मनसेचे टॅय टॅय फिस्स; कल्याण ग्रामीणमध्ये राजेश मोरेंची फूल्ल टू हवा
Maharashtra Assembly Election 2024 : शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून कल्याण ग्रामीण मतदारसंघाची ओळख आहे. या मतदारसंघात मनसे व शिवसेनेचा आमदार निवडून आला आहे. यावेळी येथून मनसेने विद्यमान व एकमेव आ. राजू पाटील यांना उमेदवारी दिली आहे. त्याविरोधात शिवसेना शिंदे गटाने राजेश मोरे व शिवसेना ठाकरे गटाने माजी आ. सुभाष भोईर यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. खा. श्रीकांत शिंदेंची व्यूव्हरचना, महायुतीने केलेली विकासकामे व राजेश मोरेंसारख्या सामान्य कार्यकर्त्याला शिंदे गटाने दिलेली संधी या महायुतीसाठी जमेच्या बाजू असून यंदा येथून महायुतीचेच पारडे जड असल्याचे सांगितले जात आहे.
शिंदे-पाटील यांच्यात कलगीतूरा
हा मतदारसंघ खा. श्रीकांत शिंदे यांच्या लोकसभा मतदारसंघात येत असल्याने त्यांचे येथे विशेष लक्ष आहे. कल्याण ग्रामीण मतदारसंघ मनसेच्या ताब्यातून घेण्यासाठी स्वतः श्रीकांत शिंदे सक्रीय झाले आहेत. रोड शो, व्यक्तिगत गाठीभेटी, पदाधिकाऱ्यांच्या बैठका यांचा सपाटात या मतदारसंघात महायुतीने लावला आहे. दिवा परिसरातील मतदार या मतदारसंघात विजयी भूमिका पार पाडतात. त्या दृष्टीने ठाणे महानगरपालिकेचे माजी महापौर रमाकांत मढवी यांची नाराजीही शिवसेना शिंदे गटाने दूर केली असून त्यांनाही प्रचारात सक्रीय केलं आहे. याशिवाय भाजपचीही येथे चांगली ताकद आहे. अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनाही आता प्रचारात सहभागी करुन घेण्यात आले आहे. हे सर्व पाहता हा मतदारसंघ शिवसेना शिंदे गटाच्या ताब्यात येईल अशी शक्यता वाढली आहे.

मोरे यांचा सर्वसमावेशक चेहरा फायद्याचा
राजेश मोरे हे सुरुवातीला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते. त्यानंतर ते शिवसेनेत आले. तेव्हापासून ते शिंदे यांचे निकटवर्तीय मानले जातात. शांत, संयमी व पक्षबांधणीचे कसब असलेला कार्यकर्ता अशी त्यांची ओळख आहे. मोरे यांना यापूर्वी सभागृह नेतेपदही देण्यात आलं होतं. त्यानंतर डोंबिवली शहर प्रमुखपदी त्यांनी सांभाळलंय. डोंबिवलीत मोरे यांचा जनसंपर्क मोठा आहे. कल्याण ग्रामीण मतदारसंघात डोंबिवलीचे 31 प्रभाग येत असल्याने राजेश मोरे यांचे पारडे सध्यातरी जड समजले जात आहे.
कल्याण ग्रामीणमध्ये महायुतीची विकासकामे
महायुतीने गेल्या काही वर्षांत डोंबिवली आणि कल्याण ग्रामीण क्षेत्रांमध्ये महत्त्वपूर्ण विकासकामे केली आहेत. सिमेंट काँक्रीटचे रस्ते, रस्ते रुंदीकरण, मेट्रोचे जाळे, नवीन हॉस्पिटल आणि सुतिका गृहाची उभारणी ही महायुतीच्या सरकारमुळेच शक्य झाली आहे. याशिवाय महायुतीने कल्याण ग्रामीणमध्ये महायुती सरकारच्या सर्व योजनाही घरोघर पोहचविल्या आहेत. खा. श्रीकांत शिंदे यांच्या कार्यक्षेत्रात हा मतदारसंघ येत असल्याने त्यांचेही येथे विशेष लक्ष आहे. मनसेचे विद्यमान आ. राजू पाटील यांनीही काही दिवसांपूर्वी कल्याण बदलतेय, अशा आशयाचे फलक लावले होते. वास्तविक ती कामे महायुती सरकारनेच केली असल्याने शिवसेना शिंदे गटाच्या राजेश मोरे यांचे पारडे सध्यातरी जड दिसत आहे.
इतर भाषिक महायुतीच्या पाठीमागे
या मतदारसंघात राजू पाटील, राजेश मोरे व सुभाष भोईर हे तिनही उमेदवार आगरी समाजाचे आहेत. त्यामुळे आगरी मतांचं विभाजन होणार आहे. मात्र ओबीसी समाज हा भाजपमागे व मराठा व इतर समाज हा शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादी अजित पवार गटामागे असल्याचं दिसलं आहे. त्यामुळे या मतदारसंघात महायुतीला विजयाची गणिते जुळवणं सोप्प असल्याचं मत राजकीय विश्लेषकांकडून व्यक्त केलं जात आहे.
शिवसेनेने दिला कोट्यवधींचा निधी
कल्याण ग्राणीण मतदारसंघात कल्याण-शिळ रस्त्याचे सहापरदरीकरण, सिमेंट काँक्रीटीकरण, डोंबिवली एमआयडीसी निवासी भागातील रस्ते, शहरांतर्गत रस्ते, एमएसआरडीच्या निधीतून सुविधा, कल्याण ते तळोजा मेट्रोमार्ग, बीएसयुची घरे आदींची कामे महायुती सरकारच्या काळात झाली आहेत. याशिवाय कल्याण लोकसभा मतदार संघातील ग्रामीण भागातील डोंगर, निसर्गरम्य भाग पर्यटने स्थळे म्हणून विकसित करण्याच्या कामासाठी शासनाने २८ कोटीचा निधी दिला आहे. याशिवाय मलंगगड विकासासाठी 10 कोटी, दुर्गाडी किल्ला विकासासाठी पाच कोटी, उंबार्ली टेकडीवरील अभयारण्यासाठी पाच कोटी रुपये महायुती सरकारने दिले. या सर्व विकासकामांचा वेग कायम ठेवायचा असेल तर या मतदारसंघात महायुतीच्या उमेदवारालाच निवडून द्यायला हवे, असे येथील नागरिक बोलत आहेत.












Click it and Unblock the Notifications