एकनाथ खडसेंचा पुन्हा घुमजाव; म्हणाले-राज्यात पुन्हा महाविकास आघाडीचे सरकार हवे, कारणंही सांगितली
Eknath Khadse on Mahavikas Aghadi : आधी भाजपसोबत वैर घेऊन ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीची वाट धरली. त्यानंतर लोकसभा निवडणुकीत पुन्हा भाजपसोबत गेले. अन् आता प्रवेश जाहीर होत नसल्याने अखेर पुन्हा महाविकास आघाडीची वाट धरण्याचे काम खडसे यांच्याकडून केले जात आहे. कारण खडसे यांचे आजचे एक विधान राजकीय वर्तुळात भुवया उंचावणारे ठरले आहे. राज्यात पुन्हा महाविकास आघाडीचे सरकार यायला हवे, असे विधान करत हेच सरकार का महत्त्वाचे आहे, याचे कारण देखील सांगितले.
आमदार एकनाथ खडसे हे आज जळगावात माध्यमांशी बोलत होते. ते म्हणाले की, महाविकास आघाडीचं सरकार यायला पाहिजे. मागच्या काही दिवसांतील, काही महिन्यांमधील महायुतीचा अनुभव चांगला वाटत नाही. महायुती सरकार आल्याच्या पासून हे सरकार फोडाफोडीचे राजकारण करत आहे. सुडबुध्दीने ईडी सीबीआय सारख्या कारवाया करत आहेत. उट्टे काढण्याचे काम केले जात असून जनतेचे कामं देखील खोळंबली आहेत. लाडकी बहीण योजनेला 46 हजार कोटी द्या आणि त्यासोबतच 46 हजार कोटी रुपये धरणे, रस्ते निर्मितीसाठी द्या म्हणजे त्यातून स्थायी मालमत्ता निर्माण होईल. त्यामुळं हे सरकार जावे आणि महाविकास आघाडी सरकार यावे, असं आपल्याला वारंवार वाटत आहे. असे विधान त्यांनी केले.

निवडणुका डोळ्यासमोर ठेवून लाडकी बहीण योजना
एकनाथ खडसे पुढे बोलताना म्हणाले की, लाडकी बहीण योजना सरकारने निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन आणली असल्याचं जनतेलाही कळते, ही योजना आणायची होती तर पाच वर्ष पूर्वीच आणायला पाहिजे होती, असं एकनाथ खडसे म्हणाले. या योजनेला आपला विरोध नाही मात्र इकडे केलेला खर्च हा नॉन प्लॅन खर्च आहे, एवढाच खर्च जर धरणे उभारणी ,रस्ते निर्मिती साठी केला गेला तर त्यातून रोजगार ही निर्माण होऊ शकणार आहे, त्यासाठी ही प्रयत्न करायला हवं, असं एकनाथ खडसे म्हणाले.
..तर एका दिवसातच राज्याची तिजोरी खाली होईल
कॅबिनेट मंत्री गुलाबराव पाटील यांनी अर्थ खात्याच्या कारभाराबद्दल टीका केली होती. अर्थ खात्यासारखे नालायक खाते पाहिले नाही, असे ते म्हणाले होते. त्यावर देखील खडसे यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, आपणही अर्थमंत्री राहिलो आहे. अर्थ खात्याचे काम करताना प्राधान्य क्रम ठरून निधी द्यावा लागत असतो. त्याला विलंब होऊ शकतो, असे करणे गरजेचे असते. नाही तर राज्याची तिजोरी एकाच दिवसात खाली होऊ शकते असं एकनाथ खडसे म्हणाले. या विधानावरुन त्यांनी अजित पवार यांची पाठराखण केल्याचे दिसून आले.
-
सुनेत्रा पवारांनी चाकणकरांना राजीनामा देण्यास भाग पाडलेचं; सुनेत्रा पवारांची दमदार भूमिका -
महिला आयोगानंतर आता प्रदेशाध्यक्षपदही धोक्यात? रुपाली चाकणकरांवर मोठी कारवाई होणार? -
तटकरेंचा हात डोक्यावर होता म्हणून चाकणकरांना अहंकार, आता थेट मकोका लावण्याची मागणी -
SRH च्या गोटात राडा! ईशानची विकेट घेताच अन्सारीचा संयम सुटला; भर मैदानात नेमकं काय घडलं? -
दिलासा की धक्का? गॅस सिलिंडरबाबत सरकारने घेतला असा निर्णय, जो कुणीही अपेक्षित धरला नव्हता!







Click it and Unblock the Notifications