Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

शेतकऱ्याचा मुलगा, रिक्षाचालक ते मुख्यमंत्री! किती दिवस राहीले एकनाथ शिंदे मुख्यमंत्री? वाचा सर्वकाही

Eknath Shinde Resigns : मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर एकनाथ शिंदेंचा झंजावात सुरु झाला तो आताही कायम आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी 57 जागा जिंकल्या. त्यानंतर आज मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा एकनाथ शिंदे यांनी राज्यपालांकडे सुपूर्द केला.

राज्यपालांनी हा राजीनामा स्वीकारून नवीन मुख्यमंत्र्यांची नियुक्ती होईपर्यंत शिंदे यांची काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून नियुक्ती करत असल्याचे पत्र त्यांना सुपूर्द केले. वाई तालुक्यातील शेतकरी, रिक्षाचालक ते मुख्यमंत्री असा त्यांचा प्रवास आहे. आपण याबद्दल जाणून घेऊया.

Eknath Shinde resigns How many days will the cm stay

एकनाथ शिंदे यांनी कधी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ

शिवसेना पक्षातील ऐतिहासिक फुटीनंतर एकनाथ शिंदे हे शिवसेनेच्या 40 आमदारांना सोबत घेऊन सत्तेत सामील झाले होते. 20 जून रोजी विधानपरिषदेची निवडणूक पार पडल्यानंतर शिंदे नॉट रिचेबल झाले होते. विधानसभेतून ठाणे, मग सुरत, त्यानंतर गुवाहाटी असा प्रवास करत ते मुंबईत परतले होते. यानंतर त्यांनी उपमुख्यमंत्रीपद मिळेल, अशी चर्चा सुरु असताना महायुतीने एकनाथ शिंदे यांना अचानक मुख्यमंत्रीपदी बसवत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता. एकनाथ शिंदे यांनी 30 जून 2022 रोजी मुख्यमंत्रि‍पदाची शपथ घेतली होती.

एकनाथ शिंदे किती दिवस होते मुख्यमंत्री?

एकनाथ शिंदे यांनी 30 जून 2022 रोजी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यानंतर त्यांनी आज 26 नोव्हेंबर 2024 रोजी आपल्या पदाचा राजीनामा दिला. हा काळ 2 वर्षे 4 महिने 27 दिवसांचा होता. तर महिन्यांचा विचार केल्यास 28 महिने 27 दिवस आणि 125 आठवडे 5 दिवस असा आहे. एकनाथ शिंदे दिवसांचा विचार केल्यास 880 दिवस मुख्यमंत्री राहीले.

एकनाथ शिंदेंचे 'हे' आवाहन

महायुतीच्या प्रचंड विजयानंतर राज्यात पुन्हा एकदा आपले सरकार स्थापन होणार आहे. महायुती म्हणून आपण एकत्रित निवडणूक लढवली आणि आजही एकत्रच आहोत. माझ्यावरील प्रेमापोटी काही मंडळींनी सर्वांना एकत्र जमण्याचे, मुंबईत येण्याचे आवाहन केले आहे. तुमच्या या प्रेमासाठी मी अत्यंत मनापासून ऋणी आहे. मात्र अशा पद्धतीने माझ्या समर्थनार्थ कुणीही एकत्र येऊ नये, असे आवाहन मी करतो. पुन्हा एकदा माझी नम्र विनंती की शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी वर्षा निवासस्थान किंवा अन्य कुठेही एकत्र जमू नये. समर्थ आणि समृद्ध महाराष्ट्रासाठी महायुती भक्कम होती आहे आणि यापुढेही भक्कमच राहील, असं ट्विट एकनाथ शिंदे यांनी केलं आहे.

विधानसभा निवडणुकीत विजय

ठाणे शहरातील कोपरी पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघावरील आपले वर्चस्व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सलग पाचव्या वेळी सिद्ध केले. त्यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार आणि शिवसेनेचे नेते केदार दिघे यांचा एक लाख 20 हजारांवर मताधिक्याने त्यांचा पराभव केला.

