Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

महायुती सरकारचे 4 ऐतिहासिक मंत्रिमंडळ निर्णय!15 हजार पलिसांची पद भरणार; रेशन दुकानदारांना मोठे गिफ्ट

Cabinet decision Recruitment of 15 thousand policemen : देवेंद्र फडणवीस सरकारने आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या मिटिंगमध्ये चार मोठे निर्णय घेतले आहेत, त्यात सर्वात मोठा निर्णय म्हणजे गृहविभागात तब्बल 15 हजार पोलिसांची भरती केली जाणार आहे. हा खूप मोठा निर्णय असून यापुर्वी एवढ्या पदांसाठी एकाचवेळी कधीही भरती झाली नाही अशी माहिती आहे.

Cabinet decision Recruitment of 15 thousand policemen

आज झालेल्या बैठकीत राज्यातील रास्त दुकानदारांच्या नफ्यात वाढ करण्याचा निर्णय तसेच सोलापूर पुणे मुंबई हवाई प्रवासासाठी निधी आणि सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या अखत्यारीत महामंडळांमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध कर्ज योजनेतील जामीनदाराच्या अटी शिथिल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासह कर्ज संबंधित योजनेत शासन हमीस पाच वर्षासाठी मुदतवाढही देण्यात आली आहे.

Take a Poll

काय आहेत मंत्रिमंडळ निर्णय

1. (गृह विभाग)
महाराष्ट्र पोलिस दलात सुमारे 15,000 पोलिस भरतीस मंजुरी

2. (अन्न, नागरी पुरवठा विभाग)
राज्यातील रास्त भाव दुकानदारांच्या मार्जिनमध्ये वाढ. सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत शिधापत्रिकाधारकांना अन्नधान्य वितरण.

3. (विमानचालन विभाग)
सोलापूर-पुणे-मुंबई हवाई प्रवासाकरिता Viability Gap Funding निधी देण्याचा निर्णय

4. (सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग)
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या अखत्यारीत महामंडळांमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध कर्ज योजनेतील जामीनदाराच्या अटी शिथिल. शासन हमीस पाच वर्षासाठी मुदतवाढ.

पोलिस भरती प्रक्रियेला मंत्रिमंडळाची मंजुरी

राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांची खूप महत्त्वाची भूमिका असते आणि राज्यात वाढती लोकसंख्या पाहता आता पोलिसांची संख्या ही वाढवणे आवश्यक आहे या दृष्टीने राज्य सरकार काम करत आहे त्यामुळे पोलीस दलात काम करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी ही एक मोठी संधी असून 15, 000 जागांसाठी ही भरती केली जाणार आहे या संदर्भात गृह विभागात कडून मान्यता देण्यात आली होती, त्यानंतर आता मंत्रिमंडळानेही आजच्या कॅबिनेेट मिटिंगमध्ये मंजुरी दिली.

कधी होणार पोलिस भरती?

दरम्यान पोलीस भरती ही ऑक्टोबर 2025 मध्ये सुरू होईल असा अंदाज आहे पोलीस भरती प्रक्रियेत सुरुवातीला मैदानी चाचणी त्यानंतर मुंबई वगळता इतर सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच वेळी लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे.

कोणत्या पदांची असेल भरती?

15 हजार पदांच्या भरतीमध्ये बँड्समन, चालक शिपाई, पोलिस शिपाई, राज्य राखीव पोलीस बलातील अंमलदार आदी पदांचा समावेश आहे. उमेदवारांना एका पदासाठी फक्त एकाच जिल्ह्यात अर्ज करता येणार आहे. म्हणजेच एकाचवेळी ही परीक्षा असेल आणि एकाच पदासाठी उमेदवार प्राप्त राहील अशी प्राथमिक माहिती आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+