Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

मंत्री धनंजय मुंडे यांच्यासमोरील अडचणी वाढल्या; 'तो' ठराव झाल्यामुळे राजीनामा देतील का?

बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपांमध्ये अडकलेल्या मंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणी आता पुन्हा वाढल्या आहेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये आयोजित विद्रोही साहित्य संमेलनात धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याचा ठराव घेण्यात आला. विद्रोही साहित्य संमेलनामध्ये जे 29 ठराव घेण्यात आले, त्यात मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्यात यावा, असा ठराव देखील घेण्यात आला.

Dhananjay Munde s Resignation Demand

काय घेतलाय ठराव?

छत्रपती संभाजीनगरमध्ये विद्रोही साहित्य संमेलनाचं आयोजन करण्यात आल आहे. या साहित्य संमेलनामध्ये आज एकूण 29 ठराव घेण्यात आले. मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्यात यावा, असा ठरावही त्यात घेण्यात आला. धनंजय मुंडे यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानंतर विरोधकांकडून धनंजय मुंडे यांच्या कोंडीचा प्रयत्न सुरू आहे. नैतिकता म्हणून धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी होत आहे. आता विद्रोही साहित्य संमेलनात मंत्री मुंडे यांच्या राजीनाम्याचा ठराव घेतल्याने या विषयाची चांगलीच चर्चा रंगली आहे.

मुंडे यांच्या अडचणी वाढल्या

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर राज्यातील वातावरण चांगलंच तापलं आहे. या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय असलेल्या वाल्मिक कराडचे नाव घेतले जात आहे. त्यातूनच मंत्री मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया व आ. सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप देखील केले आहेत. आता छत्रपती संभाजीनगरमध्ये आयोजित विद्रोही साहित्य संमेलनामध्ये देखील मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याचा ठराव घेण्यात आला आहे. त्यामुळे मुंडे यांच्यासमोरच्या अडचणी वाढल्या आहेत.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+