शेतकऱ्यांचा मुलगा, रिक्षाचालक ते मुख्यमंत्री

एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या पाच वर्षात सर्वाधिक चर्चिले जाणारे नाव आहे. एका सामान्य शेतकऱ्याचा मुलगा, रिक्षा चालक, शिवसैनिक, नगरसेवक, गटनेता, आमदार, विरोधी पक्ष नेता, मंत्री आणि मुख्यमंत्री असा थक्क करणारा प्रवास एकनाथ शिंदे यांनी केला आहे.

ठाण्याचे माजी जिल्हाप्रमुख धर्मवीर आनंद दिघे यांच्या तालमीत तयार झालेल्या एकनाथ शिंदे यांनी दिघे यांच्या पश्चात ठाणे जिल्ह्यात शिवसेनेचा प्रचंड विस्तार केला. उत्तम संघटक अशी एकनाथ शिंदे यांची ओळख आहे. आनंद दिघे यांच्या पश्चात राजकीय कारकीर्द घडवण्यासाठी त्यांचे पुतणे केदार दिघे इच्छुक होते मात्र दिघे यांच्याकडे उद्धव ठाकरे यांचे दुर्लक्ष झाले.

नगरविकास मंत्रालय हे आवडते खाते

एकनाथ शिंदे यांचे नगरविकास मंत्रालय हे आवडते खाते आहे. ते जेव्हापासून मंत्री झाले त्यानंतर त्यांनी हे खाते आपल्याकडेच ठेवले. नगर विकास मंत्री असलेल्या एकनाथ शिंदे यांना शिवसेनेत दुजाभावाची वागणूक मिळू लागली असा आरोप होत होता. त्यानंतर त्यांनी बंडाचे हत्यार उपसले आणि बघता बघता 40 आमदार एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी उभे राहिले.

भाजपच्या बळावर शिंदे मुख्यमंत्री

भाजपच्या पाठिंबावर एकनाथ शिंदे हे शिवसेना भाजपा युतीचे मुख्यमंत्री देखील बनले. शिवसेनेचे चिन्ह आणि शिवसेना हा पक्ष देखील एकनाथ शिंदे यांच्याकडे गेला. लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील गटापेक्षा चांगला स्ट्राइक रेट राखून एकनाथ शिंदे यांनी आपले नेतृत्व सिद्ध केले. त्यांच्या पक्षात नाराजी असली तरी कोणत्याही नेत्याने जाहीरपणे ती व्यक्त केली नाही हे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाचे यश मानले जाते.

कोपरी पाचपाखाडी अन् एकनाथ शिंदे

2004, 2009, 2014 आणि 2019 अशा सलग चार वेळा एकनाथ शिंदे यांनी कोपरी पाचपाखाडी हा विधानसभामतदारसंघ जिंकला. मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांची पकड ठाणे पालघर जिल्ह्यावर आणखीनच मजबूत झाली. आनंद दिघे यांच्यामुळेच आपण घडल्याचे एकनाथ शिंदे सर्व व्यासपीठावर मान्य करतात. एकनाथ शिंदे यांचे वर्चस्व मोडून काढण्याचे सर्व ते प्रयत्न उद्धव ठाकरे यांनी केले.

ठाणे जिल्ह्यात आनंद दिघे यांना मानणारा मोठा वर्ग आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या विरोधात आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांना उमेदवारी देऊन उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्या विरोधात प्रबळ आव्हान निर्माण करण्याचा प्रयत्न केला. पण एकनाथ शिंदे यांनी केदार दिघे यांचे आव्हान सहज मोडीत काढले. कोपरी पाच पाखाडी विधानसभा मतदारसंघावर एकनाथ शिंदे आणि मिळवलेला हा सलग पाचवा विजय आहे. आनंद दिघे यांच्या वारशाचा प्रश्न देखील एकनाथ शिंदे यांनी या विजयातून सपशेल मोडीत काढला आहे.

More From
Prev
Next
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+