Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

लाडक्या बहिणींनी सरकारचं वाढवलं टेन्शन! हप्ता मिळेना, फसवणुकीवरुन गेल्या थेट पोलिस ठाण्यात!

Ladki Bahin Yojna Latest News : राज्यातील लाडक्या बहीणींना एप्रिल महिन्याचा हप्ता आज अक्षय्य तृतीयाच्या मुहूर्तावर मिळणार असल्याचे सांगितले जात होते. परंतु, आजचा मुहूर्त देखील हुकणार असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे लाडक्या बहीणींना एप्रिलचा हप्ता कधी मिळणार अशी चर्चा आता सुरू झाली आहे.

अशातच, महायुती सरकारचे लाडक्या बहीणींनी टेन्शन वाढवलं आहे. आमची महायुती सरकारने फसवणूक केली आहे, असा आरोप करत काही लाडक्या बहिणींनी आपल्या सरकारमधील भावांविरोधात पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. यासंदर्भात नेमका कुठे व काय प्रकार घडला, याविषयी जाणून घेऊया.

Ladki Bahin Yojana news

निकष लावत लाभार्थी संख्या होतेय कमी

राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णय भूमिका मजबूत करण्यासाठी 'मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण' योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. परंतु, सरकारने वारंवार त्यात काही ना काही कारण देत लाभार्थी महिलांची संख्या कमी करणं लावली आहे.

लाडक्या बहीणींनी केली पोलिस ठाण्यात तक्रार

राज्यात महायुती सरकार आले, शंभर दिवसांपेक्षा जास्त कालावधी झालेला आहे. तरी देखील लाडकी बहीण योजनेचे अनुदान वाढवलेले नाही. राज्यातील लाडक्या बहि‍णींची महायुती सरकारने फसवणूक केल्याची तक्रार शेतकरी महिलांनी अहिल्यानगरमधील श्रीरामपूर पोलिस ठाण्यात केली आहे.

महायुती सरकारचे प्रमुख मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविरोधात श्रीरामपूर पोलिस ठाण्यात तक्रार देताना, गुन्हा नोंदवण्याची मागणी शेतकरी महिला सुनिता वानखेडे, कोमल वानखेडे यासह अन्य महिलांनी केली आहे.

सरकारची संघटीत गुन्हेगारी केल्याचा आरोप

काही शेतकरी महिलांनी पोलिस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, सरकारने संघटीत गुन्हेगारी केली म्हणजेच, लाडक्या बहिणींना 2100 रुपये पणं नाही, अन् 1500 रुपये पणं नाही. आता 500 रुपये देऊन आमची फसवणूक केली आहे, अशी तक्रार शेतकरी महिलांनी केली. संघटीत गुन्हेगारी, फसवणूक, विश्वासघात करणे असे मुद्दे तक्रारीत करण्यात आले.

शेतकऱ्यांनी कर्जमाफीवरुन केली तक्रार

शेतकऱ्यांनी कर्जमाफीवरून दाखल केलेल्या तक्रारीनंतर आता शेतकरी महिलांनी महायुती सरकारविरोधात फसवणुकीची तक्रार दाखल केली आहे. श्रीरामपूर पोलिसांनी शेतकरी महिलांचा तक्रारी अर्ज दाखल करून घेतला, पण पुढे काय कारवाई होणार याकडे लक्ष लागून आहे. तर कर्जदार शेतकरी नवनाथ दिघे, प्रकाश जाधव, श्रीराम त्रिवेदी यांनी देखील आम्हाला कर्जमाफी दिली नाही, आश्वासन दिले होते म्हणून फसवणुकीची तक्रार केली आहे.

या महिलांना फक्त आता 500 रुपये

महायुतीने विधानसभा निवडणुकीत राज्यातील लाडक्या बहिणींना आश्वासन दिलं होते की, सरकार येताच माझी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत 2100 रुपये दर महिना अनुदान देऊ, पणं निवडून सत्तेत येताच महायुतीने 2100 रुपये तर नाहीच दिले. पणं किसान सन्मान योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकरी महिलांचे 1500 रुपये अनुदानही बंद केले. आता फक्त 500 रुपये प्रति महिना देण्याचे जाहीर केले आहे.

10व्या हप्त्याची प्रतीक्षा​

लाडक्या बहिणींना दरमहा 1500 रुपये राज्य सरकारकडून देण्यात येत असतात. पात्र महिलांच्या बाँक खात्यात थेट डीबीटी मार्फत पैसे जमा होत असतात. आतापर्यंत एकूण 9 हप्ते लाडक्या बहिणींना देण्यात आले आहेत. आता एप्रिल महिन्याचा म्हणजेच 10वा हप्ता लाडक्या बहिणींना मिळणार आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+