महाराष्ट्राचे, हिंदुत्वाचे शत्रू जळून खाक होणार..! - एकनाथ शिंदेंचा 'या' नेत्याला जोरदार टोला
"काही लोक सरड्यासारखे रंग बदलणाऱ्यांसाठी शंकराचा तिसरा डोळा उघडल्याशिवाय राहणार नाही. महाराष्ट्राचे, हिंदुत्वाचे शत्रू त्यात जळून खाक झाल्याशिवाय राहणार नाही," असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाव न घेता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना लगावला.
हिंगोली येथे आमदार संतोष बांगर यांनी आयोजित केलेल्या कावड यात्रेत सहभागी होण्यासाठी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हिंगोली येथे आले होते. त्यावेळी त्यांनी आपल्या खास शैलीत विरोधकांवर टीका केली.

..त्यांनी पाठीत खंजीर खुपसला
एकनाथ शिंदे म्हणाले, भगवा झेंडा हातात पकडायला ताकद लागते जोर लागतो. ते येड्या गबाळ्याचे काम नाही. काही लोक फटाफट सरड्यासारखा रंग बदलत आहेत. एक काहीतरी धरुन ठेवा पहिले तुम्ही एकाच्या पाठीत खंजीर खुपसला. निवडून मतं घेतल्यावर दुसऱ्यांच्या पाठीत खंजीर खुपसला हेच तुमचे हिंदुत्व आहे का? म्हणून हा रंग बदलणाऱ्यांसाठी शंकराचा तिसरा डोळा उघडल्याशिवाय राहणार नाही. महाराष्ट्राचे, हिंदुत्वाचे शत्रू त्यात जळून खाक झाल्याशिवाय राहणार नाही.
#Live📡 🗓️12-08-2024
— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) August 12, 2024
📍हिंगोली
📹भव्य कावड यात्रेतून- लाईव्ह https://t.co/whiVOcrsoL
मतलबी माणूस दिसला की भोलेनाथ तांडव करतात
एकनाथ शिंदे म्हणाले, भगवान शंकर नेहमी सत्याच्या बाजूने उभे राहतात. मतलबी कपटी माणूस दिसला की, भोलेनाथ तांडव करतात. आपण सर्व शंकराचे भक्त आहोत. त्यामुळे मी एवढचं सांगतो की, शिवशंकर आपले, बळीराजाचे आराध्य दैवत आहे. या राज्यातील बळीराजा सुखी व्हावा, आनंदी व्हावा, संकट दूर व्हावी, चांगला पाऊस पडावा म्हणून आपण साकडं घातलं. चांगला पाऊस पडला आणि चांगली समृद्धी शेतकऱ्याला मिळाल्याशिवाय राहणार नाही.
आमचे सरकरा शेतकऱ्यांच्या पाठीशी
एकनाथ शिंदे म्हणाले की, मी भगवान शंकराला साकडं घालतो की, येणारा कालावधी जो आहे, त्यात चांगला पोषक पाऊस पडू दे आणि शेत भरभराट येऊ दे. मी शेतात गेलो तिथं सोयाबीनचं पीक पाहीलं. सोयाबीनला शेंगा बघून मला आनंद वाटला. शेतकरी सुखी व्हावा हीच भावना आमच्या मनात आहे.शेतकरी लाखांचा पोशींदा आहे. शेतकऱ्यांवर जेव्हा संकटं आली तेव्हा आमचे सरकार त्यांच्या पाठीशी होते.
शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही
एकनाथ शिंदे म्हणाले, शेतकऱ्याला हे सरकार वाऱ्यावर सोडणार नाही.नदीजोड प्रकल्प, मराठवाडा वाॅटरग्रीड होणार आहे. आम्हाला नीतीआयोगाच्या बैठकीत पंतप्रधानांनी सहकार्य करण्याचं आश्वासन दिलं. सोयाबीन तूर कापूस यालाही सरकारने साडेपाच हजार कोटींची तरतूद केली आहे.संतोष बांगर कधी कधी रागाच्या भरात संतोष बांगर बोलतो पण तो जनतेच्या भल्यासाठी बोलतो. त्यांचा स्वभावच रोखठोक आहे. काही कानमंत्र मी त्यांना दिले ते त्यांनी बरोबर लक्षात ठेवावे.
मुख्यमंत्र्यांनी सांगितला योजनेचा हप्ता कधी मिळणार
एकनाथ शिंदे म्हणाले, मला सख्खी बहिण एकच आहे पण मला महाराष्ट्रात अनेक बहिणी मिळाल्या, मी त्यांच्यासाठी लाडकी बहिण योजना आणली. त्यांना दर महिन्याला दीड हजार रुपये मिळणार आहेत. विरोधक मला म्हणाले लाडक्या भावांचं काय तर मी त्यांना सांगू इच्छीतो की, आम्ही लाडक्या भावांसाठीही योजना आणली आहे. सहा हजार, आठ हजार, दहा हजार रुपये महिन्याला लाडक्यचा भावाला देणार, मोफत तीन सिलिंडर मुख्यमंत्री अन्नपुर्णा योजनेतून लाडक्या बहिणींना दिले जाणार आहेत.












Click it and Unblock the Notifications