सूत्र हलले ! जरांगेंना तत्काळ अटक करा, या नेत्यांवरही कारवाई करा; पाहा कुणी केलीय मागणी
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन सुरू असताना, वकील गुणरत्न सदावर्ते यांनी जरांगे यांच्यासह काही नेत्यांना तातडीने अटक करण्याची मागणी केली आहे. सदावर्ते यांनी यासंदर्भात पोलीस महासंचालक, मुंबई पोलीस आयुक्त आणि आझाद मैदान पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

सदावर्ते यांच्या म्हणण्यानुसार, हे आंदोलन म्हणजे जरांगेंचा 'मुखवटा' आणि 'राजकारण' हा त्याचा आत्मा आहे. त्यांनी आरोप केला की आंदोलकांनी मुंबई उच्च न्यायालयाने घालून दिलेल्या अटी आणि शर्तींचे पालन केले नाही. त्यामुळे, मनोज जरांगे यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी, अशी त्यांची मागणी आहे.
उद्धव ठाकरेंसह इतर नेत्यांवरही कारवाईची मागणी
सदावर्ते यांनी या आंदोलनाचे समर्थन केल्याबद्दल उद्धव ठाकरे यांच्यावरही टीका केली. ते म्हणाले की, आंदोलनाचे स्वागत करून उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत, त्यामुळे त्यांच्यावरही कारवाई व्हायला पाहिजे. सदावर्ते यांनी खासदार संजय जाधव, बजरंग आप्पा सोनवणे आणि आमदार संदीप क्षीरसागर आणि प्रकाश सोळंके यांच्यावरही कारवाईची मागणी केली आहे.
सदावर्ते यांनी आरोप केला की, "हे नेते लोकांच्या मागे लपून राजकारण करत आहेत." त्यांनी म्हटले की, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) स्टेशनबाहेर करण्यात आलेला 'रस्ता रोको' हा केवळ व्हिक्टिम कार्ड खेळण्यासाठी होता. उद्धव ठाकरे यांची या आंदोलनाला 'मूक संमती' आहे आणि त्यांचे स्वागत हे त्यांची यातील सहभाग दर्शवते, असा आरोपही त्यांनी केला.












Click it and Unblock the Notifications