Devendra Fadnavis राहूल गांधीच्या आरोपांवर मुख्यमंत्री फडणवीसांचे चार वाक्यातच उत्तर! विषयच संपवला!
Devendra Fadnavis' response to Rahul Gandhi's allegations : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत घोटाळा झाल्याचे एका लेखाद्वारे आरोप केले आहेत. यानंतर राज्यात संशयाची सुई निर्माण झाली आहे. यावर काँग्रेसचे कट्टर विरोधक पक्ष असलेल्या भाजपचे नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन तीन वाक्यातच हा विषय संपवला आहे.
लोकसभेतील काँग्रेसचे विरोधी पक्षनेते आणि खासदार राहुल गांधींनी बिहारमध्ये महाराष्ट्रातील निवडणुकांबाबत वक्तव्य केले होते, त्या संदर्भात फडणवीसांनी त्यांच्या वक्तव्याला उत्तर दिले.

नेमके काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीमध्ये वाढलेल्या मतदार संख्येबाबत नेहमी कुठल्याही तथ्यशिवाय खोटे बोलून जनतेच्या मनात संभ्रम निर्माण करत आहेत त्यांनी बिहारमध्ये स्वतःच्या पक्षाची हार यानिमित्ताने मानली आहे त्यांनी जमिनीवर उतरून तथ्य समजून घेणे आवश्यक आहे नाहीतर त्यांची पार्टी ही कधीच जिंकणार नाही असं प्रतिपादन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपुरात प्रसार माध्यमांशी बोलताना केलं.
खोटी विधाने, लाडक्या बहिणींचा अपमान - फडणवीस
महाराष्ट्रातील वाढत्या मतदार संख्येबाबत पूर्वीच केंद्रीय निवडणूक आयोगाने सप्रमाण स्पष्ट केले आहे परंतु राहुल गांधी ही रोज नवीन नवीन खोटे विधाने करून महाराष्ट्रातील जनतेचा तसेच लाडक्या बहिणीचा अपमान करत आहे असं फडणवीस यांनी सांगितलं
काय म्हणाले होते राहुल गांधी?
राहुल गांधींनी एका वर्तमानपत्रात लेख लिहून त्यासह काही मजकूर 5 मुद्द्यात आपल्या एक्स अकाऊंटवर पोस्ट केला आहे. त्यानुसार..
"निवडणूक कशी बळकावली?"
राहुल गांधींनी "निवडणूक कशी बळकावली?" असा सवाल करत 2024 मध्ये होणाऱ्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुका लोकशाहीला हेराफेरी करण्यासाठी ब्लूप्रिंट होत्या. माझ्या लेखात हे कसे घडले ते टप्प्या दर टप्पा दाखवले आहे." असे ते म्हणाले.
टप्पा 1: निवडणूक आयोगाची नियुक्ती करण्यासाठी पॅनेलमध्ये फेरफार करणे
टप्पा 2: यादीत बनावट मतदार जोडणे
टप्पा 3: मतदारांची संख्या वाढवणे
टप्पा 4: भाजपला जिंकण्यासाठी आवश्यक असलेल्या ठिकाणी बोगस मतदानाला लक्ष्य करणे
टप्पा 5: पुरावे लपवणे
"महाराष्ट्रात भाजप इतका हताश का होता?" - राहुल गांधी
"महाराष्ट्रात भाजप इतका हताश का होता? हे समजणे कठीण नाही. परंतु हेराफेरी ही मॅच फिक्सिंगसारखी आहे - फसवणूक करणारा पक्ष गेम जिंकू शकतो, परंतु संस्थांना नुकसान पोहोचवतो आणि निकालावरील जनतेचा विश्वास नष्ट करतो. सर्व संबंधित भारतीयांनी पुरावे पाहिले पाहिजेत. स्वतःचा न्याय करा. उत्तरे मागा. कारण महाराष्ट्रातील मॅच फिक्सिंग पुढे बिहारमध्ये येईल आणि नंतर जिथे भाजप हरत असेल तिथे येईल. मॅच फिक्स्ड निवडणुका कोणत्याही लोकशाहीसाठी विष आहेत." असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. त्यावर मुख्यमंत्री फडणवीसांनी उत्तर दिले आहे.












Click it and Unblock the Notifications