Ganesh chaturthi 2024 : गणेशमुर्तीचे दीड, पाच आणि सातव्या दिवशी का केले जाते विसर्जन? 'हे' आहे कारण
Ganesh chaturthi 2024 : यंदाचा गणेशोत्सव 7 संप्टेबर पासून सुरु होत आहे. विघ्नहर्ता विनायकाच्या स्वागतासाठी सगळीकडे लगबग सुरु आहे. गमणपतीच्या आगमनासोबत गौरीचे आगमन होत असते. जर तुम्ही गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपतीची मूर्तीची प्रतिष्ठापना करुन गणपतीची पूजा करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला काही जण दीड दिवस, काही जण पाच दिवस, काही जण सात तर काही जण दिवसांनी गणरायाचं विसर्जन करतात, याबद्दल माहिती असणे गरजेचे आहे.
दिड दिवसात का केले जाते गणेशमूर्तीचे विसर्जन'
दीड दिवसाच्या गणपती विसर्जनाबाबत प्रसिद्ध अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी एक गोष्ट सांगितलेली आहे. भारत हा कृषिप्रधान देश आहे भाद्रपद महिन्यात गणेश चतुर्थीदरम्यान शेतांमध्ये धान्याच्या लोंब्या हिरव्यागार पात्यातून डोलू लागतात. गणेश चतुर्थीच्या दिवशी धरणीमातेचे आभार मानण्याची पद्धत आहे. धरणीमातेविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यापूर्वी बांधावरच गणरायाची मातीची मूर्ती तयार करून, तिची पूजा केली जात असे.

सुरुवातीला पूजा झाल्यानंतर त्याच दिवशी या मूर्तीचं नदीमध्ये विसर्जन केलं जात असे. पण, नंतर काळानुसार या परंपरेमध्ये बदल होऊ लागला. काही जण सुबक मूर्ती तयार करून घरी आणू लागले आणि तिची प्राणप्रतिष्ठापना करून नंतर मूर्ती नदीत विसर्जन करु लागले.
हळूहळू दीड दिवसाच्या गणपती पूजनाची पद्धत सुरू झाली. पण, अजूनही अनेक गावांमध्ये चतुर्थीच्या दिवशीच गणेशमूर्तीचं विसर्जन करतात. अजूनही काही ठिकाणी ही प्रथा कायम आहे. तसेच सध्या धावपळीच्या जगात बरेच जण दहा दिवस गणपतीची पूजा करु शकत नाही पण गणपतीवरील प्रेम आणि आस्थेमुळे दिड दिवसाचा का होईना पण गणेशाची प्रतिष्ठापना करतात.
सात, दहाव्या दिवशीही गणेशमूर्तींचे विसर्जन
गणपतीची प्राणप्रतिष्ठापना केल्यानंतर त्याची पूजा करून विसर्जन करण्याचे हे व्रत एक किंवा दीड दिवसाचे आहे. पण, उत्सवात आणखी रंगत आणण्यासाठी किंवा कित्येक जण नवस पूर्ण करण्यासाठी पाच दिवस, सात दिवसांनी गणेशमूर्तीचे विसर्जन करतात. त्यामागे कोणतेही शास्त्रीय कारण नाही. अशी माहिती शेंबेकर गुरुजींनी दिली आहे गणेशभक्त आपल्या हौसेनुसार गणेशमूर्तीचे विसर्जन पाचव्या किंवा सातव्या किंवा दहाव्या दिवशी करतात.
गौरीसह गणेशमुर्तीचेही विसर्जन
काही ठिकाणी पाचव्या दिवशी गौरीसह गणेशमूर्तीचेही विसर्जन केले जाते, तर काही जणांकडे पाचव्या दिवशी गौरीचे विसर्जन झाल्यानंतर, सातव्या दिवशी गणेशमूर्तीचे विसर्जन करतात. काही पंचागकर्त्यांच्या मते, गौरी आणि गणपती वेगवेगळ्या देवता आहेत.
गौरीचे आगमन आणि विसर्जन हे नक्षत्रानुसार होते. ज्या नक्षत्रामध्ये त्यांचे आगमन होते, त्याच्या पुढच्या नक्षत्राला त्यांचे विसर्जन होते. अनुराधा नक्षत्राला गौरीचे आगमन होते आणि मूळ नक्षत्राला तिचे विसर्जन होते. नक्षत्र कधी कधी पुढे-मागे होतात; त्यानुसार कधी हे विसर्जन पाचव्या दिवशी होते; तर कधी सातव्या दिवशी होते.(Ganesh chaturthi 2024)












Click it and Unblock the Notifications