Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

मनपा निवडणुकीत शिवसेनेचं नवं अस्त्र; महायुती निश्चित,पण 'या' फार्म्यूल्यावर BJPला खिंडीत पकडणार

BMC Elections Mahayuti Confirmed : महाराष्ट्र राज्यातील आगामी महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना यांच्यात अखेर महायुती होण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे.

अलीकडे नगरपंचायत आणि नगरपालिका निवडणुकीत दोन्ही पक्षांमध्ये कमालीचा दुरावा निर्माण झाला होता. शिंदे गटाने थेट दिल्ली गाठत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेऊन महाराष्ट्र भाजपच्या कारभाराविषयी तक्रारी केल्या होत्या. मात्र, आता दोन्ही पक्षांनी 'सबुरीचा' निर्णय घेऊन महानगरपालिका निवडणूक एकत्र लढवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

महायुती होणार हे निश्चित झाले असले तरी, आता खरी लढाई जागावाटपावरून सुरू होणार आहे. ही निवडणूक एकत्रित लढवण्यासाठी भाजपने तयारी दर्शवली असली तरी, शिंदे गटाच्या शिवसेनेने आता एक महत्त्वाचे नवे अस्त्र उपसले असून भाजपला जागावाटपाच्या मुद्द्यावर खिंडीत पकडण्याची तयारी केली आहे.

BMC Elections Mahayuti Confirmed Shiv Sena

शिवसेनेचा '५०-५०' फॉर्म्युल्याचा आग्रह!

महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे गट अर्थात शिवसेनेकडून थेट '५०-५०' (समान जागा वाटपाचा) फॉर्म्युला ठेवण्यात येणार आहे. भाजप शिंदे सेनेला समान जागा देण्यासाठी तयार होणार का, हा सर्वात मोठा प्रश्न असणार आहे.

एमएमआरमध्येही तोच आग्रह

मुंबई महानगर प्रदेशातही (MMR) जागावाटपासाठी याच '५०-५०' फॉर्म्युलानुसार चर्चा व्हावी, यासाठी शिवसेना आग्रही असेल. या विभागात शिवसेनेची पारंपरिक ताकद अधिक असल्याने, शिवसेना अधिक जागांसाठी आग्रही राहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

'धनुष्यबाणा'च्या जागांसाठी आक्रमक भूमिका

ज्या जागांवर यापूर्वी 'धनुष्यबाण' चिन्हावर नगरसेवक निवडून आले आहेत, त्या जागांसाठी शिवसेना कोणत्याही परिस्थितीत तडजोड न करता आग्रही राहणार आहे. मुंबई महानगरपालिकेतील जागावाटप याच सूत्रावर आधारित असावे, अशी शिवसेनेची मागणी असेल. एकंदरीत, महायुतीचा निर्णय झाला असला तरी जागावाटपावरून शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतल्याने भाजप आणि शिवसेनेमध्ये संघर्ष होण्याची चिन्हे आहेत.

महायुतीच्या जागावाटपाच्या बैठकीचा मुहूर्त ठरला

जागावाटपाच्या संदर्भात चर्चा करण्यासाठी आणि महायुतीच्या पुढील वाटचालीचा मुहूर्तही ठरल्याची माहिती मिळत आहे. मुंबईच्या जागावाटपासाठी पुढील दोन दिवसांत पहिली बैठक पार पडणार आहे. या बैठकीत भाजपकडून चार, तर शिवसेनेकडून सहा प्रमुख नेते चर्चेसाठी उपस्थित असतील.

चढाओढ!

अधिकाधिक जागा पदरात पाडून घेण्यासाठी दोन्ही पक्षांचा आग्रह असणार आहे. मुंबईत भाजप 150 जागांवर लढण्यास तयार आहे, तर शिवसेनाही 100हून अधिक जागांवर लढण्यासाठी तयारी करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यामुळे जागावाटपावर कोणता पक्ष नमती भूमिका घेणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे. मुंबई महानगर प्रदेशात भाजप आणि शिवसेनेमध्ये मोठी चढाओढ होण्याची शक्यता आहे.

नागपूर, चंद्रपूरसह २९ महापालिकांची निवडणूक वेळेतच?

दरम्यान, राज्यातील सर्व महापालिकांच्या निवडणुका एकत्रितच घेतल्या जाणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुका एकाच वेळी होतील. यामध्ये चंद्रपूर आणि नागपूर महानगरपालिकेची निवडणूक सुद्धा वेळेतच होणार आहे.

ओबीसी आरक्षणाचा मुद्दा उपस्थित झाल्याने जिल्हा परिषद निवडणुका पुढे ढकलून पहिल्यांदा महानगरपालिका निवडणुका होण्याची शक्यता आहे. विधानसभेचे अधिवेशन लवकरच संपणार असून, आठवडाभरात कधीही महानगरपालिका निवडणुकीसाठी आचारसंहितेची घोषणा होण्याची शक्यता आहे.

More From
Prev
Next
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+