Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

शरद पवारांनी दुबईत जाऊन घेतली दाऊदची भेट; पहा, प्रकाश आंबेडकरांनी नेमका काय केलाय गौप्यस्फोट

मुंबई : शरद पवार हे 1988 ते 91 या काळात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. त्यावेळी त्यांनी थेट दुबईत जाऊन कुख्यात गुंड दाऊद इब्राहीमची भेट घेतली होती. नुसती भेट घेतली नाही तर त्यावेळी त्यांना सोन्याचा हारही घातला गेला होता, असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला. मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत आंबेडकरांनी हा गौप्यस्फोट केल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ उडाली.

नेमके काय म्हणाले आंबेडकर?

मुंबईत प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी राष्ट्रवादीचे ज्येष्ठनेते शरद पवारांवर मोठे आरोप केले. ते म्हणाले, शरद पवार हे 1988-91 या काळात मुख्यमंत्री होते. त्यावेळी त्यांनी एकदा लंडन दौरा केला होता. त्याच दौऱ्यात ते कॅलिफोर्नियाला गेले. तेथे दोन दिवस राहिले. कॅलिफोर्नियात त्यांची मीटिंग कोणासोबत झाली, त्याचा खुलासा त्यांनी आता करावा. कॅलिफोर्नियामधून शरद पवार पुन्हा लंडनला आले. तेथे दोन दिवस मुक्काम केला. तेथून ते दुबईला गेले. दुबई विमानतळावर त्यांची दाऊद इब्राहीमसोबत भेट झाली. त्यांना तेथे सोन्याचा हार घालण्यात आला, असा खळबळजनक दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला.

Sharad Pawar On Prakash Ambedkar

त्या वेळच्या केंद्र सरकारवही केला आरोप

आंबेडकरांनी केंद्र सरकारवही आरोप केले. ते म्हणाले, कोणत्याही मुख्यमंत्र्‍याला केंद्राची परवानी घेतल्याशिवाय दौऱ्यावर जाता येत नाही. मग 1988-91 या पवारांच्या मुख्यमंत्री पदाच्या काळात त्यांनी विदेश दौऱ्यासाठी केंद्राची परवानगी घेतली होती का? केंद्र सरकारने त्यांना कॅलिफोर्नियात जाण्याची परवानगी दिली होती का? जर परवानगी दिली असेल, तर तेथून दुबईला जाऊन दाऊदची भेट घेण्याचीही परवानगी केंद्र सरकारने दिली होती का? त्यावेळी शरद पवारांनी विदेशात ज्या बैठका घेतल्या त्याचा अहवाल केंद्र सरकारला दिला होता का? असे प्रश्न ॲड. आंबेडकरांनी या पत्रकार परिषदेत उपस्थित केले.

आंबेडकरांच्या आरोपानंतर खळबळ

महाराष्ट्रात सध्या विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत आहेत. त्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांच्या नेत्यांचे दौरे सुरु आहेत. शरद पवारांनी लोकसभा निवडणुकीत आपला करिश्मा दाखवला. आता विधानसभा निवडणुकीतही ते करिश्मा दाखविण्याच्या मूडमध्ये आहेत. मात्र ऐन निवडणुकीच्या तोंडावर प्रकाश आंबेडकरांनी पवारांवर खळबळजनक आरोप केल्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली. आंबेडकरांच्या या प्रश्नाला शरद पवार उत्तर देतील का, ते काय उत्तर देतील, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+