एकनाथ शिंदे शरद पवारांना थेट भिडले; म्हणाले, गिरेंगे तो टांग उपर...
कर्नाटक, झारखंडमध्येही ईव्हीएमच होतं. लोकसभेच्यावेळीही ईव्हीएमच होतं. पण जेव्हा आपण हारतो तेव्हा ईव्हीएम चुकतं, आणि जेव्हा आपण जिंकतो त्यावेळी ते बरोबर असतं. हा दुटप्पीपणा नाही तर काय आहे..? असा सवाल करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट शरद पवारांना आरसा दाखवला. काल शरद पवारांनी आकडेवारी दाखवत शिंदे गटावर निशाणा साधला होता. आज तशीच आकडेवारी सांगत, एकनाथ शिंदे यांनी शरद पवारांवर पलटवार केला.

लाडकी बहिण ठरली गेमचेंजर
शरद पवारांनी केलेल्या आरोपांना आज एकनाथ शिंदे यांनी उत्तरे दिली. ते म्हणाले, प्रियंका गांधीही निवडून आल्या. नाना पटोले थोडक्या मतांनी जिंकले. रोहित पवारही थोडक्यात जिंकले. तेव्हा ईव्हीएम मॅनेज नव्हतं का..? विरोधी पक्षाकडे कोणताही मुद्दा नाही. आता त्यांचा रडीचा डाव चालू आहे. गिरेसंगे तो टांग उपर... असा सगळा प्रकार सुरु आहे. लोकसभेला ईव्हीएम चांगलं होतं. मात्र आता त्यांना ईव्हीएमवर शंका येऊ लागली आहे. आकडेवारी दाखवली जात आहे. मी म्हणालो होतो की लाडक्या बहिणी चार महिन्यात महायुतीला विजयी करतील. तसंच झालं. सर्व समाजघटकांना महायुतीने न्याय दिला व त्यांनीच महाविकास आघाडीला त्यांची जागा दाखवून दिली. लोक घरी बसणाऱ्यांना मतदान करत नाहीत. जो कामाचा आहे, फिल्डवर आहे त्याला मतदान करतात.
शरद पवारांना दिलं उत्तर
एकनाथ शिंदे पुढे म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत दोन लाख मतांचा फरक असूनही त्याचे जास्त उमेदवार निवडून आले. आम्हाला फक्त 17 जागा मिळाल्या. त्याउलट महाविकास आघाडीच्या 31 जागा जिंकून आल्या. मग त्यावेळी आम्ही ईव्हीएम घोटाळा झाला म्हणालो का..? असा सवाल करत शिंदेंनी शरद पवारांना टोला लगावला. ते म्हणाले, मी पवारांचं ऐकत होतो. त्यांनी विधानसभेची आकडेवारी दाखवली. मात्र प्रत्येक विधानसभा मतदारसंघाच गणित वेगळं असतं. काँग्रेसने 100 पेक्षा जास्त लढवल्या होत्या तर आम्ही 80 जागा लढवल्या होत्या. आमच्या आठ-दहा जारा फक्त हजार- बाराशे मतांनी पराभूत झाल्या. असं झालं नसतं तर, आमच्याही सत्तर जागा आल्या असत्या. तेव्हा तर यांनी गहजब केला असता", असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी शरद पवारांना सडेतोड उत्तर दिलं.
शिंदेंनी थेट आकडेवारीच सांगितली
एकनाथ शिंदे म्हणाले, "आम्हाला लोकसभा निवडणुकीत 73 लाख 67 हजार 673 मते मिळाली. आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 58 लाख 51 हजार 166 मते मिळाली. आम्हाला जास्त मते मिळूनही, कमी जागा आल्या. मग तेथेही ईव्हीएम घोटाळा झाला का..? हा माझा सवाल आहे. तुम्हाला जागा जास्त मिळतात तेव्हा ईव्हीएम चांगला असतो. पराभव होतो तेव्हा ईव्हीएम खराब असतो. सुप्रीम कोर्टापासून निवडणूक आयोगापर्यंत, त्यांच्या बाजूने निकाल लागला तर यंत्रणा चांगली. विरोधात निकाल गेला तर ते कोर्टावरही आरोप करतात. हे लोकशाहीला घातक आहे", असं म्हणत शिंदेंनी पवारांवर निशाणा साधला.












Click it and Unblock the Notifications