विठ्ठलनामातच गेले आणि विठ्ठलाचा जप करतच परतले; कोल्हापूरातील 'हा' दैवी चमत्कार वाचला का..?
ज्या घरात अंत्यविधीची तयारी सुरु होती, त्याच घराच्या उंबऱ्यावर कौतूकानं स्वागत होण्याची किमया महाराष्ट्रात घडलीय. कोल्हापूर येथील एक ज्येष्ठ वारकऱ्याला हरिनामानेच मृत्यूच्या दारातून परत आणल्याची घटना घडली आहे. या ज्येष्ठ वारकऱ्यांचे त्यांच्या घरच्या मंडळींनी कौतूकाने स्वागत केले.

नेमके काय झाले
कोल्हापूर येथील पांडूरंग नामा उलपे या ज्येष्ठ वारकऱ्याला पंधरा दिवसांपूर्वी हरिनाम करताना हृदयविकाराचा झटका आला. त्यांची पत्नी बाळाबाई यांना ही गोष्ट समजल्यानंतर त्यांना तातडीने गंगावेस येथील दवाखान्यात नेण्यात आले. डाँक्टरांनी त्यांच्यावर उपचार केले मात्र त्याचा काहीच उपयोग झाला नाही. डाँक्टरांनी रात्री साडेअकराच्या सुमारास त्यांना मृत घोषित केले. काही वेळातच ही बातमी कसबा बावडा परिसरात पोहोचली. त्यानंतर त्यांच्या अंत्यविधीची तयारी करण्यात आली.
झाला दैवी चमत्कार
पांडूरंग उलपे उर्फ तात्याच्या निधनाची बातमी एव्हाना पाहूणे-रावळे व परिसरात पोहोचली. नातेवाईकांनी त्यांचा मृतदेह घरी आणण्यासाठी कदमवाडी येथील दवाखान्यात अँम्बूलन्स पाठविली. मात्र तात्यांना अँम्बूलन्समध्ये घातल्यावर त्यांच्या शरीराची काहीशी हालचाल सुरु असल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांना पुन्हा दवाखान्यात अॅडमिट करण्यात आले. आता त्यांचे शरीर उपचाराला प्रतिसाद देऊ लागले. अखेर सोमवारी पूर्णपणे बरे झालेले तात्या घरी आले.
तोंडात विठ्ठलाचा जप
तात्या घरी आले त्यावेळीही त्यांच्या तोंडात विठ्ठलाचा जप सुरु असल्याचे त्यांच्या घरच्यांनी सांगितले. ही सारी त्यांच्या पांडूरंगाचीच कृपा असल्याचे घरच्यांनी सांगितले. एखाद्या चित्रपटाची कथा शोभावी अशी घटना वास्तवात घडली. ज्या घरी तात्यांच्या अंत्यविधीची तयारी सुरु होती, त्याच घराच्या उंबऱ्यावर तात्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.












Click it and Unblock the Notifications