मनोज जरांगे पुन्हा मैदानात, उद्यापासून मराठा जनजागृती रॅली,'असा'असेल सगळा कार्यक्रम

मुंबई- मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील हे पुन्हा आक्रमक झाले आहेत. ते मराठा आरक्षण शांतता जनजागृती रॅली काढणार आहेत. उद्या 6 जुलै ते 13 जुलैपर्यंत ही जनजागृती रॅली असणार आहे. ही रॅली राज्यभरात टप्प्याटप्याने घेतली जाणार आहे.

Manoj Jarange

या जनजागृती रॅलीच्या पहिल्या टप्प्यात पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, खानदेश या ठिकाणी रॅली काढली जाणार आहे, अशी माहिती मनोज जरांगे पाटील यांनी दिली.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हे पुन्हा रस्त्यावर उतरणार आहेत. उद्यापासून पुन्हा ते आक्रमक पावित्र्यात दिसतील. आपल्या मुलांच्या भविष्यासाठी घराच्या बाहेर पडाव लागेल, असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला केले आहे.

माझी मराठा समाजाला विनंती आहे की, आपल्या मुलांच्या भविष्यासाठी घराच्या बाहेर पडावं लागेल. तसेच वारंवार रस्त्यावर एकत्र यावं लागेल. येत्या 13 तारखेला आमच्या व्याख्येप्रमाणे संगेसोयरे यावर सरकार शंभर टक्के निर्णय घेईल. हैद्राबाद गॅझेट लागू होईल. तर सातारा संस्थान आणि बॉम्बे गव्हर्नमेंटचा पण जीआर लागू होईल, असेही मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले आहे.

जरांगेंचे शांततेचे आवाहन

मराठा आंदोलनामुळे आपल्या पदरात आरक्षण पडत आहे. यामध्ये कोणीही राजकारण आणू नये. सगळे घराच्या बाहेर पडाले तरच न्याय मिळणार आहे. मराठा आता निर्णायक झाला आहे. कोणी आपल्या पक्षाकडे बघून समाजाची हानी होणार नाही याची काळजी घ्या. मराठा आरक्षणाच्या विरोधात असणाऱ्याला मराठा आमदारांना ताकद देऊ नका, असेही मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.

राजकारण आणू नये

जनजागृती रॅली हे शक्तिप्रदर्शन नाही. तसेच हा निवडणुकीचा विषयही नाही. आम्ही आमच्या मागण्यासाठी एकत्र येत आहोत. सध्या कामाचे दिवस आहेत, मात्र जे आहेत ते समाज बांधव एकत्र येतील. एकत्र आल्याशिवाय आपल्याला यश मिळणार नाही. आपल्या मागणीसाठी आपण एकत्र येतोय. त्यात राजकारणाचा विषय नाही, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+