शरद पवारांनी ठरवला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री..? थेट नावच सांगून टाकलं
मुंंबई : येत्या महिनाभरात राज्यातील विधानसभा निवडणुका होतील. दोन दिवसांपूर्वी महायुतीने पत्रकार परिषद घेत सरकारचं रिपोर्ट कार्ड सादर केलं. याच पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना महायुतीचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी शरद पवारांना आव्हान देत आधी महाविकास आघाडीने चेहरा सांगावा, असं विधान केलं होतं. त्यानंतर शरद पवार यांनी एक असं वक्तव्य केलं ज्यामुळे देवेंद्र फडणवीस यांचं आव्हान शरद पवारांनी स्वीकारलं का? अशी चर्चा सुरु झाली आहे.
शरद पवार अगदी मनातलं बोलले
शिवस्वराज यात्रेचा नुकताच समारोप झाला.या वेळी केलेल्या भाषणात शरद पवारांनी त्यांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याबाबत मोठं वक्तव्य केलं.ते म्हणाले की,जयंत पाटील यांच्यावर मोठी जबाबदारी असणार आहे. महाराष्ट्राचा विकास करण्यासाठी आणि राजकीयदृष्ट्याही राज्याने प्रगती करण्यासाठी जयंत पाटील यांच्यावर मोठी जबाबदारी असेल. सध्याच्या घडीला महाराष्ट्राचा कारभार चुकीच्या हातांमध्ये आहे.त्याचा फटका सगळ्या राज्याला बसला आहे.

महायुतीमुळे महाराष्ट्राची जी प्रतिमा मलीन झाली.ती सुधारण्याची आवश्यकता आहे.यशवंतराव चव्हाण यांच्या काळात जसा महाराष्ट्र होता, तसा महाराष्ट्र घडवण्याची आवश्यकता आहे. राज्याचा विकास जयंत पाटील योग्य पद्धतीने करु शकतात याची मला खात्री आहे. शरद पवार यांच्या या वक्तव्यानंतर जयंत पाटील हेच महाविकास आघाडीचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार असतील का..? या चर्चा सुरु झाल्या आहेत.
देवेंद्र फडणवीसांनी काय दिलं होतं आव्हान?
महायुतीचं रिपोर्ट कार्ड सादर केलं. त्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट शरद पवारांना आव्हान दिलं. फडणवीस म्हणाले, सत्ता पक्षाला कुठलीही चिंता नाही. मुख्यमंत्री स्वतःच इथे आमच्याबरोबर बसले आहेत. त्यांना विचारा तुमचा चेहरा कोण. माझं शरद पवारांना खुलं आव्हान आहे, शरद पवारांनी तुमचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण ते सांगावं? त्यानंतर शरद पवारांनी शिवस्वराज यात्रेत केलेल्या वक्तव्याला महत्व प्राप्त झालं आहे.
शरद पवार पुढे म्हणाले, जयंत पाटील यांनी सात हजार किमीची शिवस्वराज्य यात्रा काढली. तसंच ते सुमारे 76 मतदारसंघांमध्ये गेले होते. आपलं राज्य विकासाच्या बाबतीत खालच्या क्रमांकावर फेकलं गेलं आहे. जयंत पाटील यांनी राज्याचा दौरा केला आणि त्यांनी लोकांमध्ये आशा पल्लवित केल्या. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून माझी खात्री आहे की ते महाराष्ट्राला योग्य दिशा देतील.












Click it and Unblock the Notifications