सरकारला दिलेली डेडलाईन आज संपणार! जरांगेंची पुढची रणनिती काय? वाचा सरकार काय म्हणाले?

छत्रपती संभाजीनगर - मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण आणि सगेसोयरे अध्यादेश अमलबजावणी करावी या मागणीसाठी सुरु असलेल्या शांतता रॅलीचा आज छत्रपती संभाजीनगरात समारोप होत आहे. सरकारला मनोज जरांगे यांनी दिलेली डेडलाईन आज संपत आहे. या अमलबजावणीनंतर पुढे काय? मनोज जरांगे पाटील यांची रणनिती काय? हा प्रश्न आता सर्वांना पडला आहे.

"मनोज दादांनी थोडासा संयम बाळगावा" आम्ही एकही दिवस वाया घालवत नाही असे राज्य सरकारकडून मंत्री शंभुराज देसाई यांनी म्हटले आहे.

Shambhuraj Desai on Maratha Reservation

मनोज जरांगे यांची शांतता रॅली मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यात निघाली. आज या रॅलीचा मराठवाड्याची राजधानी छत्रपती संभाजीनगरमध्ये होत आहे. या रॅलीआधी त्यांच्या मराठवाड्यातील रॅली दणदणीत झाल्या, पण अजूनही सरकारकडून ठोस आश्वास त्यांना मिळाले नसल्याचा सांगण्यात येत आहे.

त्यामुळे आता आठही जिल्ह्यात आठ रॅली झाल्यानंतर मराठा समाजाचे वादळ मुंबईला धडकणार की सरकारला मनोज जरांगे हे अजून डेडलाईन देणार का हे आता पाहायचे आहे. तत्पूर्वी आज सकाळी मनोज जरांगे पाटील यांचा ताफा जालनाहून छत्रपती संभाजीनगरमध्ये दाखल झाला. त्यानंतर रॅली काढण्यात आली आहे.

आज डेडलाईन संपणार

मनोज जरांगे यांनी राज्य सरकारला दिलेली 1 महिन्याची मुदत आज संपत आहे. त्यामुळे, राज्य सरकारचे आरक्षणासंदर्भात काम नेमके कुठपर्यंत पोहोचले, याबाबत सरकारचे प्रतिनिधी आणि मंत्री शंभूराज देसाई यांनी भूमिका मांडली आहे. तसेच, मनोज जरांगे यांनी थोडासा संयम बाळगला पाहिजे, असेही देसाई यांनी म्हटले आहे.

जरांगेंनी 1 महिन्यांचाच वेळ दिला - देसाई

यासंदर्भात मंत्री शंभुराज देसाई म्हणाले, आम्ही जरांगे पाटील यांना ज्यावेळी भेटलो होतो तेव्हा यांच्याकडे दोन महिन्यांचा वेळ आम्ही मागितला होता. परंतु, एकच महिन्यांचा कालावधी त्यांनी दिला. एक महिन्यात आम्ही त्यांना भेटून आल्यानंतर मराठा आरक्षणासंदर्भात एकही दिवस आम्ही वाया घालवलेला नाही. दोन-तीन गोष्टी त्यांनी महत्त्वाच्या मांडल्या होत्या, त्यामध्ये सगे-सोयऱ्यांची अंमलबजावणी आणि हैदराबाद गॅझेट या दोन्ही बाबतीत सर्वपक्षीय बैठक मागच्या 4 दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांनी घेतली.

सरकार लवकरच मार्ग काढेल

मंत्री शंभुराज देसाई म्हणाले, मराठा आरक्षणाच्या संदर्भाने रोजच्या रोज आम्ही आढावा घेत आहोत, बैठका घेत आहोत, हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा आग्रह जो जरांगे पाटील यांचा आहे, त्यासाठी आमच्या 11 अधिकाऱ्यांचे पथक 4 दिवसांपासून तेलंगणा सरकारकडे गेले आहे.

तेलंगणातून ते पथक काल परत आले आहे. मात्र, त्यांच्याशी अद्याप माझी चर्चा झालेली नाही. सोमवारी त्यांच्याशी माझी चर्चा होणार आहे, त्याबाबतीत पण आम्ही सकारात्मक आहोत. शिंदे साहेबांनी जो शब्द दिलेला आहे, त्याप्रमाणे लवकरात लवकर आम्ही यातून मार्ग काढण्याचा नक्कीच प्रयत्न करू.

सरकार करतेय हे काम..

सगळे सोयरे संदर्भात ड्राफ्ट नोटिफिकेशन सरकारने काढले आहे. आठ लाखापेक्षा जास्त हरकती आल्या आहेत. त्यानंतर सुद्धा कालच्या बैठकीत याबाबतीत कायदेशीर मतं लोकांनी दिले. त्या सगळ्यांची छाननी आमच्या विभागामार्फत सुरू आहे. आता, मनोज जरांगे यांनी थोडासा संयम बाळगायला हवा असेही शंभुराज देसाई म्हणाले.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+