काँग्रेस प्रवक्त्याची मराठी भाषिकांवर अश्लाघ्य टीका; राज्यभरात संतापाचा आगडोंब
Congress spokesperson Alok Sharma Controversial statement : "बदलापूर मध्ये मराठी माणसाने बलात्कार केला, तरीही तुम्ही त्याला वाचवणार आहात का??" हा प्रश्न आहे काँग्रेस प्रवक्ते अलोक शर्मा यांचा. बदलापूर येथे घडलेल्या नृशंस घटनेनंतर "आज तक" या आघाडीच्या वृत्तवाहिनीवर अंजना ओम कश्यप यांच्या शोमध्ये त्यांनी हे विधान केले. वास्तविक बलात्कारासारखी अमानवी कृती आणि कोणत्याही एका वर्गाचा संबंध थेट लावणे चुकीचे आणि अनाठायी असते. मात्र आलोक शर्मा यांनी असा संबंध लावला, मराठी माणसांना थेट बलात्कारी म्हणण्यापर्यंत त्यांची मजल गेली आणि महाराष्ट्रात संतापाचा आगडोंब उसळला.
समाजाच्या विविध स्तरातून, मराठी प्रेमी नागरिकांतून, इतिहासप्रेमी नागरिकांतून आलोक शर्मा यांच्या या वक्तव्याची तीव्र निर्भत्सना करण्यात आली आहे. याचे पडसाद सोशल माध्यमांवरही पडले असून निषेधही व्यक्त होत आहे.

शर्मा यांच्याविरोधात मराठी भाषिकांमध्ये संतापाची लाट
समाज माध्यमावर आलोक शर्मा यांचा निषेध करणाऱ्या हजारो पोस्ट पडल्या आहेत. जागोजागी आलोक शर्मा यांच्या निषेधाचे फलक लागले आहेत. भाजप आणि शिवसेना यांनी आलोक शर्मा यांच्या कृतीचा तीव्र शब्दात निषेध केला आहे. केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी राहुल गांधी यांच्या स्पष्टीकरणाची मागणी केली आहे.
आलोक शर्मा यांनी बलात्कारी म्हणून मराठी माणसाचा अपमान केल्याबद्दल शिवसेनेने पोलिसात तक्रार दाखल केली आहे. तसेच शर्मा यांच्या हकालपट्टीची मागणी केली आहे. शर्मा यांच्या विरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जगभरातील मराठी भाषिकांमध्ये शर्मा यांच्या विधानाबद्दल तीव्र संताप व्यक्त होतोय.
मराठी माणसाचा बलात्कारी असा उल्लेख करून काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते आलोक शर्मा यांनी तमाम मराठी माणसांचा आणि महाराष्ट्राचा अपमान केला आहे. याच वक्तव्याचा निषेध नोंदवत शिवसेनेचे सोशल मीडिया राज्यप्रमुख आणि युवासेनेचे सरचिटणीस मा.श्री. राहुल कनाल यांनी मुंबई पोलिसांकडे केलेल्या… pic.twitter.com/PsTrE2tLTP
— Shivsena - शिवसेना (@Shivsenaofc) August 23, 2024
बलात्काराच्या गुन्ह्याचा आणि माणुस यांचा संबंध काय ?
शर्मा यांच्या वक्तव्याच्या विरोधात निर्माण झालेला रोष कोणत्याही एका पक्षात किंवा कोणत्याही एका शहरात नाही. तो सर्वपक्षीय आहे. चांद्यापासून बांद्यापर्यंत आणि मुंबईपासून नागपूरपर्यंत पसरलेल्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात वसलेले मराठी भाषेत आलोक शर्मा आणि त्यांच्या पक्षाची निंदा करीत आहेत. स्त्रीवरील अत्याचार ही कोणत्याही समाजासाठी भूषणावह बाब नसते, असलीच तर ती निंदनीय असते.
स्त्रीवर अत्याचार करणारा कोणत्याही भाषेचा धर्माचा जातीचा प्रतिनिधी नसतो. तर तो बलात्कारीच असतो आणि तीच त्याची जात धर्म भाषा असते त्यामुळे कोणत्याही एका भाषेशी त्याचा थेट संबंध लावण्याचा थेट अपराध आलोक शर्मा यांनी केला आहे, अशी समस्त मराठी जनतेची भावना आहे.
मराठी माणसाला बलात्कारी म्हणणाऱ्या काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते आलोक शर्मा यांचा आणि त्यावर मराठी माणसाचा अपमान होऊनही तोंड बंद ठेवणाऱ्या उबाठाचा जाहीर निषेध !#congressinsultsmarathimanus pic.twitter.com/jhEVJ8DGcP
— Shivsena - शिवसेना (@Shivsenaofc) August 23, 2024
महाराष्ट्राला स्त्री दाक्षिण्याची उज्ज्वल परंपरा
महाराष्ट्राला स्त्री-दाक्षिण्याची उज्वल परंपरा आहे. ही परंपरा थेट छत्रपती शिवाजी महाराज यांच्यापासून चालत आलेली आहे. कल्याणच्या सुभेदाराची सून उचलून आणणाऱ्या रांझाच्या पाटलाचे हात तोडण्याचे आदेश छत्रपतींनी दिले होते आणि साडी चोळी देऊन कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेची पाठवणी केली होती. पंडिता रमाबाई, डॉक्टर आनंदीबाई जोशी, सावित्रीबाई फुले अशी मोठी परंपरा महाराष्ट्राला लाभली आहे.

