प्रवाशी बोट कशी उलटली, अपघात कसा झाला, 13 जणांच्या मृत्यूला नेव्हीची बोट कारणीभूत आहे का?
Mumbai Boat Accident Video Update : मुंबईतील गेट वे ऑफ इंडियाच्या पासून काही अंतरावर असलेल्या व अरबी समुद्रात एक प्रवाशी बोट उलटल्याची घटना घडली आहे.
अपघातग्रस्त बोट 80 प्रवाशांना घेऊन एलिफंटा लेणीकडे जात होती. पण रस्त्यात नेव्हीच्या स्पीडबोटने तिला धडक दिली. यामुळे बोट समुद्रात उलटली आहे. या घटनेत आतापर्यंत 13 जणांचा मृत्यू झाला असून, 100 पेक्षा जास्त लोकांना वाचवण्यात आले आहे. तर अजूनही बचावकार्य सुरू असल्याचे सांगितले जात आहे.
मुख्यमंत्री फडणवीसांनी काय दिली माहिती?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेत आतापर्यंत 13 जणांचा मृत्यू झाला असून, 101 जणांना वाचवण्यात आले आहे. उर्वरित लोकांना नेव्ही व तटरक्षक दलाच्या मदतीने वाचवण्यात येत आहे. दरम्यान, अद्याप 7-8 जण बेपत्ता असल्याची माहिती आहे. या संदर्भातील सविस्तर माहिती ही उद्या समोर येणार आहे. तसेच, मृतकांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहायता निधीतून 5 लाख रुपये आर्थिक मदत करण्याची घोषणाही मुख्यमंत्र्यांनी केली.

मिळालेल्या माहितीनुसार, एलिफंटा लेणी येथे जाणारी नीलकमल नावाची प्रवाशी बोट उरण, कारंजा येथे बुडाली असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. त्यामध्ये 80 प्रवासी होते.
सदर ठिकाणी नौदल, जेएनपीटी, कोस्ट गार्ड, यलोगेट पोलिस ठाण्याच्या 3 आणि स्थानिक मच्छीमार बोटींच्या सहाय्याने मदत व बचाव कार्य चालू झाले.
मुंबईतील गेट वे ऑफ इंडियापासून काही अंतरावर बोट बुडाली. ही बोट एलिफंटाकडे जात होती. तेव्हा यात प्रवाशी बसलेले होते. प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी असे बचावकार्य करण्यात आले. pic.twitter.com/52Jz5lthj3
— Pratap Awachar - प्रताप अवचार (@pratapbhagawata) December 18, 2024
नेमका अपघात कसा झाला?
बोटच्या मालकाने दिलेल्या माहितीनुसार, बुचर आयलँड जवळ नेव्हीच्या गस्त घालणाऱ्या स्पीड बोटने धडक दिल्याने हा अपघात झाला. 66 प्रवाशांना वाचवण्यात यश आले आहे. तर तिघांचा मृत्यू झाला आहे. अजून बरेच प्रवाशी बेपत्ता असून बचाव कार्य सुरू आहे. रेस्क्यू केलेल्या प्रवाशांना गेट वे ऑफ इंडियाजवळ आणले जात आहे.
गेट वे ऑफ इंडिया गेटपासून काही अंतरावर समुद्रात एक प्रवाशी बोट उलटली, पाहा या घटनेचा थरारक व्हिडिओ...! pic.twitter.com/O22Tdqwxim
— Pratap Awachar - प्रताप अवचार (@pratapbhagawata) December 18, 2024
बोटमालक काय म्हणाले?
आमची बोट रोज दुपारी अडीच वाजेनंतर एलिफंटाला जात असते. आजही ती जात होती. यादरम्यान नेव्हीची एक स्पीड बोट त्याठिकाणी आली. ती आमच्या बोटीच्या आसपास राउंड मारुन परत गेली. पुन्हा बोटीकडे येऊन बोटीला धडक दिली.
बोटीमध्ये 80 लोक होते. बोटीची प्रवाशांची क्षमता 84 जणांची आहे. पण ती बोट 130 प्रवासी घेऊन जाऊ शकते. दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. मी जेएनपीटीमध्ये असताना मला फोन आल्यानंतर घटनेची माहिती मिळाली, अशी माहिती नीलकमल बोटीचे मालक राजेंद्र परते यांनी माध्यमांना दिली.
मुख्यमंत्री फडणवीसांचे विधानसभेत निवेदन
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी विधानसभेत एक निवेदन केले आहे. ते म्हणाले, एलिफंटाकडे जाणाऱ्या नीलकमल या बोटीचा अपघात घडल्याचे वृत्त प्राप्त झाले. नौदल, कोस्टगार्ड, पोर्ट, पोलिस पथकच्या बोटी तातडीने मदतीसाठी रवाना करण्यात आल्या आहेत.
जिल्हा आणि पोलिस प्रशासनाशी सातत्याने आम्ही संपर्कात असून, सुदैवाने बहुसंख्य नागरिकांना वाचविण्यात आले आहे. तथापि अजूनही बचावकार्य सुरू आहे. बचावकार्यासाठी सर्व त्या यंत्रणा तैनात करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला देण्यात आले आहेत.












Click it and Unblock the Notifications