औरंगजेबाच्या कबरीचा अंत करण्यास फडणवीसांचा पाठिंबा; पण त्याला कायद्याचा अभय, वाचा नेमका वाद!

Devendra Fadanvis on Aurangzeb Tomb controversy : छत्रपती संभाजीनगर येथील मुघल राजा औरंगजेबाची कबर हटवण्याच्या मागणीला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समर्थन दिले आहे. परंतु, यातील प्रमुख अडथळा देखील त्यांनी सांगितला. त्यामुळे कायद्याच्या नियमानुसारच ही कारवाई केली जाऊ शकते, असेही त्यांनी सांगितले. मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या मागणीला मुख्यमंत्र्यांनी सभागृहात उत्तर दिले.

अबू आझमींमुळे सुरु झाला वाद

समाजवादी पार्टीचे महाराष्ट्रातील नेते आणि आमदार अबू आझमी यांनी औरंगजेबला क्रूर शासक मानत नाही असे विधान केले. ओरंगजेब हा उत्तम शासक होता, असा दावा त्यांनी केला. त्यामुळे महाराष्ट्राच्या विधिमंडळात नवा वाद सुरू झाला. अखेर अबू आझमी यांचे अर्थसंकल्पीय अधिवेशन काळापुरते निलंबन करण्यात आले. दरम्यान, आता औरंगजेब यांची कबर नष्ट करण्यात यावी, अशी मागणी भाजपासह शिवसेना आमदारांकडून केली जात आहे.

Devendra Fadnavis on Aurangzeb Tomb

काय म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस?

देवेंद्र फडणवीस यांनी औरंगजेब कबरीवरील मागणीवरुन निवेदन केले. ते म्हणाले की, आपल्या सर्वांनाही तेच हवे आहे, परंतु तुम्हाला ते कायद्याच्या चौकटीत करावे लागेल, कारण ते एक संरक्षित स्थळ आहे. काही वर्षांपूर्वी काँग्रेसच्या काळात हे स्थळ एएसआय (भारतीय पुरातत्व सर्वेक्षण) च्या संरक्षणाखाली ठेवण्यात आले होते, त्यामुळे त्यावर कोणतीही कारवाई थेट करता येणार नाही.

भाजप नेते मुनगंटीवार काय म्हणाले?

भाजप नेते सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, मी अफजलच्या कबरी जवळच अतिक्रमण हटवलं होतं. माझा या विषयावर वेगळा विचार असू शकत नाही. महाविकास आघाडी सरकारला कबर कायम ठेवायची होती. पण आमचं सरकार ही कबर हटवण्याच्या बाजूने आहे. ते पुढे बोलताना म्हणाले की, औरंगजेबासारख्या आक्रमकाच उदात्तीकरण होऊ नये. रावणानंतर तो मोठा दुष्ट माणूस होता, असेही विधान सुधीर भाऊ मुनगंटीवार यांनी केले.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+