Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

जय जय महाराष्ट्र माझा हे गीत कुणी लिहिले? कसे बनले राज्यगीत अन् कुणी सर्वप्रथम गायले वाचा इतिहास

Maharashtra Day 2025 Jai Jai Maharashtra Majha State Song : आज 1 मे 2025 महाराष्ट्र दिन..या दिनी प्रत्येकाच्या ओठांवर जय जय महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र माझा हे गीत आहे. हे गीत आता महाराष्ट्राचे अधिकृत राज्यगीत बनले आहे. पहाडी आवाजातील हे गीत जेव्हा आपण ऐकतो तेव्हा हृदयात स्फुर्ती -स्फुरण चढते. हे स्फुर्ती गीत जे तुमच्या आमच्या मनात वसलेले आहे ते कुणी गायले अन् कुणी लिहीले हे बहुदा अनेकांना माहीत नाही.

महाराष्ट्राचे गुणगान करणारे हे गीत देशभक्तीपर गीत आहे आणि त्याचा मोठा इतिहासही आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात हे गीत प्रेरणादायी ठरले आणि आजही ते लोकांच्या हृदयात आहे. चला तर या गीताविषयीचा इतिहास आणि सर्व माहिती जाणून घेऊया.

Maharashtra Day 2025

कुणी लिहिले महाराष्ट्र गीत?

नागपूर येथे जन्मलेले संपादक, चित्रपट अभिनेते आणि लेखक नाटककार कथाकार आणि गायक अशा क्षेत्रातील तेजस्वी तारा असलेले राजा निळकंठ बढे यांनी हे गीत लिहिले आहे. तर भारताचे प्रसिद्ध संगीतकार श्रीनिवास खळे यांनी या गिताला संगीत दिले होते.

कुणी गायले महाराष्ट्र गीत?

जय जय महाराष्ट्र माझा हे महाराष्ट्र गीत लोकशाहिर कृष्णराव उर्फ शाहीर साबळे यांनी गायलेले आहे. लोकशाहीर म्हणून ते प्रसिद्ध होते आणि भारताच्या स्वातंत्र्यचळवळीत आणि संयुक्त महाराष्ट्रासाठी झालेल्या चळवळीत त्यांचे मोठे योगदान होते. 'जय जय महाराष्ट्र माझा' हे महाराष्ट्र राज्याभिमानगीत आणि 'महाराष्ट्राची लोकधारा' या प्रयोगांसाठी शाहीर साबळे प्रामुख्याने ओळखले जातात. शाहीर साबळे हे नाव महाराष्ट्रातील शाहीरी परंपरेतील मोठे नाव असून पहाडी आवाज त्यांचा आजही महाराष्ट्राच्या मनात ठसलेला आहे.

महाराष्ट्र सरकारकडून राज्यगीत म्हणून गौरव

हे गाणे महाराष्ट्र सरकारच्या अधिकृत कार्यक्रमांत मोठ्या प्रमाणावर वापरले आणि वाजवले जाते. मूळ गीत तीन कडव्यांचे असून राज्यगीत दोन कडव्यांचे आहे. 31, जानेवारी 2023 मंत्रीमंडळाने हे गीत राज्यगीत असल्याचा निर्णय घेतला आहे.

या गीताची काय आहे खासीयत?

  • 'जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा' या गाण्याला राज्यगीत म्हणून मान्यता देण्यात आली आहे.
  • या गीतातून महाराष्ट्र राज्याचा इतिहास, संस्कृती आणि उत्सवांचे वर्णन करण्यात आलेले आहे.
  • समस्त मराठी जनांचा अभिमान हे गीत आहे, हे गीत सर्वच शासकीय कार्यक्रम आणि सांस्कृतिक कार्यक्रमात वाजवले जाते.

काय आहे या गिताचा इतिहास?

1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली, यावेळी मुंबईतील दादर येथील शिवाजी पार्कवरलेल्या महाराष्ट्र दिनाच्या समारंभात शाहीर साबळे यांनी राज्याचे पहिले मुख्यमंत् यशवंतराव चव्हाण यांच्यासमोर हे गीत गायले होते. तेथूनच हे महाराष्ट्राचे स्फुर्ती गीत म्हणून जनतेच्या मनात ठसले.

किती मिनिटांचे आहे राज्यगीत?

जय जय महाराष्ट्र माझा हे गीत 1.15 ते 1. 30 मिनिट चालेल. कार्यक्रमाची सुरुवात या गिताने होते तर कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने होईल असा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने हे गीत राज्यगीत असल्याचा निर्णय घेतला तेव्हा जाहीर केले होते.

हे आहे महाराष्ट्र राज्याचे गीत

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ॥धृ॥

भिती न आम्हा तझी मुळी ही गडगडणाऱ्या नभा

अस्मानाच्या सुलतानीला जबाब देती जिभा

सह्याद्रीचा सिंह गजर्तो शिव शंभू राजा

दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ॥१॥

काळ्या छातीवरी कोरली, अभिमानाची लेणी

पोलादी मनगटे खेळती, खेळ जीव घेणी

दारीद्र्यांच्या उन्हात शिजला

निढळाच्या घामाने भिजला

देश गौरवासाठी झिजला

दिल्लीचे ही तख्त राखितो, महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा ॥२॥

गीत : राजा बढे
संगीत : श्रीनिवास खळे
स्वर : शाहीर साबळे

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+