महाराष्ट्रसह विदर्भात मुसळधार पाऊस कोसळणार, 'या' जिल्ह्यांना पावसांचा अलर्ट
मुंबई : राज्यात गणपती बाप्पाचं आगमन झाल्यापासून राज्यातील काही भागात पावसाचा जोर वाढला आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार पुढील 24 तासांमध्ये महाराष्ट्रसह विदर्भातील काही मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबई, ठाणे आणि पालघर या जिल्ह्यात पावसाची उघडझाप पाहायला मिळेल. विदर्भातील भंडारा आणि गोंदियासह कोकणातील काही जिल्ह्याला पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. काल रात्रीपासूनच जिल्ह्यातील विविध परिसरामध्ये कोसळणारा मुसळधार पाऊस आता ओसरताना दिसतोय.
या जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट
दरम्यान कोकणातील रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी तर मध्य पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा आणि कोल्हापूर तर विदर्भातील भंडारा गोंदिया, अमरावती, नागपूर जिल्ह्याला पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला. त्यामुळे नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी असं आवाहन करण्यात आलं आहे.

मागील आठवड्यापासून विदर्भातील भंडारा गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्याला पावसाने चांगलंच झोडपून काढलं आहे. या मुसळाधार पावसाने राज्यातील शेतक-याचं अतोनात नुकसान झालं आहे. जिल्ह्यातील नदी नाले ओसंडून वाहत आहेत. वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत होत झालेली वाढ पाहता गोसेखुर्द धरणाचे दरवाजे उघडण्यात आले आहेत. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तर राज्यातील बहूतांश धरण पूर्ण भरले आहेत.
राज्यातील अनेक भागांमध्ये गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे, या पावसाचा मोठा फटका हा शेतकऱ्यांना बसला आहे. मराठवाडा आणि विदर्भातील पावसामुळे मोठं नुकसान झालं आहे. या पावासाच कापसाला मोठा फटका बसला असून, अनेक ठिकाणी मोठं शेतक-याचं नुकसानं झालं. पुढील 24 मध्यम ते मुसळधार स्वरुपाच्या पावासाचा इशारा देण्यात आला आहे.












Click it and Unblock the Notifications