'शक्ती' वादळ सक्रिय! मराठवाडा, विदर्भ-कोकणसाठी पुढील ४ दिवस अलर्ट, तुमच्या जिल्ह्याची स्थिती कशी?

Rain Alert for Maharashtra : गेल्या महिनाभरापासून मुसळधार पावसामुळे मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील शेतकरी आणि नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. पूरपरिस्थिती, शेतीचे झालेले अतोनात नुकसान आणि विस्कळीत झालेली वाहतूक व्यवस्था, यामुळे जनजीवन अजूनही पूर्वपदावर आलेले नाही.

या नुकसानीतून सावरत असतानाच, आता पुन्हा एकदा अरबी समुद्रात 'शक्ती' नावाचे चक्रीवादळ सक्रिय झाले आहे. या चक्रीवादळाच्या प्रभावामुळे आणि पावसाला पोषक वातावरणामुळे पुढील चार दिवस मराठवाडा, विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि कोकण किनारपट्टीवर जोरदार ते हलक्या पावसाचे अलर्ट जारी करण्यात आले आहेत.

हवामान खात्याने कोणत्या जिल्ह्यांना 'येलो अलर्ट' दिला आहे आणि पुढील चार दिवस राज्यातील हवामानाची स्थिती काय असेल, याचा सविस्तर आढावा घेऊया.

Rain Alert for Maharashtra

'शक्ती' चक्रीवादळ आणि कोकण किनारपट्टीवर प्रभाव

अरबी समुद्रात सक्रिय झालेल्या 'शक्ती' चक्रीवादळाचा थेट परिणाम कोकण किनारपट्टी आणि आसपासच्या जिल्ह्यांवर होण्याची शक्यता आहे. यामुळे मुंबई, ठाणे आणि कोकणातील अनेक जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे.

पुढील चार दिवसांत या चक्रीवादळाच्या प्रभावाखाली येणाऱ्या भागांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे.

पुढील ४ दिवसांसाठी पावसाचे अलर्ट (५ ते ९ ऑक्टोबर)

५ ऑक्टोबर (येलो अलर्ट):

पालघर, ठाणे, नाशिक, धुळे, नंदुरबार आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. मराठवाड्यात बहुतांश ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

६ ऑक्टोबर (येलो अलर्ट आणि हलक्या पावसाची शक्यता)

विदर्भातील जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट: नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली. मराठवाड्यातील परभणी, हिंगोली, धाराशिव, लातूर, नांदेड तसेच धुळे, जालना आणि नंदुरबार जिल्ह्यांत हलक्या पावसाची शक्यता आहे.

७ ऑक्टोबर (येलो अलर्ट आणि हलक्या पावसाची शक्यता):

येलो अलर्ट : पालघर, ठाणे, नाशिक, धुळे, नंदुरबार आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट कायम आहे. मुंबई, रायगड, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, धाराशिव, बीड, जालना, जळगाव या जिल्ह्यांमध्ये हलक्या पावसाची शक्यता आहे.

८ ऑक्टोबर (येलो अलर्ट आणि हलक्या पावसाची शक्यता)

येलो अलर्ट: परभणी, हिंगोली तसेच रत्नागिरी, सातारा आणि सांगली जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात बहुतांश ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.

९ ऑक्टोबर (येलो अलर्ट):

कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र: रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यांसह धाराशिव (उस्मानाबाद) जिल्ह्यालाही पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे.

मराठवाड्याला पुन्हा पावसाचा धोका?

गेल्या महिन्यात जोरदार पावसाचा फटका बसलेल्या मराठवाड्यात चार-पाच दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पावसाला पोषक वातावरण निर्माण झाले आहे. ५ ते ८ ऑक्टोबर दरम्यान मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यांत हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी हवामान विभागाच्या सूचनांचे पालन करावे आणि योग्य ती खबरदारी घ्यावी.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+