2 वर्षांपूर्वी काढलेली विकेट कुणीही विसरु शकणार नाही - एकनाथ शिंदे
मुंबई - आम्हा राजकारण्यांचेही क्रिकेटसारखेच आहे, कोण कुणाला रनआऊट करेल हे सांगता येत नाही. त्यामुळे आम्हाला चांगली बॅटींग करावी लागते, त्यामुळेच आम्हाला चांगली रेटींगही मिळते. दोन वर्षांपूर्वी आमच्या पन्नास जणांनी काढलेली विकेट कुणीही विसरु शकणार नाही.

आम्ही दोन वर्षांपासून यशस्वी बॅटींग करीत आहोत असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना लगावला.टी-ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघातील खेळाडूंचा विधानभवनात आज स्वागत समारंभ आयोजित करण्यात आला. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, सतरा वर्षाच्या प्रतिक्षेनंतर भारतीय संघाने विश्वकप जिंकला. भारतीय संघाने पाकिस्तानला नमवल्यानंतर अर्धा विश्वकप जिंकलाच होता. संपूर्ण देशवासीय आपल्या खेळाडूंचा गौरव करीत आहेत, हा गौरवाचा क्षण आहे.
सूर्यकुमारचा झेल सुटला असता तर...
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, काल विजयी रॅलीत अफाट जनसमुदाय होता. पण अनुचित प्रकार घडू नये, यासाठी चोख सुरक्षा ठेवणाऱ्या मुंबई पोलिसांचेही अभिनंदन करतो. मुंबई क्रिकेटची पंढरी असून जगात भारताला क्रिकेटमुळेही एक वेगळी उंची प्राप्त झाली आहे. भारतीय संघात चार मुंबईकर खेळाडू होते याचा आपल्याला अभिमान आहे. फायनल मॅचमध्ये जर तो झेल सुटला असता तर काय झाले असते? हा विचार करायला नको असेही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
एकही कॅच लिया लेकीन साॅलिड लिया..
सूर्यकुमार यादव याने विश्वचषक सामन्यात घेतलेला झेल साॅलिड होता. त्यामुळेच आजचा दिवस आपण पाहू शकलो. सूर्यकुमारने घेतलेला झेल भारतीय चाहते कधीही विसरू शकणार नाही असे गौरोद्गगार काढत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विश्वचषक विजेत्या खेळाडूंचे भरभरुन अभिनंदन केले.












Click it and Unblock the Notifications