Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

maharashtra weather : महाराष्ट्रात आज कुठे सूर्य ओकणार अन् कुठे मिळाला पावसाचा इशारा, जाणून घ्या

Maharashtra Weather Update News : महाराष्ट्रात उष्णतेच्या प्रचंड झळा लागत आहेत. कमाल तापमानाची आग धगधगतच आहे. नागरिक देखील वाढत्या तापमानामुळे हैराण झालेले आहेत. एकीकडे उप्षणतेची ही परिस्थिती असताना दुसरीकडे महाराष्ट्रात येत्या 4 दिवसात विदर्भ, मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात काही जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा आयएमडीने इशारा दिला आहे.

एकीकडे तापमानाचा उच्चांक वाढत असताना राज्यभर आज प्रचंड उकाडा वाढलाय. मराठवाड्यात अनेक भागात ढगाळ वातावरण होते. विदर्भात काही जिल्ह्यांना पावसाचा हायअलर्ट देण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्रातही हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. महाराष्ट्रात कसे हवामान असेल?, याविषयी सविस्तरपणे जाणून घेऊया...!

maharashtra weather update

हवामान विभागाचा अंदाज काय?

महाराष्ट्र कर्नाटक मध्यप्रदेश सह 24 राज्यांमध्ये आता वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, आसाम बिहार तसेच पश्चिम बंगालच्या भागात चक्रकार वाऱ्यांची स्थिती सक्रिय आहे. त्यामुळे महाराष्ट्रात मध्य महाराष्ट्र विदर्भ व मराठवाड्यात काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय.

विदर्भातील काही जिल्ह्यात अवकाळीची शक्यता

रविवारपासून म्हणजेच आजपासून (27 एप्रिल) विदर्भात अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आलाय. यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली या तीन जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून इतर जिल्ह्यांना येलो अलर्ट आहे.

मराठवाड्यात जालना, परभणी, बीड, हिंगोली या जिल्ह्यांना उष्ण व दमट हवामानाचा यलो देण्यात आलाय. तर नांदेड, लातूर, धाराशिव, बीड जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे. सोलापूर, सांगली ,सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांना अवकाळी पाऊस झोडपणार असल्याची शक्यता आयएमडीने वर्तविली आहे.

दिल्लीत हवामान कसे असेल?

भारतीय हवामान विभागाच्या (IMD) मते, दिल्ली-एनसीआरमध्ये आज ढगाळ वातावरण राहील आणि हलक्या पावसाची शक्यता आहे. शनिवारी, २६ एप्रिल रोजी दिल्लीतील अनेक भागात हवामानात अचानक बदल दिसून आला, जोरदार वाऱ्यांमुळे उष्णतेपासून दिलासा मिळाला. दिल्लीतील अनेक भागात पिवळा इशाराही जारी करण्यात आला आहे. आज दिल्लीच्या काही भागात ३०-४० किमी प्रतितास वेगाने जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे. दिल्लीतील कमाल तापमानात कोणताही बदल होणार नाही.

हवामान अंदाज: देशातील इतर राज्यांमध्ये हवामान कसे असेल?

🔴 बिहारमध्ये हलका ते मध्यम पाऊस आणि गडगडाटासह पाऊस पडेल, विशेषतः पटना, गया आणि भागलपूर सारख्या भागात. आयएमडीने पाऊस आणि वादळासाठी पिवळा इशारा जारी केला आहे.

आज वाऱ्याचा वेग 40-50 किमी/ताशी होण्याची अपेक्षा आहे. तापमान कमाल 35-37 अंश सेल्सिअस आणि किमान 22-24 अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता आहे.

🔴 पुढील काही दिवसांत झारखंडमध्येही पावसाची शक्यता आहे. रांची, देवघर आणि धनबाद सारख्या शहरांमध्ये मध्यम पाऊस आणि गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. कमाल तापमान 34-36 अंश सेल्सिअस दरम्यान राहील, तर किमान तापमान 21-23 अंश सेल्सिअसच्या आसपास राहील.

🔴 राजस्थानमध्ये तीव्र उष्णतेची परिस्थिती कायम राहील. जैसलमेर, बारमेर आणि बिकानेर सारख्या भागात कमाल तापमान 43-46 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचू शकते. आ

यएमडीने या प्रदेशासाठी उष्णतेच्या लाटेचा इशारा जारी केला आहे. पश्चिम राजस्थानच्या काही भागात हलके धुळीचे वादळ येऊ शकते, परंतु पाऊस अपेक्षित नाही. पूर्व राजस्थान कोरडे राहील आणि तापमान 40-42 अंश सेल्सिअस दरम्यान राहील.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+