कधीच नव्हता. पण राजकारण्यांनी मराठ्यांना वेठीस धरले आणि गरिबांना रस्त्यावर आणण्याचे काम सरकार करत आहे. आमच्या मनाला शिवलंही नाही की, आम्ही राजकारणाकडे जाणार आहोत.शेकडो वर्षात मराठ्यांनी वाईट विचार ठेवला नाही. मराठ्यांनी मनगटातील ताकद दाखवली.
मुस्लीम -हिंदू विषयावर जरांगेंचे भाष्य
मनोज जरांगे म्हणाले, मराठ्यांनी उद्देश सोडून काम केले नाही. आम्हीही कट्टर हिंदू आहोत, आम्हाला गर्व आणि स्वाभीमानही आहे. मुस्लीम बांधवांशी चर्चा करताना सांगतो की, मी कट्टर हिंदू आहे मला माझ्या धर्माचा स्वाभीमान आहे. त्यांनाही असावा. आपल्याला धर्म नव्हे पण सत्ता परिवर्तन करायची आहे. मला हिंदुत्व मान्य पण छत्रपती शिवरायांच्या विचारांचे.
देवेंद्र फडणवीस, छगन भुजबळांना मनोज जरांगेंचा सवाल
मनोज जरांगे म्हणाले, दंगलीसाठी यांना मराठा लागतो. रट्टे द्यायला आपण आणि तो म्हणतो मीच हाणून आलो. हिंदुत मराठा आहे, ज्यावेळी तुम्ही अडचणीत असता तेव्हा मराठा लागतो पण आम्ही आरक्षण मागतो तेव्हा तुम्ही का विरोध करता, असा सवालही सत्ताधाऱ्यांना आणि भाजपचे नाव न घेता जरांगेंनी केला. छगन भुजबळ आणि देवेंद्र फडणवीस हे हिंदू आहेत पण ते स्वार्थी राजकारण करता. अजितबात कुणाचे ऐकून भांडणं खेळायला जायचे नाही दंगलीत जायचे नाही.
आपल्याला दंगली करायला लावल्या..!
मनोज जरांगे म्हणाले, सर्वधर्मसमभाव महत्वाचा आहे. धर्म-धर्म आणि जातींनी एकमेकांच्या अंगावर यायचे नाही. ते काहीही म्हणतील पण त्यांनी आपला वापर केला. त्यांनी आपल्या रागीट आणि तापड बुद्धींचा फायदा घेत त्यांनी मलिदा खाल्ला असा आरोपही मनोज जरांगे यांनी केला. मला जे करायचे ते मराठ्याच्या हितासाठी करायचे आहे. सत्ताधाऱ्यांवर आरोप करताना मनोज जरांगे म्हणाले की, त्यांना दंगली घडवायच्या आहेत, देवेंद्र फडणवीस यांना डोके आहे की नाही असाही सवाल त्यांनी केला.
फडणवीसांवर खळबळजनक आरोप
मनोज जरांगे म्हणाले, मी माझ्या जीवाला जाळतो पण समाजाला रस्त्यावर येऊ देत नाही. आरक्षण मागत असताना आपल्याला सोडून दुसऱ्यांना आरक्षण देण्याची काहीच गरज नव्हती. मराठा समाजाच्या आई-बहिणींवर गोळ्या झाडल्या, इंग्रजापेक्षा फडणवीस हे क्रूर आहे त्यांच्याइतका जगात कुणी क्रूर व्यक्ती नसेल असा खळबळजनक आरोपही जरांगे यांनी केला.
देवेंद्र फडणवीस टार्गेट
मनोज जरांगे म्हणाले, त्यांनी (देवेंद्र फडणवीस) आपल्या जातीला खुन्नस दिली. ज्या जाती आरक्षणात जाऊ शकत नाही ज्यांची समिती नाही, आयोग, शिफारस, निवेदन, मोर्चा, उपोषण, आंदोलन नाही तरीही देवेंद्र फडणवीस यांनी जातींना आरक्षण दिले पण मराठ्यांना दिले नाही. भाजपला नाव ठेवून उपयोग नाही, भाजपचा दोष नाही, पण फडणवीसांनी जाणून बुजून आरक्षण दिले नाही. त्यांनी शिंदे समितीला काम करु दिले नाही.
