महाराष्ट्रात गद्दारांना माफी नाही; शेतकरी हमीभाव मागतो अन् मोदी 370 सांगतात : ठाकरेंचा हल्लाबोल
Maharashtra Assembly Election 2024 : मी वचन पाळणारा, तुम्ही देखील वचन पाळणार ना, सांगोल्यातून दीपक अण्णा यांना विजयी करणार ना. अशी साद माजी मुख्यमंत्री तथा ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगोलाकरांना घातली. ते प्रचारसभेत बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी मोदी-शहा यांच्यावर जोरदार हल्लाबोल चढवला. तर महाराष्ट्राचा इतिहास आहे की, येथे गद्दारांना कधीही माफी मिळत नाही, असे म्हणत त्यांनी शिंदेंच्या शिवसेनेवर जोरदार निशाणा साधला.
उद्धव ठाकरे म्हणाले की, मला मुख्यमंत्री पदाची स्वप्न पडत नाही, तर महाराष्ट्राची स्वप्न पडताहेत, सगळेच जर का लाचार झाले तर महाराष्ट्र कुणाचा राहिल. मोदी शहांचा महाराष्ट्र करायचा आहे का, सांगोल्यात एमआयडीसी का झाली नाही, आपले सरकार आल्यानंतर प्रत्येक जिल्ह्यात शिवरायांचे मंदिर बांधणार आहे. पंधराशे रुपयात काय मिळतेय, आनंदाच्या शिद्यामध्ये लेंड्या मिळतात, इतकी वाईट परिस्थिती आहे.

उद्धव ठाकरे म्हणाले की, आपले सरकार आल्यानंतर जीवनावश्यक पाच वस्तूच्या किमती पुढील पाच वर्षे स्थिर ठेऊन दाखवणार मुलींना मोफत शिक्षण मिळतं तसेच महाराष्ट्रातील प्रत्येक मुलाला मोफत शिक्षण देणार म्हणजे देणारच. प्रत्येक शेतकऱ्याचे कर्जमाफ केले जाणार मी कधीही खोटं बोलत नाही, असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला.
उद्धव ठाकरे पुढे बोलताना म्हणाले की, संत गाडगेबाबा हे काही उमेदवार नव्हते, पण त्यांनी माणुसकीची शिकवण दिली. पण त्यांची माणुसकीची शिकवण येथे विसरण्याचे काम केले जात आहे. जर कोणी धर्माधर्मामध्ये जातीजातीमध्ये तेढ निर्माण करुन करुन सत्ता मिळवू पाहत असेल तर त्यांना धडा शिकवा. असल्या लोकांसोबतचे मला हिंदूत्व देखील मान्य नाही.
उद्धव ठाकरे म्हणाले की, शिवसेनाप्रमुखांचा विचार घेऊनच मी पुढे चाललो आहे. मी बाळासाहेबांचा एकही विचार सोडलेला नाही. भाजपला कुणी विचारत देखील नव्हतं. पण त्यांना आम्ही खांद्यावर घेऊन गेलो. आता तेच आमच्या डोक्यावर बसले आहेत. पण त्यांच्या लक्षात आलं नाही. या निवडणुकीत भाजपला खांदा द्यायचा तो थेट संपविण्यासाठीच, असा हल्लाबोल त्यांनी केला.
उद्धव ठाकरे म्हणाले की, सांगोल्याचे सद्याचे आमदाराला किती माज आहे. मी आलोय त्यांचा माज उतरवलाय, मी गद्दारांना संपविण्यासाठी आलो आहे. महाराष्ट्र कधीही गद्दारांना माफ करत नाही. टकमक टोकावरुन तुझा कडेलोट करतील बघ, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी शहाजीबापू यांच्यावर निशाणा साधला.
शेतकरी हमीभाव मागतो हे कलम 370 सांगतात
विदर्भ, मराठवाड्यातील शेतकरी अडचणीत आहे. अन् मोदी-शहा महाराष्ट्रात येऊन सांगतात की कलम ३७० हटवले, पण कुठे येऊन कोणता विचार मांडत आहात. महाराष्ट्रातील जनता हमीभाव मांगत असताना तुम्ही राम मंदिर बांधल्याचे सांगायचे. कारण, पुन्हा हिंदू-मुस्लिम वाद निर्माण करायचा. येथील मुलभूत प्रश्न सोडविण्याची गरज आहे. मुंबई ही अदानी यांच्या घशात घालण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे जागे व्हा, नाहीतर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर अदानींचे नाव येईल. मोदी शहांनी येथे येऊन टफली मारून जाण्याचे काम सुरू केले आहे, असे म्हणत ठाकरेंनी जोरदार हल्लाबोल चढवला.
गेल्यावेळीच दीपक आबांना तिकीट देणार होतो
गेल्यावेळीच दिपक आबा साळुंखे पाटील यांना मी उमेदवारी देणार होतो पण, मध्येच धरण फोडणारा खेडका घुसला, असे म्हणत शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंत्री तानाजी सावंत यांच्यावर टीका केली. त्याने सांगितलं साहेब माझं एका हा 100 टक्के निवडून येतो असे म्हणून शहाजीबापू पाटील यांना तिकीट द्यायला लावल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले.












Click it and Unblock the Notifications