Maharashtra Assembly Election मोठी अपडेट! 'या' दिवशी लागणार आचारसंहिता; आज मंत्रीमंडळाची शेवटची बैठक
Maharashtra Assembly Election 2024 : मंत्रालयातील हालचाली पाहता व उद्या निवडणूक आयोग पत्रकार परिषद घेण्याची शक्यता लक्षात घेता, येत्या दोन दिवसांत आचारसंहिता लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत.
नोव्हेंबरमध्ये सध्याच्या मंत्रीमंडळाची मुदत संपेल. हा कालावधी पाहता वेळेत निवडणुका घेण्याचा, निर्णय निवडणूक आयोग घेऊ शकतो. राज्यात विधानसभा निवडणुका कधी जाहीर होणार आणि आचारसंहिता कधीपासून लागेल, याबाबत चर्चा सुरु झाल्या आहेत. आचारसंहिता कधीपासून लागू होईल, यासंदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार येत्या दोन दिवसांच्या आत विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याची दाट शक्यता आहे.

निवडणूक आयोगाची उद्या पत्रकार परिषद
सध्या मंत्रालयातील हालचाली गतीमान झाल्या असून, सुट्टीच्या दिवशीही अधिकारी व कर्मचारी मंत्रालयात काम करताना दिसत आहेत. काल रविवारी सुटीच्या दिवशीही सामाजिक न्याय विभागाचे सात शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आले. आज पुन्हा सकाळीच मंत्रिमंडळाची बैठक सुरु झाली आहे. महायुती सरकारची ही शेवटची मंत्रिमंडळाची बैठक ठरण्याची शक्यता आहे. त्यासाठी आज मोठ्या प्रमाणावर निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले जाणार आहे. उद्या निवडणूक आयोग पत्रकार परिषद घेऊन राज्याच्या विधानसभा निवडणुकांची घोषणा करण्याची शक्यता आहे.
सरकारने निर्णयांचा लावला धडाका
महायुती व महाविकास आघाडीत विधानसभेची निवडणूक रंगणार आहे. लोकसभेला महायुतीला अपेक्षित यश न मिळाल्यामुळे महायुतीने विधानसभा निवडणुकीपूर्वी निर्णयांचा धडाका लावला आहे. आगामी विधानसभा निवडणूक ही अटीतटीची होणार आहे. त्यामुळे थेट लोकांशी संबंधित योजना सुरु करण्याचा धडाका सुरु आहे. म्हणून मागील आठवड्यात दोन- दोन मंत्रीमंडळ बैठका होताना पाहायला मिळाल्या. आज सकाळीही मंत्रिमंडळ बैठक सुरु आहे. आजच्या बैठकीतही मोठे निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
मंत्रालयातील धावपळ वाढली
काल सुटीच्या दिवशीही मंत्रालयात आमदार व मंत्र्यांची वर्दळ दिसली. निर्णयांचा सध्या धडाका सुरु आहे. अनेक निर्णय नियमांना डावलून घेतले जात असल्याची टीका, विरोधकांकडून होत आहे. आजच्या बैठकीतही मोठमोठे निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दिवसाला शेकडो शासन निर्णय जारी होताना पाहायला मिळत आहे. त्यासाठी आमदारांपासून मंत्र्याची चांगलीच धावाधाव सुरु झालीय. आचारसंहितेच्या आधीच टेंडर काढण्यासाठी सर्वांनी ताकद पणाला लावलीय. त्यामुळे येत्या दोन दिवसांत आचारसंहिता लागण्याची शक्यता वाढली आहे.












Click it and Unblock the Notifications