मनोज जरांगेंचं ठरलं! मराठवाड्यानंतर 'या' 7 जिल्ह्यांत आरक्षणासाठी 7 ऑगस्टपासून शांतता रॅली
छत्रपती संभाजीनगर - मराठा आरक्षणासाठी जीवाची बाजी लावणारे मनोज जरांगे यांनी आपला आगामी नियोजन ठरवले आहे. मराठवाड्यात मराठा आरक्षण रॅलीनंतर मनोज जरांगे आता पश्चिम महाराष्ट्रातील सात जिल्ह्यांमध्ये आरक्षणासाठी रॅली काढणार आहेत.
मनोज जरांगे यांनी मराठवाड्यात मराठा आरक्षण जनजागृती रॅली काढली होती. या रॅलीला मराठवाड्यात तुफान प्रतिसाद लाभला.

यानंतर आता पश्चिम महाराष्ट्रातील सात जिल्ह्यात शांतता रॅली काढण्यात येणार आहे. मनोज जरांगे ऑफीशीयल या फेसबूक पेजवर यासंबंधीची पोस्ट करण्यात आली आहे.
येथून शुभारंभ..येथे समारोप
या रॅलीचा शुभारंभ सोलापूर येथे 7 ऑगस्टला होणार असून 12 ऑगस्टला नाशिक येथे समारोप होणार आहे. यापुर्वी मराठवाड्यातील जालना, छत्रपतीसंभाजीनर, बीड, धाराशीव, नांदेड, परभणी, लातूर, हिंगोली येथे जरांगे यांची जनजागृती रॅली निघाली होती.
अंतरवाली सराटीत बैठक
पश्चिम महाराष्ट्रात मराठा आरक्षण जनजागृती आणि शांतता रॅलीचा दुसरा टप्पा होणार आहे. अंतरवाली सराटी येथे पश्चिम महाराष्ट्राची पुर्वनियोजन बैठक पार पडली. बैठकीत ठरलेल्या शांतता रॅलीच्या तारखा पुढीलप्रमाणे आहे.
- 7 ऑगस्ट : सोलापूर
- 8 ऑगस्ट : सांगली
- 9 ऑगस्ट : कोल्हापूर
- 10 ऑगस्ट : सातारा
- 11ऑगस्ट : पुणे
- 12 ऑगस्ट : अहमदनगर
- 13 ऑगस्ट : नाशिक
मराठा बांधवांनी या रॅलीसाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असेही मनोज जरांगे यांनी सांगितले आहे. तत्पूर्वी मनोज जरांगे म्हणाले की,बीड जिल्ह्याताली शिरुर तालुक्यातील मातोरी येथे यात्रा असून मी उद्या सकाळी आठ वाजता मी तेथे दर्शन घेण्यासाठी जाणार आहे, असेही मनोज जरांगे यांनी स्पष्ट केले आहे.
सरकारला 13 ऑगस्टपर्यंत अल्टीमेटम
मराठा समाजाला गोड गोड बोलायचं हा देवेंद्र फडणवीसांचा दुसरा डाव दिसतो. ओबीसी नेते मराठा समाजाच्या अंगावर घालायचे. फडणवीस यांनी इतके छिचोरे चाळे का करायला पहिजे, एवढ्या मोठ्या नेत्यांनी. महाविकास आघाडीची आणि महायुतीची बैठक लावली होती तेव्हा पासून सगळे विरोधात बोलायला लागले. तुम्ही नेमकी तोडगा काढायला बैठक बोलवली होती की मराठ्यांविषयी प्रत्येकाला द्वेष ओकायला लावताय, असे म्हणत जरांगेंनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला. यानंतर त्यांनी आपले 20 जुलैला सुरु केलेले उपोषण काल मागे घेत सरकारला 13 ऑगस्टपर्यंत अल्टीमेटम दिला आहे.












Click it and Unblock the Notifications