Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

राज्यात पुढील 4 दिवस मुसळधार पाऊस, 'या' जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

Maharashtra Weather Update : राज्यातील काही भागात आज मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. 1 ऑगस्टपासून ते 4 ऑगस्टपर्यंत राज्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्यातील मुंबईसह कोकण, पश्चिम महाराष्ट्रात आणि विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, असं आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आलं आहे.

किनारपट्टीवरील हवेच्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे अरबी समुद्रातून वेगाने बाष्पयुक्त वारे किनारपट्टीवर येत आहे. वाऱ्याचा वेग जास्त असल्यामुळे किनारपट्टीसह पश्चिम घाटमाथ्यावर पुढील 3 दिवस पाऊस कोसळणार आहे.पश्चिम बंगालमधील वाऱ्याच्या चक्रीय स्थितीचा परिणाम म्हणून उत्तर विदर्भ, उत्तर मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढेल. भारतीय हवामान विभागाने महाराष्ट्रासाठी पुढील 5 दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

weather update

'या' जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

कोकणातील रायगड आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा आणि कोल्हापूर या तीन जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया या जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच मुंबईसह ठाणे सिंधुदुर्ग, यवतमाळ, नागपूर, वर्धा आणि भंडारा या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट लागू करण्यात आला आहे.

दरम्यान गेल्या काही दिवसांपासून देशात अनेक ठिकाणी पावसाने थैमान मांडले आहे. काही ठिकाणी पुरग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आणि नागरिकांचे हाल झालेले पाहायला मिळाले आहे. प्रत्येक राज्यात पावसाने आपले वेगवेगळे रूप धारण केले होते. त्यातच काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+