शिवराजने पंचांना गोळ्या घालायला पाहिजे होत्या... चंद्रहार पाटलाचं वादग्रस्त विधान; वाट पेटणार?
अहिल्यानगर येथे रविवार महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेत पुण्याचा मल्ल पृथ्वीराज मोहोळे महाराष्ट्र केसरी ठरला. मात्र तत्पूर्वी उपांत्य सामना व उपांत्यपूर्व सामन्यात वाद झाले. शिवराज राक्षे याने पंचांच्या चुकीच्या निर्णयावरुन पंचांची काँलर पकडून त्यांना लाथ मारली. उपांत्य सामन्यातही महेद्र गायकवाडने पंचांविरुद्ध नाराजी व्यक्त केली. त्यानंतर या दोघांनाही तीन वर्षांसाठी निलंबित करण्यात आलं. आता हा वाद आजही कायम असून, त्यात डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील याने उडी घेत वादग्रस्त विधान केलं आहे.

नेमकं काय घडलं?
अहिल्यानगरच्या बलभिम अण्णा जगताप क्रीडा नगरीत महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा झाल्या. महाअंतिम सामन्यात पृथ्वीराज मोहोळ आणि महेंद्र गायकवाड आमनेसामने होते. मात्र महेंद्र गायकवाडने सामना संपायला काही सेकंद बाकी असताना पंचांनी दिलेल्या निर्णयाविरोधात मैदान सोडले. त्यामुळे पृथ्वीराज मोहोळ याला विजयी घोषित करण्यात आलं. त्यापूर्वीच्या सामन्यात शिवराज राक्षे यानेही उपांत्य फेरीत पंचांने दिलेल्या निर्णयाविरुद्ध नाराजी व्यक्त केली. शिवराजने पंचाची कॉल धरली आणि लाथ मारली. या प्रकारानंतर चांगलीच खळबळ उडाली. या स्पर्धेला गालबोट लागले.
कुस्तीगीर परिषदेची दखल
महेंद्र गायकवाड व शिवराज राक्षे या दोघांनी पंचांच्या निर्णयाविरुद्ध वादग्रस्त भूमिका घेतली. त्यामुळे कुस्तीगीर परिषदेकडून महेंद्र गायकवाड आणि शिवराज राक्षे या दोघांचं तीन वर्षांसाठी निलंबन करण्यात आलं. या दोघांनाही आता तीन वर्षे कुस्ती स्पर्धेत भाग घेता येणार नाही. दरम्यान, या प्रकाराबाबत दोन्ही बाजूंकडून प्रतिक्रिया आल्या. कुस्ती क्षेत्रातील काहींनी या प्रकारावर नाराजी व्यक्त केली तर काहींनी या दोघांचं समर्थन केलं.
पाटलाचे वादग्रस्त व्यक्तव्य
डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांने महाराष्ट्र केसरी ठरलेल्या पृथ्वीराज मोहोळ यांचं अभिनंदन केलं. मात्र त्यानंतर त्याने शिवराज राक्षे याची पाठराखण करत वादग्रस्त वक्तव्य केलं. सांगलीत माध्यमांशी बोलताना चंद्रहास पाटील म्हणाले, पृथ्वीराज मोहोळ याचे मी अभिनंदन करतो. त्यात पृथ्वीराजची काही चूक नाही. मात्र पंचाचा निर्णय वादग्रस्त आहे. शिवराज राक्षेने खरं तर पंचाना गोळ्या घालायला पाहिजेत. मी देखील 2009 साली ट्रिपल महाराष्ट्र केसरीची कुस्ती स्पर्धा खेळताना वादग्रस्त निर्णयाला बळी पडलोय. त्यावेळी मी आत्महत्या करण्याच्या विचारात होतो.", असं चंद्रहार पाटील यांनी म्हटलं. आता पाटील याच्या या वक्तव्याने पुन्हा खळबळ उडाली आहे.












Click it and Unblock the Notifications