छत्रपती शिवाजी महाराजांची ऐतिहासिक स्थळे पाहण्यासाठी सर्किट ट्रेन, CM फडणवीस यांच्याकडून मोठी घोषणा
महाराष्ट्रसह देशभरातील शिवप्रेमींसाठी आनंदाची बातमी आहे. यापुढे आता राज्यातील छत्रपती शिवाजी महाराजांची ऐतिहासिक स्थळे आणि राज्यातील इतर सांस्कृतिक स्थळे पाहता, यावीत यासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून एक योजना आणली आहे.
राज्यात लवकरच छत्रपती शिवाजी महाराज सर्किट ट्रेन सुरु होणार,असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. या सर्किट ट्रेनने राज्यातील ऐतिहासिक स्थळांना भेट देता येणार आहे. सर्किट ट्रेनने 10 दिवस प्रवास करता येणार आहे, असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव विविध ऑडिटोरिअम्सची पाहणी केली. या पाहणीनंतर त्यांनी एकत्र पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्रातील रेल्वे प्रकल्पांबाबत मोठमोठ्या घोषणा केल्या आहेत. त्यावेळी केंद्रीय रेल्वे मंत्री आश्विनी वैष्णव यांनी राज्यातील विविध रेल्वे प्रकल्पाबदलची माहिती दिली आहे. 'महाराष्ट्रात 1 लाख 73 हजार कोटींची कामे सुरू आहेत. यामध्ये मुंबईसह इतर परिसरात 17 हजार कोटींची कामे सुरू", असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे.
"मुंबईतील अनेक रेल्वे प्रकल्पांची कामं प्रगतीपथावर सुरु आहेत. राज्यातील 132 रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास करण्यात येणार आहे. महाराष्ट्रासाठी 1 लाख 73 हजार कोटीचे रेल्वे प्रकल्प उभारला जाणार आहे. तसेच यावर्षी जवळपास 24 हजार कोटी रुपये हे रेल्वे बजेटमध्ये राज्याला मिळाले आहेत, अशी माहीती फडणवीस यांनी दिली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची ऐतिहासिक स्थळे आणि राज्यातील इतर सांस्कृतिक स्थळे पाहता यावीत, यासाठी सर्किट ट्रेन सुरु करणार, असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे.
LIVE | Press Conference with Hon Union Minister Ashwini Vaishnaw ji on railway and other important projects.
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) April 11, 2025
🕐 1.03pm | 11-4-2025📍BKC, Mumbai.@AshwiniVaishnaw#Maharashtra #Mumbai #PressConference https://t.co/SBAfNJs2Dz
दरम्यान "गोंदिया बल्लारशा रेल्वे लाईनचा दुहेरीकरणाकरीता 4819 कोटी रुपये केंद्र सरकारने दिलेले आहेत. आणि यामुळे निश्चितपणे जो विदर्भाचा भाग आहे त्याला एक मोठा फायदा होणार आहे. विशेषत: छत्तीसगड आणि तेलंगणाचा जो व्यापार आहे व्यवहार आहे हा विदर्भाचा वाढण्याच्या दृष्टीने ही एक अत्यंत महत्त्वाची लाईन आहे. कारण आपल्याला माहिती आहे की, गोंदिया अशा ठिकाणी आहे की, जिथे मध्यप्रदेश आणि छत्तीसगड या दोघांची बॉर्डर आहे आणि पलीकडे बल्लारशापासनं तेलंगणा आणि तिकडे आंध्र प्रदेश आपल्याला मिळतो. त्यामुळे अतिशय स्ट्रॅटेजीक अशा प्रकारची ही जी लाईन आहे,जी मंजूर झाली आहे" असं देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं आहे. त्या बद्दल त्यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे आभार मानले आहेत.












Click it and Unblock the Notifications