"आई, मी निघालोय, पोहोचल्यावर सांगतो" दीपकचा हा मेसेज ठरला शेवटचा; बदलापूरच्या सुपुत्राने गमावला जीव
अहमदाबाद येथे घडलेल्या भीषण विमान अपघाताने संपूर्ण देश हादरला आहे. या दुर्घटनेत महाराष्ट्रातील बदलापूर शहरातील रहिवासी आणि एअर इंडियामधील क्रू मेंबर दीपक पाठक यांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी माहिती समोर आली आहे.

अगदी काही तासांपूर्वीच त्यांनी आईला एक साधा मेसेज पाठवला होता - "आई, मी निघालोय... पोहोचल्यावर सांगतो." मात्र, हा संवाद त्यांच्या आयुष्यातील शेवटचा ठरला.
AI171 फ्लाइटचा भीषण अंत
एअर इंडियाचे AI171 हे बोईंग 787 विमान आज अहमदाबादहून लंडनच्या गॅटविक विमानतळासाठी उड्डाण करत होते. या विमानात 230 प्रवासी आणि 12 कर्मचारी असे एकूण 242 जण प्रवास करत होते.
टेकऑफनंतर काहीच वेळात विमानाने नियंत्रण गमावले आणि ते थेट मेघाणीनगर भागातील एका वैद्यकीय महाविद्यालयाच्या वसतिगृहावर कोसळले. अपघात इतका भीषण होता की विमानातील बहुतांश प्रवासी आणि कर्मचारी घटनास्थळीच मृत्युमुखी पडल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
दीपक पाठक, एक जबाबदार मुलगा, पती आणि एअर इंडियाचा समर्पित कर्मचारी
दीपक पाठक हे वयाने 35 वर्षांचे होते. त्यांचं मूळ गाव बदलापूर असून, ते गेल्या काही वर्षांपासून पत्नीसमवेत घाटकोपर येथे राहत होते. घरात आई-वडील, दोन बहिणी आणि पत्नी असा परिवार होता.
त्यांचे वडील नुकतेच न्यूमोनियावर उपचार घेऊन हॉस्पिटलमधून घरी परतले आहेत. त्यांना दीपकच्या अपघाताची बातमी देण्यात आलेली नाही. बहिणींना एअर इंडियाने अहमदाबादला डीएनए तपासणीसाठी पाठवले असून, अधिकृत ओळख पटवण्यासाठी ही प्रक्रिया सुरू आहे.
"फोन वाजतो, पण दीपक उचलत नाही..."
या दुर्घटनेने दीपकच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्याच्या बहिणीने सांगितलं की, "आम्ही अजूनही कॉल करत आहोत, फोन वाजतो पण उचलत नाही... एरवी एकदा तरी रिप्लाय यायचा." त्याचा शेवटचा मेसेज आईला होता, ज्यात त्याने केवळ एवढंच लिहिलं होतं "आई, मी निघालोय... पोहोचल्यावर सांगतो." या साध्या वाक्याने संपूर्ण घरचं वातावरण हळवं करून टाकलं आहे.
डोंबिवलीकर रोशनी सोनघरे हिचाही मृत्यू
या दुर्घटनेत आणखी एक दुर्दैवी घटना म्हणजे डोंबिवलीतील कु. रोशनी सोनघरे हिचा मृत्यू. रोशनी एअर इंडियाच्या क्रू टीमचा भाग होती. तिचेही कुटुंब हादरून गेले असून, अपघातानंतर तिच्या घरासमोर शोककळा पसरली आहे.
कुटुंबीय, मित्र, आणि शेजाऱ्यांच्या भावना
बदलापूरमधील दीपकच्या घरासमोर लोकांची गर्दी जमली आहे. शेजारी, नातेवाईक आणि मित्रांना अजूनही विश्वास बसत नाही की दीपक आता परतणार नाही. तो अतिशय जबाबदारीने आपले कर्तव्य बजावत होता, आयुष्याच्या एका टप्प्यावर स्थिरावलेला असताना काळाने त्याला असं अचानक हिरावून घेतलं.
सरकार आणि प्रशासनाकडून तपास सुरू
अपघातानंतर घटनास्थळी एनडीआरएफ, पोलीस आणि अग्निशमन दलाच्या टीमने शोध आणि बचावकार्य सुरू केलं आहे. काही मृतदेहांची ओळख पटलेली नसल्याने डीएनए तपासणी करून अंतिम पुष्टी केली जात आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घटनेची दखल घेतली आहे आणि अपघाताच्या कारणांचा सखोल तपास केला जात आहे.
एक शेवटची आठवण...
दीपकचा "आई, मी निघालोय..." हा साधा पण भावनांनी भरलेला मेसेज त्याच्या आईसाठी कायमचा एक अमूल्य आणि वेदनादायक आठवण बनून राहिला. विमान अपघाताच्या या अनपेक्षित झटक्याने दीपकसारखा एक सज्जन, कर्तव्यनिष्ठ आणि कुटुंबवत्सल माणूस काळाच्या पडद्याआड गेला.
-
संभाजीनगरचा प्रसिद्ध रील स्टार अरुण तुपेचं संशयास्पद निधन; राहत्या घरात आढळला मृतदेह, नेमकं काय घडलं -
Daily Horoscope 11 मार्च 2026 : आजचे राशीभविष्य, 'या' राशींना मिळणार नवीन संधी आणि जीवनात यश! -
IND vs NZ: बुमराह, अन् अक्षरचा फायनलमध्ये जलवा; न्युझीलंडच्या फलंदाजांना कसं केलं गारद? वाचा -
"सुप्रीम कोर्टात फक्त बंगालचीच प्रकरणे आहेत का?"; पश्चिम बंगाल SIR प्रकरणावर सरन्यायाधीशांचा संताप -
घरगुती सिलिंडर बुकिंगच्या नियमांत मोठा बदल; साठेबाजी रोखण्यासाठी सरकारने घेतला हा निर्णय -
लाडकी बहीण होणार 'लखपती'; बिनव्याजी कर्ज आणि व्यवसायाची संधी, मुख्यमंत्र्यांनी मांडला मेगा प्लॅन! -
नंदकिशोर कागलीवाल यांचा गौरव; राजस्थान राज्य कृषी विद्यापीठाकडून मानद 'डॉक्टरेट' प्रदान -
Todays Horoscope marathi : आज या राशींचे नशीब चमकणार! पाहा सोमवार 9 मार्चचे तुमचे राशीभविष्य -
सोने-चांदीचे दर घसरले! सोने 8,797 रुपयांनी; चांदी चक्क 29,700 रुपयांनी स्वस्त; का घसरत आहेत दर? वाचा -
Kuldeep yadav wedding date : कुलदीप यादव बोहल्यावर चढणार! कोण आहे होणारी पत्नी वंशिका? जाणून घ्या -
पुरुषांनो, 'या' 5 सामान्य लक्षणांकडे चुकूनही दुर्लक्ष करू नका; असू शकतो वाढलेल्या प्रोस्टेटचा धोका! -
वयाच्या 30व्या वर्षीच विसरभोळेपणा वाढलाय? सावधान 'ब्रेन' हा आजार असू शकते, जाणून घ्या लक्षणे








Click it and Unblock the Notifications