राज्यात पुढील दोन दिवस वादळी वा-यासह पाऊसाची शक्यता, हवामान खात्याकडून या 10 जिल्ह्यांना अलर्ट जारी
Maharashtra Weather Update : मागील दोन दिवसापासून राज्यातील अनेक भागात वातावरणात बद्दल होत आहे. राज्यातील काही भागात अवकाळी पाऊसचं संकट आहे. काही जिल्ह्यात ऊन पावसाचा खेळ सुरु आहे. राज्यात पुढील दोन दिवस मेघगर्जनेसह हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे, असा अंदाज भारतीय हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.
भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुणे, जालना, अहिल्यानगर, नाशिक, मुंबई या जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि धुळेसाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.या जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह पावसाच्या मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आलं
आहे.

महाराष्ट्रातील जळगाव, पुणे, जालना, अहिल्या नगर आणि नाशिक जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. या जिल्ह्यामध्ये वादळी वा-यासह अवकाळी पावसाची शक्यता आहे. तसेच मुंबईत २ एप्रिलपर्यंत हलक्या पावसाची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबईत उष्णतेचा परिणाम दिसून येत होता, परंतु हवामान विभागाच्या मते, पुढील काही मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
सध्या किनारपट्टी भागात कधीही पाऊस पडू शकतो अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. पुढील दोन दिवस अवकाळी पाऊस होणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. ढगाळ हवामानामुळे आंब्यावरती सुद्धा मोठा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे कोकणातील आंबा उत्पादक शेतकरी चांगलेच धास्तावले आहे. तसेच किनारपट्टी भागात ताशी 40 किलोमिटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. या किनारपट्टी भागात दोन दिवसांपासून ढगाळ हवामान, एकीकडे राज्यात उष्णतेची लाट पसरली आहे.
#BREAKING: IMD issued an orange alert for Jalgaon, Pune, Jalna, Ahilya Nagar, and Nashik, predicting light showers in Mumbai till April 2. A yellow alert is in place for Thane, Raigad, Ratnagiri, and Dhule pic.twitter.com/ypU4uF5hgf
— IANS (@ians_india) April 1, 2025
हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, कोकण, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर, ठाणे या जिल्ह्यात वादळी वा-यासह पावसाची शक्यता आहे. तसेच महाराष्ट्रातील धुळे, नाशिक, नंदुरबार, अहिल्यानगर,सांगली, सातारा आणि कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये देखील वादळी वा-यासह पावसाची शक्यता वर्तवली आहे. या सर्व जिल्हांना हवामान खात्याने येलो जारी केला आहे. 1 एप्रिल रोजी पुणे, अहिल्यानगर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जालना, जळगाव या जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.












Click it and Unblock the Notifications