स्त्रियांसाठी पहिली शाळा महाराष्ट्रात सुरू झाली. शिक्षण, संशोधन, विज्ञान, कला, संस्कृती अशा क्षेत्रात मराठी स्त्रियांना व्यासपीठ मिळाले. महाराष्ट्रात असलेल्या उदारमतवादी वातावरणामुळे आणि मराठी माणसाच्या भक्कम पाठिंब्यामुळे मराठी स्त्रिया अनेक क्षेत्रात पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करू शकल्या. तरीही "मराठी माणसाने बलात्कार केला" अशी भाषा का वापरली जाते, असा प्रश्न आज सामान्य मराठी माणूस विचारीत आहे.
मराठी माणसाची हेटाळणी हीच कॉंग्रेसची परंपरा
स्वातंत्र्योत्तर काळात काँग्रेसने नेहमीच मराठी भाषा, मराठी माणूस आणि महाराष्ट्र यांना हेताळणीची वागणूक दिली. अलोक शर्मा यांनी केलेले विधान काँग्रेसच्या त्याच परंपरेचा आजचा अविष्कार आहे अशी भावना महाराष्ट्रात कानाकोपऱ्यात व्यक्त होत आहे.
कॉंग्रेसला महाराष्ट्राबद्दल नेहमी आकस
दिल्ली आणि भारतातही कोणत्याही मराठी माणसाचे वजन वाढू नये याची दखल काँग्रेसने नेहमीच घेतली. महाराष्ट्राला अधिकचे काही मिळू नये, यासाठीही काँग्रेस आणि दिल्लीतील काँग्रेसचे नेतृत्व नेहमीच प्रयत्नशील राहिले. महाराष्ट्राचा बुलंद आवाज असलेले घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना काँग्रेसनेच दोन वेळा पराभूत केले. मुंबईसह महाराष्ट्र निर्माण होऊ नये अशीही काँग्रेसचीच इच्छा होती, म्हणूनच संयुक्त महाराष्ट्राचे आंदोलन दडपून टाकण्याचा प्रयत्न काँग्रेसने केल्याचा इतिहास लोक आजही सांगतात.
मुंबईसह महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीसाठी 105 मराठी भाषिकांनी हौतात्म्य पत्करले. काँग्रेस नेतृत्वाने केलेल्या गोळीबारात हे बलिदान त्यांना द्यावे लागल्याचा इतिहास मराठीजन सांगतात. संयुक्त महाराष्ट्राचे कित्येक आंदोलक जखमी झाले कित्येक जण कारागृहात गेले अशा आठवणी जुने मराठी भाषिक जागवतात.

