Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

भाजपचा चढता आलेख : शरद पवारांची 'चाणक्य' पदवी, फडणवीसांनी कर्त्तृत्वावर हिसकावली

सुमारे साठ वर्षांपूर्वीचा जनसंघ ते आत्ताचा भाजप हा राष्ट्रीय पक्ष म्हणून झालेला प्रवास, खरोखरच कौतुकास्पद ठरला. सरत्या २०२४ या वर्षात देवेंद्र फडणवीसांनी स्वतःले कौशल्य व नेतृत्वगूण असे दाखवले, की त्यांना थेट राजकारणातले चाणक्य समजले जाऊ लागले. सरत्या वर्षात भाजपने केलेली ही कामगिरी एखाद्या फिनिक्स पक्षाच्या झेपेप्रमाणे असली तरी, भाजपला सुरुवातीला अनेक चढउतारांना सामोरे जावे लागले. लोकसभेत सपाटून मार खाल्यावर भाजपने रणनिती बदलवत, अभूतपुर्व यश मिळवले. सरत्या वर्षात काय काय झाले व साठ वर्षात भाजपचा आलेख कसा उंचावला, हे आपण पाहू...

Devendra Fadnavis

गेल्या वर्षात अभूतपुर्व यश

भाजपने गेल्या विधानसभा निवडणुकीत इतिहासात पहिल्यांदाच १३० चा आकडा पार केला. या निवडणुकीत भाजपने १३२ जागा जिंकल्या. महायुतीला मिळून २२३ जागा जिंकता आल्या. त्याऊलट महाविकास आघाडीला एकत्रित फक्त ५५ जागांवर समाधान मानावे लागले. २०१४ ला भाजपने १२४, तर २०१९ ला १०५ जागा जिंकल्या होत्या. म्हणजेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपने सलग तीन निवडणुकांत शंभरी पार केली. यंदा तर भाजपने १३२ जागा जिंकत स्वतःचा एक रेकाँर्डच केला.

साठ वर्षांतील चढउतार

१९६२ साली भाजप जनसंघ म्हणून प्रत्यक्षात निवडणुकीत उतरला होता. त्यावर्षी १२७ जागा लढवून भाजपच्या हाती भोपळा लागला होता. मात्र त्यानंतर १९६७ मध्ये १६६ जागा जिंकून चार जागा जनसंघाने जिंकल्या होत्या. १९७२ मध्ये १२२ जागा लढवून पाच जागा मिळवता आल्या होत्या. १९८० मध्ये १४५ जागा जिंकून जनसंघाने १४ जागा जिंकल्या होत्या. १९८५ मध्ये भाजपने ६७ जागांवर लढत १६ जागा जिंकल्या. १९९० मध्ये १०४ जागा लढवून, ४२ जागा जिंकल्या. पुढे १९९५ मध्ये ११६ जागा लढवत भाजपने ६५ जागा जिंकल्या होत्या. १९९९ मध्ये ११७ जागा लढवत, ५६ उमेदवार जिंकून आणले होते. २००४ साली १११ जागांवर लढून भाजपने ५४ जागा जिंकल्या. २००९ मध्येही ११९ जागा लढवत भाजपने फक्त ४६ जागा जिंकल्या होत्या.

२०१४ पासून भाजपचे अच्छे दिन

त्यानंतर २०१४ साली भाजपने निवडणुकीचे खऱ्या अर्थाने मायक्रो प्लॅनिंग केले. देवेंद्र फडणवीसांनी राज्याभर दौरे करत भाजप व मोदींना घराघरात पोहोचवले. २०१४ साली भाजपने २६० जागा लढवल्या. त्यावेळी १२२ जागांवर विजय मिळाला. त्यानंतर २०१९ साली भाजपने १६४ जागा लढवत १०५ जागांवर विजय मिळवला. यावेळी म्हणजेच २०२४ साली भाजपने १४९ जागांवर उमेदवार उभे करत, १३२ जागांवर विक्रमी विजय मिळवला. भाजपचा स्ट्राईक रेट ८० टक्क्यांच्या पुढे राहिला.

सहा महिन्यांत वातावरण फिरले

महाराष्ट्रात जूनमध्ये लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला. ४८ जागांपैकी ३१ जागा महाविकास आघाडीच्या पारड्यात पडल्या. दुसरीकडे महायुतीला फक्त १७ जागांवर समाधान मानावे लागले. आरक्षणाचा मुद्दा, संविधान बदलाची चर्चा, शेतकऱ्यांचे प्रश्न असे सगळेच मुद्दे महायुतीच्या विरोधात गेले होते. अखेर विधानसभा निवडणुकीत भाजपने रणनिती बदलली. एकीकडे योगी आदित्यनाथ 'बटेंगे तो कटेंगे'चा नारा देत इशारा देत होते, तर दुसरीकडे नरेंद्र मोदी 'एक है तो सेफ है'चा नारा देत राहिले. अखेर भाजपने १३२ जागा जिंकत, सहा महिन्यांतच महाराष्ट्रातील विरोधातील परिस्थिती बदलून टाकली.

भाजपचे मायक्रो प्लॅनिंग

गेल्या वर्षभरात सत्तेत असणाऱ्या महायुतीने विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अनेक प्रयोग केले. लाडकी बहिण योजना, ओबीसींना महामंडळाची खैरात, मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण, शेतकऱ्यांना पिकविमा, शेतीच्या वीजबिलाची माफी, महिलांना अर्ध्या तिकीटात प्रवास अशा अनेक योजनांची अंमलबजावणी करण्यात आली. मुलींचे उच्च शिक्षण मोफत करण्याचा क्रांतीकारी निर्णय घेण्यात आला. देवेंद्र फडणवीसांचे मायक्रो प्लँनिंग यासाठी कारणीभूत ठरले. अगोदर शिवसेना व त्यानंतर राष्ट्रवादीच्या फुटीला देवेंद्र फडणवीसांनाच जबाबदार धरण्यात आले. मात्र तरीही अभूतपुर्व यश मिळवत, फडणवीस राजकारणातले चाणक्य ठरले. यापूर्वी शरद पवारांकडे असणारी चाणक्य ही पदवी फडणवीसांनी अक्षरशः हिसकावली. गेल्या वर्षभरात महाराष्ट्राच्या राजकारणात ही एक दखलपात्र नोंद ठरली.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+