आरक्षणाची आशा संपली! फडणवीसांची चाल यशस्वी! आता त्यांचा सुपडा साफ करणार - मनोज जरांगेचा इशारा
Manoj Jarange accuses Devendra Fadnavis : मराठ्यांची पोरं मोठी होऊ द्यायची नाही. मराठ्यांची पोरं भिकेला लागावी हा देवेंद्र फडणवीस यांचा हेतू होता मराठा समाजाला आरक्षण द्यायचे नाही ही देवेंद्र फडणवीसांची चाल यशस्वी झाली आहे, पण आता मी आणि मराठा समाज त्यांचा सुपडा साफ केल्याशिवाय शांत बसणार नाही असे वक्तव्य वजा इशारा मराठा आरक्षणकर्ते मनोज जरांगे यांनी दिला. ते आज पत्रकार परिषदेत बोलत होते.
आचारसंहीता लागली आता आरक्षणाची आशा संपली
मनोज जरांगे म्हणाले,मराठा समाजाला या सरकारकडून आरक्षण मिळावे ही आशा होती. मी ज्या आशेवर होतो ती आता संपली आहे. मराठ्यांना आचारसंहितेआधी आरक्षण मिळेल पण ती आशा आता संपली आहे. गोरगरीब मराठ्यांना ही आशा होती. देवेंद्र फडणवीसांनी मराठ्यांचे आयुष्य बेचिराख व्हावे असे त्यांचे मनसुबे होते. हे प्रयत्न सरकारच्या वतीने झाले. सत्तेचा वापर मराठ्यांच्या विरोधात देवेंद्र फडणवीस यांनी केला. मराठ्यांच्या लेकरांचे मुडदे पाडून हे सरकार कधीच पापाचा वाटेकरी होणार नाही ही जी आशा होती ती धुळीस मिळाली आहे.

मराठ्यांशी फडणवीस आकसाने वागले
मनोज जरांगे म्हणाले, वैचारिक मतभेत असावेत पण आमचे आंदोलन आणि मराठा समाज काही केल्या एकत्र ठेवायचा नाही आरक्षण द्यायचे नाही. जर मराठ्यांची पोरं मोठे होऊ नये, मराठ्यांची पोरं भिकारी झाले पाहीजे हे वचन देवेंद्र फडणवीसांनी उचलले होते. या तत्वाने आकसाने ते मराठ्यांशी वागले आणि त्यांनी त्यांची चाल यशस्वी केली.
मराठ्यांना मोजत नाही फडणवीसांनी दाखवून दिले
मनोज जरांगे म्हणाले, मराठ्यांना फडणवीसांनी डिवचले आहेत. त्यांनी त्यांचे काम केले आता आम्ही आमची काम करु. ओबीसींसह सतरा जातींना त्यांनी आरक्षण दिले पण मराठ्यांना दिले नाही ही त्यांची खुन्नस मराठा समाजाच्या लक्षात आली. शेवटी त्यांनी त्यांचे विचार बाहेर आणले. आम्ही मराठ्यांना मोजत नाही हे त्यांनी दाखवून दिले. मराठ्यांना बाजूंना ठेवून सत्तेला बसू पण मराठ्यांना आरक्षण देणार नाही हे त्यांनी ठरवले होते. त्यांनी जेही हे ठरवले आता मत द्यायचे की नाही हे आमच्या हातात आहे हेही देवेंद्र फडणवीसांनी लक्षात ठेवावे.
सुपडा साफ केल्याशिवाय थांबणार नाही
मनोज जरांगे म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांनी सत्तेचा गैरवापर त्यांनी केला पण त्यांचा सुपडा साफ केल्याशिवाय मी शांत बसणार नाही. आता मतदानात मराठ्यांची ताकद दाखवा आणि ज्यांनी आरक्षण दिले नाही त्यांना हरवा. एकही मतदान यावेळी वाया घालू नका. अस्तित्वाची लढाई सुरु आहे मराठा समाजाला हरवू नका. सरकारने जातीवाद करुन त्यांची जबाबदारी त्यांनी दूषित करुन टाकली. मतं तुमच्याजवळ आहेत योग्य टायमिंग साधुन मराठा समाज कसा मोठा होईल यासाठी वापर करा.












Click it and Unblock the Notifications