..यामुळे आम्ही फडणवीसांच्या मागे लागतो
मनोज जरांगे म्हणाले, ओबीसींना आरक्षण आणि आपल्याला पंधराशे रुपये दिले. ज्या जातींनी आरक्षणच मागितले नाही त्यांना आरक्षण दिले. देवेंद्र फडणवीस प्रत्येक विषयात राजकारण करत आहे. भाजपमध्ये असलेल्यांनाही ते का आरक्षण देत नाही. शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही. देवेंद्र फडणवीसांनी मराठ्यांवर संकट उभे केले म्हणून आम्ही त्यांच्या मागे लागतो असेही त्यांनी स्पष्ट केले.
..त्यांचे सर्व डाव यावेळी उधळून लावा
मनोज जरांगे म्हणाले, या देशात इतिहास घडला पाहीजे. शंभर टक्के मतदान व्हायला हवे. मतदान करा त्यादिवशी एकाही महिलेने शेतात जायचे नाही. त्यांचे सर्व डाव यावेळी उधळून लावायचे. माझ्यावर समाजाने शंभर टक्के विश्वास टाकला आहे. काहीही करा पण समाज हरवू देऊ नका. समाज जर हरला तर सर्वांचे पाय गळतील.
-
मंगळवार,10 मार्च 2026 चे राशीभविष्य: 'या' राशींना होणार धनलाभ, कोणासाठी शुभ तर कोणासाठी अशुभ? वाचा -
संभाजीनगरचा प्रसिद्ध रील स्टार अरुण तुपेचं संशयास्पद निधन; राहत्या घरात आढळला मृतदेह, नेमकं काय घडलं -
Daily Horoscope 11 मार्च 2026 : आजचे राशीभविष्य, 'या' राशींना मिळणार नवीन संधी आणि जीवनात यश! -
IND vs NZ: बुमराह, अन् अक्षरचा फायनलमध्ये जलवा; न्युझीलंडच्या फलंदाजांना कसं केलं गारद? वाचा -
"सुप्रीम कोर्टात फक्त बंगालचीच प्रकरणे आहेत का?"; पश्चिम बंगाल SIR प्रकरणावर सरन्यायाधीशांचा संताप -
घरगुती सिलिंडर बुकिंगच्या नियमांत मोठा बदल; साठेबाजी रोखण्यासाठी सरकारने घेतला हा निर्णय -
इराण-अमेरिका युद्ध पेटलं! अमेरिकेने उद्ध्वस्त केल्या इराणच्या 'एवढ्या' युद्धनौका; तेलपुरवठा धोक्यात -
नंदकिशोर कागलीवाल यांचा गौरव; राजस्थान राज्य कृषी विद्यापीठाकडून मानद 'डॉक्टरेट' प्रदान -
8 व्या वेतन आयोगाचा काउंटडाउन सुरू! सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर; पगारवाढीसाठी सरकारचा 'हा' प्लॅन -
लाडकी बहीण होणार 'लखपती'; बिनव्याजी कर्ज आणि व्यवसायाची संधी, मुख्यमंत्र्यांनी मांडला मेगा प्लॅन! -
सोने-चांदीचे दर घसरले! सोने 8,797 रुपयांनी; चांदी चक्क 29,700 रुपयांनी स्वस्त; का घसरत आहेत दर? वाचा -
IPL 2026 Schedule : आयपीएलचा थरार 'या' तारखेपासून! RCB विजयाचा गड राखणार का? वाचा संपूर्ण वेळापत्रक









Click it and Unblock the Notifications