1 मिनिटाची किंंमत काय या माजी मंत्र्याला विचारा! वंचितकडून अर्ज भरायला गेले अन् निवडणुकीपासूनच वंचित
Former minister Anis Ahmed deprived of filing nominations : जीवन जगताना जशी एक एक रुपयांची किंमत महत्वाची असते तसेच एक मिनिट महत्वाचा असतो. एक मिनिटांची किंमत सहसा कुणी करतोच असे नाही पण एक मिनिट जरी उशीर झाला तर रेल्वे, विमान सुटते. पण एक मिनिटांमुळे जर पाच वर्षांच्या राजकीय कारकीर्दीचे नुकसान होत असेल तर ...होय असे नुकसान महाराष्ट्रातील एका माजी मंत्र्याचे झाले आहे. एक दोन मिनिट उशीरा पोहचल्याने त्यांचा अर्ज स्वीकारला गेला नाही आणि त्यांना उमेदवारी नामांकन दाखल करता आली नाही.
राज्याचे माजी मंत्री आणि आधी काँग्रेस आणि आता वंचित बहुजन आघाडीकडून निवडणुकीची तयारी करणारे दिग्गज नेते अनीस अहमद. यांच्यासंदर्भात हा प्रकार घडला आहे. आता त्यांना विधानसभेची निवडणूक लढवता येणार नाही.

नेमके काय झाले?
अनिस अहमद हे काँग्रेसचे दिग्गज नेते होते पण विधानसभा निवडणुका जाहीर झाल्यानंतर त्यांना काँग्रेसकडून तिकीट मिळेल अशी अपेक्षा होती पण तसे झाले नाही. त्यांना तिकीट न मिळाल्याने त्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आणि वंचितची नागपूर मध्य मतदारसंघाची उमेदवारी मिळवली. यानंतर ते काल उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी जेव्हा निवडणूक अधिकाऱ्यांच्या दालनात गेले, तेव्हा एक ते दोन मिनिटं उशीर झाला आता उमेदवारी अर्ज भरता येणार नाही असं सांगण्यात आलं. यामुळे ते उमेदवारीपासून वंचित राहीले.
काँग्रेसतर्फे सलग तीनवेळा आमदार
काँग्रेसतर्फे सलग तीन वेळा आमदार आणि अनेक वर्षे राज्याचे मंत्रीपद भूषवलेले अनीस अहमद वंचित बहुजन आघाडीतर्फे मध्य नागपुरातून निवडणूक लढणार आहेत. मागील अनेक वर्षांपासून ते सक्रिय राजकारणापासून लांब होते. मधल्या काळात त्यांची भाजपशी जवळीक वाढली होती. आता त्यांच्या उमेदवारीमुळे मध्य नागपूरमध्ये मुस्लीम मतांच्या विभाजनाची शक्यता असून त्याचा फायदा भाजपला मिळेल. त्यामुळे ही भाजपचीच खेळी असल्याची चर्चा आहे.
वेळ चुकली कि चुकवली
अनिस अहमद यांना उमेदवारी अर्ज दाखल करायला उशीर झाला पण एवढा मोठा राज्याचा माजी मंत्री असूनही त्यांच्याकडून ही वेळ चुकणे म्हणजे दाल मे कुछ काला है अशी शंका आता घेतली जात आहे. कारण त्यांना वेळ चुकवण्यासाठी भाजप कारणीभूत असल्याचे सांगण्यात येत आहे. मध्य नागपूर विधानसभा मतदारसंघातून त्यांना माघार घ्यायला लावली गेली अशी चर्चा आहे. ती कुणामुळे घ्यायला लावली हे स्पष्ट नाही ना थेट कुणी यावर बोलतोय पण त्यांची वेळ चुकली तर दुर्दैवी गोष्ट आहे पण वेळ चुकवली गेली तर त्याहून दुर्दैवी असल्याचे मतदार म्हणत आहेत.












Click it and Unblock the Notifications