कृषीमंत्री माणिकराव कोकाटे पुन्हा बरळले अन् सुरू झाली सारवासारव, नेमकं काय घडलं, जाणून घ्या प्रकरण
Manikrao Kokate News : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे हे कायमच वादग्रस्त विधान करण्यात माहीर आहेत. तर टीका झाल्यानंतर पुन्हा ते त्यांच्या विधानाची सारवासारव देखील उत्तमरित्या करतात, असे पाहायला मिळाले. दरम्यान, पुन्हा एकदा माणिकराव कोकाटे यांनी वादग्रस्त विधान केले आणि ते टीकेचे धनी बनले. मग काय महाशयांनी थेट सारवासारव करून माध्यमांवर दोष देणं सुरू केलं.
नेमकं काय घडलं?
"हार्वेस्टिंग झालेल्या पिकांचे पंचनामे करून काय करणार? ढेकळांचे पंचनामे करायचे का?" असं बेताल व्यक्तव्य माणिकराव कोकाटे यांनी केलं आहे. नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील पांढुर्ली गावात अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी गेल्यानंतर कृषीमंत्री कोकाटे पत्रकारांशी बोलत होते. त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. या वक्तव्यानंतर पुन्हा एकदा कृषीमंत्र्यांवरती टीका होऊ लागली आहे. दरम्यान, कोकाटेंनी आपल्या वक्तव्यावर त्यांनी स्पष्टीकरण देऊन नामानिर्माळे जणू आपण काहीच चूक केली नाही, असा अविर्भाव देखील त्यांनी व्यक्त केला.

कोकाटे नेमकं काय म्हणाले?
माणिकराव कोकाटे यांनी सुरुवातीला केलेल्या विधानाची नंतर माध्यमांशी बोलताना सारवासारव केली. ते म्हणाले की, मी तसं बोललोच नाही, बऱ्याच ठिकाणी पेरणी संपली आहे. फळबागाचे नुकसान झाले आहेत. त्यामुळे फळबागाचे पंचनामे करण्याचे सांगितले आहे. काही ठिकाणी कांद्याची लागवड केल्याने, कांद्याचे नुकसान झाला आहे. बऱ्याच ठिकाणी शेतीमध्ये शेतीमध्ये माल कमी आहे. जेवढं नुकसान झाला आहे, तेवढे पंचनामे करण्याचे सांगितले असून, नुकसान भरपाई देणार आहे. काही ठिकाणी शेतकऱ्यांनी नांगरलं आहे, शेतीची मशागत करण्यासाठी नांगरटी करावीच लागते. आता सोयाबीन, कापूस शिल्लक आहे का?, त्यामुळे फळबागा उभा आहेत, त्या महत्त्वाच्या आहेत, असे माणिकराव कोकाटे म्हणाले.
शब्दाचा अर्थ वेगळाच घेतला
माणिकराव कोकाटे पुढे बोलताना म्हणाले की, तुम्ही माझ्या तोंडून निघालेल्या शब्दाचा अर्थ वेगळा काढता आहात. ज्या ठिकाणी जमिनीवर काहीच नाही, त्या ठिकाणी पंचनामे करून काय करणार?, कांदे आणि फळ पिकाचे पंचनामे करण्यासाठी सांगितलं गेलेले आहे. ज्या शेतकऱ्यांच्या शेतीचे नुकसान झालं आहे, त्या शेतीचं पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत.
सगळ्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांना दिले आहे. ज्या पिकांची नुकसान होईल त्या पिकाची नुकसान भरपाई शासनातर्फे दिली जाईल. ज्या शेतकऱ्यांच्या शेतात मालच नाही त्याचे पंचनामे कसे करायचे. जे काही खरं आहे ते मी बोललो आहे. ठीक आहे चुकलं असेल, तुम्ही त्याचा अर्थ वेगळा काढत आहात. मी काही वेगळं बोललेलं नाही जे सत्य आहे, तेच बोललो आहे. मी तसं काही बोललोच नाही, असे विधान त्यांनी करून त्यांनी त्यांची विषय संपविला.












Click it and Unblock the Notifications