Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

धनंजय मुंडे यांचे परळीपासून मुंबईपर्यंत लफडे; मनोज जरांगेंची थेट नाव घेऊन टिका

गुंडावर बोलणे म्हणजे जायीवाद आहे का, असा सवाल करत आज मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर थेट आरोप केले. कालही जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडे याचे नाव घेत थेट आरोप केले होते. आज पुन्हा जालना येथील आक्रोश मोर्चात जरांगे यांनी मुंडेंना टार्गेट केले. धनंजय मुंडे यांचे परळीपासून मुंबईपर्यंत लफडे आहेत. मला तोंड उघडायला लावू नका, असं म्हणत त्यांनी मुंडे यांच्यावर निशाणा साधला.

Manoj Jarange

जालन्यात भव्य मोर्चा

संतोष देशमुख हत्या प्रकरणाला 9 जानेवारीला एक महिना पूर्ण झाला आहे. मात्र या हत्येतील एक आरोपी अजूनही फरार आहे. धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराड याच्यावरही हत्येचा गु्न्हा दाखल झालेला नाही. तसेच परभणी येथील पोलीस कोठडीत मृत्यूमुखी पडलेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या पोलिस कोठडीतील मृत्यूचा तपासही सुरु आहे. या दोन्ही प्रकरणांमध्ये न्याय मागण्यासाठी आज जालना येथे निषेध मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात देशमुख कुटुंबिय सहभागी झाले होते. मोर्चात मनोज जरांगे, शिवसंग्राम पक्षाच्या ज्योती मेटे आदी नेते सहभागी झाले होते.

जरांगे पाटील आक्रमक

या मोर्चात बोलताना जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा धनंजय मुंडे यांच्यावर तोफ डागली. ते म्हणाले, संतोष देशमुख यांच्या न्यायची मागणी केली, यात कोणता जातियवाद आहे. धनंजय मुंडे हे स्वतःच जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. राज्यात घडणाऱ्या घटनांचा जाब हा मंत्र्यांनाच विचारला जातो. प्रश्न मंत्र्यांनाच विचारला जातो. खरी जातीय तेढ धनंजय मुंडे यांनाच निर्माण करायचा प्रयत्न चालवला आहे. धनंजय मुंडेंकडून ओबीसींच पांघरुन घेतलं जात आहे. त्यांनी जातीचं पांघरून घेऊ नये. आम्ही गुंडावर बोलायचे नाही का? असाही सवाल जरांगे पाटील यांनी केला.

मुंडे यांच्यावर गंभीर आरोप

थेट हल्लाबोल करत जरांगे म्हणाले की, धनंजय मुंडेंचे लय लफडे आहेत. परळीपासून मुंबईपर्यंत त्यांचे लफडे आहेत. मला तोंड उघडायला लावू नका. धनंजय मुंडे हे गुंड आणि लाभार्थी टोळ्या सांभाळत आहे. न्याय मागणं म्हणजे जातीयवाद नाही, अशी टीका त्यांनी मंत्री मुंडे यांच्यावर केली. 25 जानेवारीपासून आमरण उपोषणाला सुरुवात करणार आहे. तेव्हा धनंजय मुंडे यांच्यावर सविस्तर बोलेन, असा इशाराही जरांगे यांनी दिला.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+