भाजप व अजित दादांच्या दोन, तर शिंदे गटाच्या तीन नेत्यांना डच्चू, पहा नेमकं काय घडलंय
maharashtra cabinet expansion : महायुतीच्या नव्या सरकारचा शपथविधी आज नागपूरात झाला. या मंत्रीमंडळात अपेक्षेप्रमाणे अनेक दिग्गजांच्या गळ्यात मंत्रीपदाची माळ पडली. मात्र दुसरीकडे दीपक केसकर, छगन भुजबळ, दिलीप वळसेंसारख्या अनेक दिग्गजांना मंत्रीपदापासून वंचित रहावे लागले. या मंत्रीमंडळात पहिल्यांदा मंत्रीपदी वर्णी लागलेले अनेक नवीन चेहरेही दिसले.

यांना पहिल्यांदाच मंत्रीपद
शिवसेनेकडून भरत गोगावले, संजय शिरसाट, प्रताप सरनाईक, प्रकाश आबीटकर यांना पहिल्यांदाच मंत्रीपदाची संधी मिळाली. भाजपने आशिष शेलार, नितेश राणे आणि जयकुमार गोरे यांना पहिल्यांदाच संधी दिली. अजित पवार गटाने मात्र कोणत्याही नव्या चेहऱ्याला संधी दिली नाही.
कुणाला मिळाला डच्चू
राष्ट्रवादीत फूट पडली त्यावेळी शरद पवारांना सोडून अजित पवारांना साथ देणाऱ्या छगन भुजबळ व दिलीप वळसे पाटील यांना यावेळी मंत्रिमंडळातून वगळण्यात आले. उठावाच्या वेळी दिलीप वळसे पाटील देखील अजित पवारांसोबत ठामपणे उभे होते. मात्र नव्या मंत्रिमंडळातून छगन भुजबळ आणि दिलीप वळसे पाटील या दोघांचा देखील पत्ता कट करण्यात आला आहे.
अनेक दिग्गजांचा पत्ता कट
भाजपकडून सुधीर मुनगंटीवार व रवींद्र चव्हाण हे दोन मोठे नेते फडणवीसांच्या मंत्रिमंडळात दिसले नाहीत. रवींद्र चव्हाण यांच्याकडे भाजपा प्रदेशाध्यक्षपद सोपवलं जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच, शिवसेनेकडून (शिंदे) दीपक केसरकर, तानाजी सावंत, अब्दुल सत्तार या तीन माजी मंत्र्यांना मंत्रीपदे देण्यात आलेली नाहीत. मंत्रीमंडळात अनेक दिग्गजांचा पत्ता कट झाल्याने चर्चा वाढल्या आहेत.












Click it and Unblock the Notifications