..म्हणून आम्ही देवेंद्र फडणवीसांच्या मागे लागलो! मनोज जरांगेंनी स्पष्टच सांगितलं 'हे' केले आरोप वाचा

Manoj Jarange declared plan criticized Devendra Fadnavis :"जे आरक्षण मागत आहे, आंदोलन पुकारत आहेत त्यांना वाऱ्यावर सोडले. ज्यांनी आरक्षण मागितलेच नाही साधी मागणीही न करणाऱ्यांना आरक्षण दिले. देवेंद्र फडणवीस प्रत्येक विषयात राजकारण करतात, त्यांनी मराठ्यांवर संकट उभे केले म्हणून आम्ही त्यांच्या मागे लागतो." अशी स्पष्टोक्ती मराठा आरक्षणकर्ते मनोज जरांगे यांनी आज दिली.

येत्या विधानसभा निवडणुकीसाठी अंतरवाली सराटीत बैठक झाली, यावेळी त्यांनी आपला निवडणूक प्लॅन जाहीर केला तेव्हा त्यांनी देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप करत आपण त्यांच्या मागे का लागलो हे स्पष्ट केले.

Manoj Jarange declared plan criticized Devendra Fadnavis

मुस्लीम -हिंदू विषयावर जरांगेंचे भाष्य

मनोज जरांगे म्हणाले, मराठ्यांनी उद्देश सोडून काम केले नाही. आम्हीही कट्टर हिंदू आहोत, आम्हाला गर्व आणि स्वाभीमानही आहे. मुस्लीम बांधवांशी चर्चा करताना सांगतो की, मी कट्टर हिंदू आहे मला माझ्या धर्माचा स्वाभीमान आहे. त्यांनाही असावा. आपल्याला धर्म नव्हे पण सत्ता परिवर्तन करायची आहे. मला हिंदुत्व मान्य पण छत्रपती शिवरायांच्या विचारांचे.

फडणवीस स्वार्थी राजकारण करतात

मनोज जरांगे म्हणाले, दंगलीसाठी यांना मराठा लागतो. रट्टे द्यायला आपण आणि तो म्हणतो मीच हाणून आलो. हिंदुत मराठा आहे, ज्यावेळी तुम्ही अडचणीत असता तेव्हा मराठा लागतो पण आम्ही आरक्षण मागतो तेव्हा तुम्ही का विरोध करता, असा सवालही सत्ताधाऱ्यांना आणि भाजपचे नाव न घेता जरांगेंनी केला. छगन भुजबळ आणि देवेंद्र फडणवीस हे हिंदू आहेत पण ते स्वार्थी राजकारण करता. अजितबात कुणाचे ऐकून भांडणं खेळायला जायचे नाही दंगलीत जायचे नाही.

हेही वाचा : मनोज जरांगेंचा इलेक्शन प्लॅन ठरला! विधानसभेला उमेदवार उभे करणार, जिथे निवडून येणार नाही तिथे पाडणार

त्यांना दंगली घडवायच्याय, जरांगेंचा आरोप

मनोज जरांगे म्हणाले, सर्वधर्मसमभाव महत्वाचा आहे. धर्म-धर्म आणि जातींनी एकमेकांच्या अंगावर यायचे नाही. ते काहीही म्हणतील पण त्यांनी आपला वापर केला. त्यांनी आपल्या रागीट आणि तापड बुद्धींचा फायदा घेत त्यांनी मलिदा खाल्ला असा आरोपही मनोज जरांगे यांनी केला. मला जे करायचे ते मराठ्याच्या हितासाठी करायचे आहे. सत्ताधाऱ्यांवर आरोप करताना मनोज जरांगे म्हणाले की, त्यांना दंगली घडवायच्या आहेत, देवेंद्र फडणवीस यांना डोके आहे की नाही असाही सवाल त्यांनी केला.

फडणवीसांवर हा खळबळजनक आरोप

मनोज जरांगे म्हणाले, मी माझ्या जीवाला जाळतो पण समाजाला रस्त्यावर येऊ देत नाही. आरक्षण मागत असताना आपल्याला सोडून दुसऱ्यांना आरक्षण देण्याची काहीच गरज नव्हती. मराठा समाजाच्या आई-बहिणींवर गोळ्या झाडल्या, इंग्रजापेक्षा फडणवीस हे क्रूर आहे त्यांच्याइतका जगात कुणी क्रूर व्यक्ती नसेल असा खळबळजनक आरोपही जरांगे यांनी केला.

शिंदे समितीला काम करु दिले नाही..!

मनोज जरांगे म्हणाले, त्यांनी (देवेंद्र फडणवीस) आपल्या जातीला खुन्नस दिली. ज्या जाती आरक्षणात जाऊ शकत नाही ज्यांची समिती नाही, आयोग, शिफारस, निवेदन, मोर्चा, उपोषण, आंदोलन नाही तरीही देवेंद्र फडणवीस यांनी जातींना आरक्षण दिले पण मराठ्यांना दिले नाही. भाजपला नाव ठेवून उपयोग नाही, भाजपचा दोष नाही, पण फडणवीसांनी जाणून बुजून आरक्षण दिले नाही. त्यांनी शिंदे समितीला काम करु दिले नाही.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+