Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

"सरकार चालवताना काय निर्णय घ्यावा हे आम्हाला कळत पण.." अजित पवारांचे सरन्यायधीशांसमोर भाषण

CJI felicitation ceremony in legislature Ajit Pawar on Bhushan Gavai : "सरकार चालवताना काय योग्य आहे आणि काय निर्णय घ्यायला पाहिजे हे आम्हाला कळत असते पण समोरची व्यक्ती तसा निर्णय घेतला तर नाराज होण्याची भिती असते म्हणून तसा निर्णय घेता येत नाही. अशावेळी ती व्यक्ती नाराज होणार नाही आणि योग्य असा निर्णय होईल यासाठी आम्ही न्यायालयावर अवलंबून असतो," असे म्हणत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सरकार आणि जनता यामध्ये न्यायालयाची किती महत्वाची भुमिका आहे हे स्पष्ट केले.

भारतीय सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांचा आज ८ जुलै २०२५ रोजी सत्कार सोहळा विधीमंडळात सुरु आहे. यानिमित्त राज्याचे अजित पवार यांनी त्यांचे अभिनंदन करुन भाषण केले. त्यात त्यांनी न्यायव्यवस्था, सरकार आणि जनता यासंदर्भात भाष्य केले.

CJI felicitation ceremony

अजित पवार म्हणाले, आजचा सत्कार सोहळा हा इतिहासात नोंद हईल असा आहे. महाराष्ट्रातील विधीमंडळात त्यांचा सत्कार होत आहे. जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीत सरन्यायाधीशपदी निवड झाल्याबद्दल मी सीजेआय भूषण गवई यांचे राज्यातील तेरा कोटी जनता आणि सभागृहातील सदस्यांच्या वतीने अभिनंदन करतो.

अजित पवार म्हणाले, खरंतर सत्कार समारंभाजी सुरुवात माय लॉर्ड या वक्तव्याने करायला हवी होती आजच्या सत्कार समारंभाला दोन बाजू आहेत असे म्हणत सरकार येतात आणि जातात पण एकंदरीत काम करताना न्यायालयीन प्रकरण असतात, येतात वेळेत शासनाने उत्तर सादर केले नाही तर आर्थिक दंड भरावा लागणार किंवा सचिवांना न्यायालयात हजर राहावे लागणार असा विद्यमान सरन्यायधीशांचा दबदबा राहीलेला आहे.

अजित पवार म्हणाले, महायुतीचे सरकार चालवताना घटनेनुसार, काय योग्य आहे आणि काय निर्णय घ्यावे लागतात हे आम्हाला कळत असते पण तसा निर्णय घेतला तर समोरची व्यक्ती नाराज होण्याची भिती असते. त्यामुळे तसा निर्णय घेता येत नाही, त्यामुळे ती व्यक्ती नाराज होणार नाही आणि योग्य असा निर्णय होईल यासाठी आम्ही सर्वस्वी आम्ही न्यायालयावर अवलंबून असतो.

अजित पवार म्हणाले, राज्याच्या उच्च न्यायालयातील आतापर्यंत सर्व न्यायाधीशांमध्ये आपला सर्वाधिक दबदबा आणि आदरयुक्त भिती राज्याच्या राजकारण्यांमध्येही प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्येही होती हे सर्वांनाच मान्य करावे लागेल. देशातील न्याय प्रक्रीयेमध्ये विक्रेंदीकरण व्हावे ही सरन्यायधीश भूषण गवई यांची भुमिका खेड्यात, दुर्गम भागातील नागरीकांना न्याय देणारी आहे.

अजित पवार म्हणाले, या देशातील दीडशे कोटी जनतेला त्यांच्याकडून खूप अपेक्षा आहे. या अपेक्षा ते पुर्ण करतील असा विश्वास मी व्यक्त करतो असे म्हणत त्यांनी सरन्यायधीशांना शुभेच्छा दिल्या.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+