Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

महाराष्ट्राच्या मनात काय, ते...दिसेल!, ठाकरे बंधुंच्या भेटीवर फडणवीसांचे खोचक अन् सूचक विधान!

Devendra Fadnavis on Raj-Uddhav meet, Sanjay Shirsat and Madhuri Misal : मुंबईतील 'मातोश्री' निवासस्थानी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांचे चुलत बंधू आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची घेतलेली भेट सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेचा विषय बनली आहे.

उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त ही भेट झाली असली तरी, या भेटीमागे दडलेल्या राजकीय अर्थांवर विविध तर्कवितर्क लावले जात आहेत.

या संपूर्ण घडामोडींवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया दिली असून, त्यांनी ही भेट 'आनंदाची बाब' असल्याचे म्हटले आहे, पण त्याच वेळी महाराष्ट्राच्या राजकीय भवितव्याबाबत सूचक विधान देखील त्यांनी केले आहे.

Devendra Fadnavis on Raj and Uddhav Thackeray

राज-उद्धव भेटीवर मुख्यमंत्र्यांचे 'राजकीय' भाष्य

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, उद्धव ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे, त्यांना शुभेच्छा देण्यासाठी राज ठाकरे गेले ही आनंदाची बाब आहे." यात राजकारण पाहणे योग्य नाही असेही त्यांनी नमूद केले. मात्र, या भेटीनंतर महाराष्ट्राच्या राजकीय समीकरणात काय बदल होतील, या प्रश्नावर फडणवीस यांनी थेट उत्तर देण्याचे टाळत, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आणि आगामी निवडणुकांकडे लक्ष वेधले.

"महाराष्ट्राच्या मनात काय आहे, हे तुम्हाला विधानसभेच्या निवडणुकीत दिसले आहे आणि महाराष्ट्राच्या मनात काय आहे, हे तुम्हाला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही दिसेल," असे म्हणत त्यांनी ठाकरे बंधूंच्या संभाव्य राजकीय एकत्र येण्यावर अप्रत्यक्षपणे भाष्य केले. तर फडणवीस म्हणाले की, काही पक्षांच्या नेत्यांच्या मनात जे आहे, तेच महाराष्ट्राच्या मनात आहे असे म्हणणे योग्य नाही, हे फार मोठे स्टेटमेंट ठरेल, असाही टोला त्यांनी लगावला.

शिरसाट-मिसाळ यांनाही फडणवीसांनी सुनावले!

मंत्र्यांमध्ये बैठकांच्या मुद्यावरुन सुरु असलेल्या मतभेदांवरही मुख्यमंत्र्यांनी आपली भूमिका मांडली. मंत्री संजय शिरसाट आणि राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्यातील पत्रव्यवहाराबाबत ते म्हणाले, "असे पत्र लिहून कोणीही वाद निर्माण करू नये. मंत्र्यांनी आपापसात बोलावे आणि काही अडचणी असतील तर त्यांनी मला येऊन सांगावे, त्यातील अडचण दूर करता येईल." मंत्री आणि राज्यमंत्री दोघेही शासनाचे अविभाज्य भाग आहेत, असे सांगत त्यांनी राज्यमंत्र्यांना बैठका घेण्याचा पूर्ण अधिकार असल्याचे स्पष्ट केले. मात्र, अशा बैठकांमध्ये काही धोरणात्मक निर्णय होत असतील, तर ते संबंधित मंत्र्यांशी बोलल्याशिवाय घेऊ नयेत किंवा घेतल्यास मंत्र्यांची मान्यता घ्यावी, असा सल्लाही त्यांनी दिला. मंत्री आणि राज्यमंत्र्यांनी सामंजस्य दाखवावे आणि काही अडचण असल्यास थेट माझ्याशी बोलावे, असे आवाहन त्यांनी केले.

पुण्यातील रेव्ह पार्टीवर फडणवीस काय म्हणाले?

पुण्यातील रेव्ह पार्टीवर झालेल्या कारवाईबाबत, ज्यात माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांना अटक करण्यात आली आहे, मुख्यमंत्री म्हणाले की त्यांना माध्यमांतूनच या घटनेची माहिती मिळाली आहे. "मी सकाळपासून विविध कार्यक्रमांमध्ये फिरतो आहे, त्यामुळे मला ब्रीफिंग घेता आलेले नाही.

पुणे पोलिसांनी एका रेव्ह पार्टीवर कारवाई केली आहे. त्यात काही लोक आणि अंमली पदार्थ सापडले आहेत. पोलीस अधिकाऱ्यांकडून पूर्ण ब्रीफिंग घेतल्यानंतरच मी यावर अधिक बोलेन," असे त्यांनी स्पष्ट केले.

नागपूरच्या 'मोबिलिटी प्लॅन'वर फडणवीस काय म्हणाले?

याशिवाय, नागपूर जिल्ह्याच्या पुढील ३० वर्षांसाठी तयार करण्यात आलेल्या "कॉम्प्रेहेन्सिव्ह मोबिलिटी प्लॅन" बाबतही त्यांनी माहिती दिली. 'राइट्स' या संस्थेने हा आराखडा तयार केला असून, त्यात सध्याच्या आणि भविष्यातील गरजा लक्षात घेऊन रस्ते मोठे करणे, नवीन रस्ते, अंडरपास, उड्डाणपूल, बस व्यवस्था आणि वाहतूक सिग्नलची व्यवस्था पाहणे आदी गोष्टींचा समावेश आहे. लवकरच हा प्लान जनतेसाठी खुला केला जाईल आणि त्यांच्या सूचना घेतल्या जातील, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

More From
Prev
Next
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+