कोल्हापुरात 'मस्साजोग'ची पुनरावृत्ती?,पाटगावचे सरपंच 2 महिन्यांपासून बेपत्ता; जळालेल्या अस्थीने खळबळ
Kolhapur ex sarpanch missing news : बीडमधील गाजलेल्या 'मस्साजोग' येथील सरपंच हत्याकांडाच्या भयावह स्मृती कोल्हापूर जिल्ह्यात ताज्या झाल्या आहेत. भुदरगड तालुक्यातील पाटगावचे माजी सरपंच आणि विद्यमान ग्रामपंचायत सदस्य महेश दिनकर पिळणकर (52) हे गेल्या दोन महिन्यांपासून संशयास्पदरित्या बेपत्ता आहेत.
दरम्यान, तपासात जळालेल्या अस्थी आणि बेवारस दुचाकी सापडल्याने या प्रकरणाला आता गुन्हेगारी वळण मिळण्याची शक्यता निर्माण झाली असून संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

नेमकी घटना काय?
७ जानेवारी २०२६ च्या रात्री ८ च्या सुमारास महेश पिळणकर जेवण करण्यासाठी घरातून बाहेर पडले होते. मात्र, तेव्हापासून ते घरी परतलेच नाहीत. सुरुवातीला नातेवाईकांनी शोध घेतला, पण काहीच पत्ता न लागल्याने पोलिसांत तक्रार करण्यात आली.
तपासादरम्यान, पाटगावलगतच्या 'कुलकर्णी' नावाच्या शेताजवळ त्यांची दुचाकी बेवारस अवस्थेत आढळून आली. अधिक तपासात या दुचाकीपासून काही अंतरावरच जंगलात जळालेल्या अवस्थेत काही हाडांचे अवशेष (अस्थी) सापडले आहेत.
'मस्साजोग' प्रकरणाची आठवण का येतेय?
बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करून पुरावा नष्ट करण्यासाठी त्यांचा मृतदेह जाळण्यात आला होता. पाटगाव प्रकरणातही तसाच प्रकार समोर आला आहे. पाटगावचे माजी सरपंच गेल्या दोन महिन्यांपासून अचानक बेपत्ता झाले. दुचाकी एका ठिकाणी आणि मृतदेहाचे अवशेष (अस्थी) दुसऱ्या ठिकाणी सापडणे. यावरून पुरावा नष्ट करण्यासाठी जाळण्याचा प्रयत्न झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. या साम्यस्थळांमुळे हे 'मस्साजोग' पॅटर्ननुसार केलेले हत्याकांड तर नाही ना? अशी भीती व्यक्त होत आहे.
फॉरेन्सिक अहवालाकडे लक्ष
उपविभागीय पोलीस अधिकारी रामदास इंगवले आणि पोलीस निरीक्षक गोरक्ष चौधरी यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून, जप्त केलेले अवशेष फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवले आहेत. ते अवशेष मानवी आहेत की प्राण्यांचे, हे स्पष्ट झाल्यानंतरच महेश पिळणकर यांच्याबाबतच्या सत्यतेचा उलगडा होणार आहे. मात्र, दोन महिने उलटूनही अहवाल न आल्याने तपासाच्या गतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
दसरा चौकात आंदोलनाचा वणवा
पोलीस तपासातील 'थंडावा' पाहून आज पिळणकर कुटुंबिय आणि 'संविधान हक्क संघर्ष समिती' आक्रमक झाली. कोल्हापूरच्या ऐतिहासिक दसरा चौकात तीव्र निदर्शने करण्यात आली. "दोन महिने झाले, माझा नवरा कुठे आहे? पोलिसांना अजून काहीच कसे सापडले नाही?", असा आर्त सवाल महेश पिळणकर यांच्या पत्नीने उपस्थित केला आहे. पोलिसांनी तातडीने तपास लावून दोषींना जेरबंद करावे, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा सामाजिक संघटनांनी दिला आहे.
-
केंद्रीय विद्यालयात प्रवेशाची सुवर्णसंधी! 2026-27 सत्रासाठी प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर; वाचा डिटेल्स -
KVS Admission पालकांनो, केंद्रीय विद्यालयांचा प्रवेश अर्ज भरण्यापूर्वी 'ही' कागदपत्रे ठेवा तयार ठेवा -
जगातील आनंदी देशांची यादी जाहीर! भारत कितव्या स्थानावर? वाचा भारत की पाकीस्तान कोण जास्त सुखी? -
Eid mubarak 2026 wishes messages marathi ईदचे 25 खास शुभेच्छा संदेश; व्हॉट्सॲप, इंस्टाग्राम मेसेसेज -
'धुरंधर-2' मोडणार सर्व रेकॉर्ड्स! पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर नोटांचा पाऊस; आकडा पाहून व्हाल थक्क! -
आजचे राशीभविष्य: मेष ते मीन, कोणाला मिळणार धनलाभ आणि कोणाला राहावे लागेल सावध? -
शाहरुखच्या ताफ्यात धोनीच्या 'धुरंधरांची' एन्ट्री? IPL 2026 पूर्वी केकेआरला मोठा धक्का आणि खूशखबरही! -
महाराष्ट्राची एपस्टीन फाईल उघडली? अशोक खरात प्रकरणी संजय राऊतांचा 'वार', चाकणकरांवर अंधारेंकडून टीका -
Pink lips home remedies : ओठांचा काळेपणा दूर करण्यासाठी घरगुती उपाय; 7 दिवसांत मिळवा गुलाबी ओठ! -
जपानचे PM अमेरिकेशी मैत्री वाढवासाठी आले अन् ट्रम्प यांनी खोचक उत्तर देऊन जुन्या जखमांवर मीठ चोळले! -
गुढीपाडव्याचा शुभ मुहूर्त आणि तुमचे राशीभविष्य; नववर्षाचा सूर्य कोणासाठी ठरेल भाग्यवान? -
Dhurandhar 2 : धुरंधर-2 चा बॉक्स ऑफिस धमाका! दुसऱ्याच दिवशी 'एवढा' गल्ला, मोडला जवान, ॲनिमलचा विक्रम








Click it and Unblock the Notifications