धर्म विचारुन गोळ्या घालण्याएतका वेळ अतिरेक्यांकडे होता का..? 'त्या' नेत्याचे वक्तव्य; राजकारण तापले
जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे २२ एप्रिलला दहशतवादी हल्ला झाला. त्यानंतर सुरु झालेला राजकीय गोंधळ थांबण्याचे नाव घेत नाही. या हल्ल्याबाबत आता काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी एक धक्कादायक विधान केले आहे. धर्म विचारुन गोळ्या घालण्याएवढा वेळ अतिरेक्यांकडे असतो का? त्यांनी केला. त्यानंतर या विधानावर सत्ताधारी महायुती सरकारने चांगलाच निशाणा साधला. वडेट्टीवारांच्या या विधानावरुन सध्या महाराष्ट्रात चांगलाच गदारोळ सुरु आहे.

काय म्हणाले होते वडेट्टीवार?
एका कार्यक्रमात बोलताना वडेट्टीवार यांनी पहलगाम हल्ल्यावरुन सरकारवर निशाणा साधला. ते म्हणाले, 'पहलगाम दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी सरकारने स्वीकारली पाहिजे. ते म्हणत आहेत की, दहशतवाद्यांनी लोकांना धर्म विचारला आणि नंतर त्यांना मारले. हे सर्व करण्यासाठी दहशतवाद्यांना वेळ आहे का..? काही लोक म्हणतात की हे घडलेच नाही. दहशतवाद्यांना जात किंवा धर्म नसतो. यासाठी जबाबदार असलेल्यांना पकडा आणि कारवाई करा. ही देशाची भावना आहे. तथापि, काँग्रेस नेत्याने त्यांच्या विधानावर स्पष्टीकरण दिले आहे.
वडेट्टीवारांनी स्वतः दिले स्पष्टीकरण
वडेट्टीवार यांच्या या विधानावर महाराष्ट्रात तीव्र प्रतिक्रीया उमटल्या. प्रकरण चिघळत असल्याचे पाहून, त्यांनी नंतर आपल्या विधानाचे स्पष्टीकरण दिले. ते म्हणाले की, 'दहशतवादी येऊन लोकांना मारत होते. कोणीही जात किंवा धर्म विचारत नव्हते. जर धर्माबद्दल विचारले तर याचा अर्थ असा की त्यांचा हेतू देश अस्थिर करणे, समुदाय आणि धर्मांमध्ये फूट पाडणे आणि देशाचे नुकसान करणे असू शकते. जेव्हा भारतातील दहशतवाद्यांनी लोकांना कलमा म्हणण्यास सांगितले तेव्हा त्यामागील पाकिस्तानचे राजकीय हेतू स्पष्टपणे दिसून येतात. दहशतवाद्यांना जात नसते, धर्म नसतो. हे लक्षात घेऊन आपण देशाचे विभाजन करू नये. त्यांचा उद्देश देशाला उद्ध्वस्त करणे आहे, असे वडेट्टीवारांनी सांगितले.
काय म्हणाले फडणवीस?
वडेट्टीवारांच्या विधानाचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही जोरदार समाचार घेतला. ते म्हणाले, अशी वक्तव्ये करुन काँग्रेस व त्यांचे नेते मृत्यूमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांच्या जखमेवर मीठ चोळत आहेत. नातेवाईकांचं म्हणणं सगळ्यांनी दाखवलं. ज्यांच्या समोर मारलं त्या नातेवाईकांनी खरी परिस्थिती सांगितली. मग इथे बसून वडेट्टीवारांनी अशी वक्तव्ये अतिशय वाईट आहे. याला मुर्खपणा म्हणवं की आणखी काय हे समजत नाही, अशा शब्दांत फडणवीसांनी वडेट्टीवारांना धो-धो धूतलं.
वडेट्टीवार असंवेदनशील
फडणवीस पुढे म्हणाले की, वडेट्टीवार हे असंवेदनशील आहेत. ज्यांच्या हत्या झाली त्यांच्या कुटुंबियांना खोटे ठरविणे म्हणजे असंवेदनशीलताच आहे. विजय वडेट्टीवारांना पिडीतांचे कुटुंब कधीही माफ करणार नाही. असे मुर्खपणाचे विधान करणं म्हणजे आपले जे शत्रू आहेत त्यांना प्रोत्साहन देण्यासारखंच आहे, असंही फडणवीसांनी स्पष्ट केलं.












Click it and Unblock the Notifications