शर्मा यांनी चालवली कॉंग्रेसची परंपरा
भाषावार प्रांतरचना करताना महाराष्ट्रावर प्रचंड अन्याय झाल्याचा आरोप सतत होतो. बेळगाव, बिदर, भालकी, कारवार, निपाणी, खानापूर असा मराठी भाषिक प्रदेश अन्यायाने काँग्रेसच्या सहमतीने कर्नाटकात डांबण्यात आल्याचा सीमाभागातील मराठी भाषिकांचे म्हणणे आहे. आजही तेथील मराठी भाषिक महाराष्ट्रात जाण्यासाठी धडपडत आहे. मात्र या चाळीस लाख मराठी भाषिकांना आजही न्याय मिळालेला नाही असे या मराठी भाषिकांचे म्हणणे आहे.

या आंदोलनात कित्येक लोक हुतात्मे झाले. कित्येक जायबंदी झाले. अनेकांना कारावास भोगावा लागला. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कन्नड सक्ती विरोधी आंदोलनात 40 दिवस बेल्लारीच्या कारागृहात होते. अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनीही कारावास भोगला आहे. सीमाभागातील लाखो मराठी भाषेवर अन्यायाचा पायाच काँग्रेसने घातल्याची भावना मराठी भाषिकांची आहे आणि महाराष्ट्राला तुच्छ लेखण्याची काँग्रेसची परंपरा अलोक शर्मा पुढे नेत आहेत अशी भावना सीमा भागातील मराठी भाषिक व्यक्त करीत आहेत
कॉंग्रेसचा मराठी अध्यक्ष कधी?
काँग्रेसच्या वरिष्ठ नेतृत्वात एकाही मराठी माणसाचा समावेश नाही. स्वातंत्र्योत्तर काळात काँग्रेसने एकाही मराठी भाषिकाला अध्यक्षपदी संधी दिलेली नाही. ताकदवान मराठी नेत्यांना खच्ची करण्याचा एक कलमी कार्यक्रमच काँग्रेसने राबवला. यशवंतराव चव्हाण, शंकरराव चव्हाण, शरद पवार अशी अनेक नावे त्यात घेता येतील. त्यामुळेच महाराष्ट्राचा खमका आवाज काँग्रेसमध्ये घुमू शकला नाही. मराठी नेत्यांच्या आकांक्षा पायदळी तूडवण्यात काँग्रेसने धन्यता मानली. अमराठी नेते, अमराठी प्रवक्ते यांनी नेहमी जाहीर व्यासपीठावर महाराष्ट्राच्या आणि मराठी माणसाच्या विरोधातच भूमिका घेतली. अलोक शर्मा ही हा त्याच साखळीचा पुढचा दुवा आहे, असा आरोप मराठी भाषिक जनतेतून व्यक्त होत आहे
उद्धव ठाकरे, संजय राऊत यांचे सोयीस्कर मौन
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र आहेत. बाळासाहेबांनी नेहमीच ज्वलंत मराठीचा पुरस्कार केला. मराठी भाषिकांची बाजू लावून धरली. मराठी भाषिकांना न्याय दिला. मराठी भाषा आणि महाराष्ट्र तसेच मराठी भाषिक यांच्या विरोधात खुट्ट झाले तरी बाळासाहेब त्याला फाडून टाकत असत.

आलोक शर्मा यांनी राष्ट्रीय वाहिनीवर थेट मराठी भाषिकांना बलात्कारी म्हटले असले तरी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत असे बाळासाहेबांचा वारसा सांगणारे नेते चुप्पी साधून आहेत. काँग्रेसच्या महाराष्ट्रातील नेत्यांनी एका शब्दानेही आलोक शर्मा यांचा निषेध केलेला नाही. शरद पवार, सुप्रिया सुळे, रोहित पवार, जितेंद्र आव्हाड हे नेते देखील या विषयावर सोयीस्कर मौन पाळून आहेत. त्यांच्या मौनाचे कारण काय, असा सवाल आता उपस्थित झाला आहे.












Click it and Unblock the Notifications